मन मनास सांगे
नको आकारु
रूप दुर्दैवाचे .......
मन मनास सांगे
शोध आधार
रूप सौजन्याचे ……
मन मनास सांगे
नको घाबरु
जग लढणा-यांचे ……
मन मनास सांगे
कर प्रकाश
घन दूर अंधाराचे …!!
घन दूर अंधाराचे …!!
दीपावलीच्या नव तेजाने सर्वांची आतंरिक मनं उजळून जाउ देत ....!
नव प्रकाशाने आत्मरंगी नवचेतना उमलू दे ....!!
" समिधा "