सहा महिन्यांच्या रणधुमाळीनंतर अखेर काल
क्रांति घडली …! आता पर्यंत चार कुबड्या घेऊन चालनारे सरकार आणि त्यांचा
कोणाचा कोणाला पायपोस नाही....! त्यामुळे आंधळं दळतोय आणि कुत्रा पीठ
खातोय …! अशी परिस्थिति हिंदुस्थानात होती....! (एक हाती सत्ता असती तर
असे घडले नसते असेही ठामपणे म्हणणे अतिशयोक्ति होईल !)
"मोदी" सरकारच्या हाती एक स्थीर सरकार देऊन हिंदुस्थानी जनतेने मोठ्या
विश्वासाने आपले सरे भविष्य त्यांच्या हाती सोपविले आहे …! आतापर्यंत
भारतीय जनता विभ्रमा अवस्थेत होती....! आपल्या नक्की कोण तारणार …? एक
आश्वासक नेत्याची.... त्याना गरज होती …! आज भारतातील प्रत्येक सामान्य
आणि मध्यम वर्ग महागाईने त्रासला आहे …! दैनंदिन गरजा भगवताना त्यांची
होणारी दमछाक । त्यामुळे देशाचा विकास … देशाचे सौरक्षण … थोडक्यात
देशभक्ति … याना मनातच दाबून स्वरक्षणाय आणि स्वभक्षणाय या मध्ये बिचारा
पिचून गेला आहे…!
काल "मोदींचे " वड़ोदरा येथील भाषण ऐकले …! त्या भाषणात जो जोश होता
… जो आवेश होता आणि त्यांची जी भाषा होती ती अतिशय प्रभावशाली होती …! (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भाषणाची आठवण करून देणारे भाषण)
भारताला याच आश्वासक … आत्मविश्वासकतेची गरज आहे …! एक अश्या
नेतृत्वाची गरज प्रत्येक आंदोलनासाठी लागतेच …! आणि हिंदुस्थानला पुढे
न्यायचे असेल तर… हिंदुस्थानात राहना-या प्रत्येक भारतीयाचा विकास होणे
गरजेचे आहे ....! त्यांना भिक नको काम दया ....! स्वाभिमान दया ....!
त्यामागे देशाभिमान असेल तर देशाला विकसाकडे नेणे कठीण नाही ....!
कालच्या या भाषणात मला सर्वात जास्त आवडले ते त्यांची "जनआंदोलनाची व्याख्या" स्वतंत्र भारताची जनआंदोलनाची व्याख्या ! प्रत्येक भारतीयाने कोणतीही कृती , कार्य , भूमिका करताना मग ती वैयक्तिक असली तरी त्यामागे आपल्या देशाच्या हिताचा .... विकासाचा विचार असावा ....! भले ते काम कितीही लहान वा मोठे असू दे …!
खुप मोठी शक्ति आहे या विचारात …! देशभक्ती केवल सीमेवर जाऊं लढून शहीद
होउनच करू शकतो का …? ती आपल्या पासून आपल्यातून रुजवा …! आपोआप
भ्रष्टाचार, विध्वंसक विचार नष्ट होतील ....! सर्वाना बरोबर घेऊनच विकास
घडेल … हे सत्य "मोदींनी" आपल्याला सांगितले असेल तरी त्यासाठी प्रत्येक
भारतीयाने स्वत:पासून सुरवात करावी !
काल घडवलेली क्रांति ही प्रत्येक मतदात्या भारतीयाने घडवलेली क्रांति आहे
…! या क्रांतीचा कडकडाट … गड़गड़ाट सम्पूर्ण विश्वाला दिसला आहेच ! आता
त्याचा प्रकाश सर्वदूर प्रसवावा … या साठी मोदी सरकार आणि माझ्यासह सर्व
हिंदुस्थानी देशभक्तांना हार्दिक शुभेच्छा ……!!
" गर्वसे बोलो वन्दे मातरम "
(पुष्पांजली कर्वे )