पाऊस गारांचा ,पाऊस सरींचा ,रस्ते गटार तूंबविणारा , दोन चार इमारती पाडणारा ,गाड्या घोड्या अडविणारा .... माणसांना सळो की पळो करूंन सोडणारा .... असा हा वात्रट ... धांद्रट पाऊस ......!
पाऊस ..कसा तर अगदी पावसा सारखा चिखलात लोळणारा ... नदित डुम्बणारा , सागराच्या लाटांवर स्वार होणारा ....वादळा बरोबर भरकटनारा , पानांतुन निथळणारा ....कौलांवरुन ओघळणारा .... फुला पानांवर रमणारा ...... अगदी गटार .. नाल्यात तुंबणारा ... असा अनेक विविधांगी .... बरसना-या पावसाचा पहिला स्पर्श मातीला होतो .... आणि सा-यांना पाउस मातीचा सुंगंध म्हणजे त्याच्या चैतन्यमय अस्तित्वाची चाहुल देतं ...! तो सुगंध किती घ्यावा आणि किती नाही .... सारे भानच सूटते ....!
पाउस अनुभवता येतो .... अगदी आपला आपणच .....! पावसाबरोबर कोसळताहि येतं ....! बरसायचे असेल त्याच्या सोबत तर मनातले कढ डोळ्यात दाटले की ... कोंडलेल्या आसवांना पावसाबरोबर बरसु द्यायचे ... म्हणजे मनही आकाशा सारखे हलकं फुलकं निरभ्र होतं ....! गुंतलेल्या ... अडकलेल्या मनाला मोकळे सोडावे , पावसाच्या धारांत जाऊ द्यावे ... अगदी कागदी होडी प्रमाणे ... मनाबरोबर आपणही बाहेर जावे ...! पाऊसाचे थेंब अंगावर शहारे आणतात ..... ओलेचींब झाल्यावर अंगाअंगात भिनतात ......!
पाऊस जोड़ीनही अनुभवता येतो ......! पावसाच्या प्रत्येक सरीनं देहातील कण न कण पेटून उठतो ...! अंग लपेटून ...संकोचुन आडोश्याला उभे रहातो .....! पण त्या अदवैताला फक्त पाउसच साक्षी असतो…. !!!!
पाउसासारखं जगता आले पाहिजे .. बेधुंद ..... नवजीवनाला प्रतिक्षण जिवंत ठेवत ......!
पावसाचे शांत ...शीतल निश्चल ...अस्तिव ... कधी कधी आपल्याला मुळासकट हादरविते…. ! पावसाचे रौद्र रूप माणसाच्या अस्तिवाला मिटवू शकतो …!
"पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले"
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले"
किंवा
"नको नको रे पावसा ... असा धिंगाणा तू घालू ....!
झोपड़ी चंद्रमौळी माझी बघ जाईल वाहून
धनी गेला दूर देशी .... त्याला येउ दे परतून "
असा हवा हवासा वाटणारा पाउस असा बदलला की नको नकोसा होतो .......!
"अति पावसाचे लाड नाही कुणी करित…!
वहाता वहाता त्याने भानही ठेवायाचे ....
दूर कुठेतरी कुणाचे घर आहे मातीचे ...."
समिधा