सकाळी वृत्तपत्र हातात पडल्यावर हेडिंग नंतर भविष्याकडेच मोर्चा वळतो …!
वृत्तपत्रीय भविष्य कथनातही बरी हुशारी बरतलेली असते ....! म्हणजे भविष्य सांगताना अगदी ठामपणे काहीच दर्शविलेले नसते … ! उदा . मौन पाळावे , समयोचित वागा , वाद टाळा … इ . मग अश्या वेळी खरच भविष्य वाचना-यांची पंचाईतच होते …!
समयोजित वागा , वाद टाळा यामधून नेमके कधी , कसे , कोठे आणि कशा त-हेने वागावे , बोलावे कसे कळणार …??
स्व:तावरील विश्वास डळमळीत झाला की माणूस "सुपरस्टीशियस " होऊ लागतो …! आणि मग तो या लाचारीमुळे एकतर कमालीचा धार्मिक बनतो किंवा रोजच्या वृत्तपत्रीय भविष्याकडे वळतो …!
समिधा