"आमिर खान" पर्फेक्टनिस्ट ! माझा अगदी कॉलेज पासून रोल मॉडेल आहे. आणि माझा रोल मॉडेल किती परफेक्ट होता हे जसजसा काळ पुढे जात होता तस तसे सिद्धही होत होते. दिवसेंदिवस त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर वाढत होते ...! त्याचे एका पेक्षा एक सुंदर अर्थगर्भ आणि मनाचा वेध घेणारे सिनेमा येत होते. खरं तर जस जसा तो वयाने वाढत होता तस तशी त्याच्यातील संवेदनशीलता अधिका अधिक व्यापक होतानाचा प्रवास थक्क करणारा होता ....! अगदी "कयामतसे क़यामत तक" ते "पीके " पर्यन्त त्याने
स्वत :च्या अभिनय क्षमतेवर आणि समाजमनावरील विशिष्ट संस्कारांवरही अतिशय प्रभावी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला ....! कधी तो या प्रयोगात "तारें जमीं पर " "थ्री ईडियट्स" या सारख्या चित्रपटातील भाष्यातून कमालीचा यशस्वी होतानाही पाहिले तर कधी "पीके" सारख्या चित्रपटातून थोड़ा अयशस्वी, गोंधळलेलाही दिसला ! "सत्यमेव जयते " या कार्यक्रमातून त्याने भारतातील राजकीय, सामाजिक, कौटुंबिक एकूण सर्वच स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनते समोर अनेक गोष्टी उघड केल्या , त्यावर चर्चा घडवून आणल्या आणि जनतेच्या सक्रीय सहभागातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्नही केला ...! त्यावेळी तर मला आमिर खान बद्दलचा अभिमान अधिकच वाढला ! प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मला एक गोष्ट मनाला समाधान देऊन जायची की , हा माणूस केवळ एक्टर नाही , हा हौस म्हणून सिनेमा करीत नाही किंवा केवळ पैसा कमावणे हाच याचा उद्देश नाही तर एक भारतीय म्हणून , एक जबाबदार नागरिक म्हणून.,
एक सजग संवेदनशील माणूस म्हणून समाजप्रती आपली जबाबदारी स्वीकारुन या माध्यमातून तो देशसेवा करीत आहे ..! समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे ! आपल्या देशवासियांना प्रतिकूल परिस्थितिशी
लढण्यासाठी स्वत:सोबत समाजातील सर्वच घटकांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील एकीची शक्ति जागृत करून हा "सेक्युलर" भारताला बळकट करण्याचे किती महत्वाचे कार्य अगदी विचारपूर्वक करीत आहे ...!
आणि एका क्षणी मला " महात्मा गांधींचे " आभार मानावेसे वाटले ... हिन्दुस्थान / पाकिस्तान फाळणीच्या वेळी ज्या मुस्लिम बांधवांना हिंदुस्थानच आपली मातृभूमि आहे असे वाटते ते हिंदुस्थानात राहतील असे घोषित केले आणि म्हणून आज " आमिर खान " आपला आहे ! आमचा " हिंदुस्थानी " आहे !
पण परवाच्या त्याच्या वक्तव्याने मात्र मी चकित झाले ....!! भारतात असहिष्णुता वाढत आहे ! माझ्या पत्नीला आमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते ! तिने मला देश सोडण्याबाबतचा विचारही बोलून दाखवला ! हे आमिर खान बोलू शकतो ह्या वर विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण होते ! कारण मिडिया ध चा मा करण्यात पेशवेकालीन आनंदीबाईंचा सीक्वेल आहे !!
भारतातील असहिष्णुता वाढत आहे ... म्हणजे भाजप सरकार हे हिंदू प्रणीत सरकार आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे असे म्हणायचे आहे का ? मग कांग्रेस सरकारच्या काळातील मुंबईतील केवळ मुस्लिम समुदयाने केलेली दंगल आणि महिला पोलिसांचा केलेला विनयभंग , केवळ मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवुन कांग्रेसने अनेकदा मुस्लिमेतर समाजाची केलेली पिळवणूक , त्यावेळी सहिष्णुता कुणी दाखवली? पण त्यावेळी तू काही असहिष्णुते बद्दल बोललेले मी ऐकले नाही! मला वाटले , बरेच आहे तुझ्या सारख्या विवेकी माणसाने अश्या समाजाचा एक व्यक्ति म्हणून स्वत:ला का " पेश " करावे ?
तू " न्यूट्रल " राहून आपले कार्य करतो आहे , किती महान !!
तुझ्या पत्नीला तुमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते ... म्हणजे ? हिंदुस्थानात इतर मुले नाहीच का ? त्यांच्या भविष्याचा विचार तू करणार नाहीस ? मग तारें जमींपर सोडून देणार तू ? इतका आत्मकेंद्रित कधीपासून झालास ? ज्या हिंदुस्तान मध्ये तुझे भविष्य घडले जे आज सर्व जग पाहत आहे त्या हिन्दुस्ताना बद्दल तू असा कसा बोलू शकतोस ? पाकिस्तानातील मुलांचे भविष्य तुला माहित आहे ? नोबेल विजेति " मलाला" आज पाकिस्तान सोडून अमेरिकेत आहे ! का ? ती तर तिच्याच मातृभुमित पाकिस्तानात नकोशी आहे ! का ? एका मुस्लिम राष्ट्रात एक सुधारणावादी , पुरोगामी विचारांची मुस्लिम शाळकरी मुलगी नको आहे ! का ? आणि तू म्हणतोस तुझ्या मुलाचे भविष्य धोक्यात आहे !!
आणि सगळ्यात कहर म्हणजे तू पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणतोस तुझा देश सोडण्याचा विचार आहे! तो तूच आहेस ना ? जो अतुल्य भारत म्हणत , सत्यमेव जयतेचा घोष करीत देशाच्या एकतेसाठी आणि एकूणच देशाच्या प्रतिमेला अधिका अधिक उज्वल प्रकाशमान करण्याची ग्वाही देतोस ! आणि आज तू सगळ्या समस्यांपासून पळ कसा काढतोस ? तुझा तुझ्यावरील विश्वास उडाला आहे की तुझ्या मातृभूमीवरील ? तुझ्या अश्या विधानांमुळे तू आपल्या मातृभूमीचा , आम्हा सर्व भारतीयांचा अपमान केला आहेस !
तुला जर खरच असे असुरक्षित वाटत होते तर आपल्या भारतीय बांधवांशी मोठ्या विश्वासाने संवाद साधू का नाही शकलास ? तू संवाद साधलास पण चुकीचा,संशयास्पद सर्व भारतीयांना गृहीत धरून आणि अतिशय बेजबाबदारपणे !तिथे " सरफ़रोश " मधील ACP अजयसिंघ राठोड कुठेच दिसला नाही ! " लगान " मधला भुवनला तू कसा विसरलास ? आम्ही तर त्याला आमच्यात जगवण्याचा प्रयत्न करीत आहोत ...! आणि तूच आता अश्या आपल्याच शिलालेखांना उध्वस्त करीत चालला आहेस ? तुझा प्रवास प्रकाशाकडून अंधाराकडे होत आहे !!
प्रिय आमिर " तुझसे नाराज नहीं ..... मगर हैरान हूँ ...!!"
" समिधा "