कोंडलेल्या या जीवांच्या
यातना समजून घ्या !
जागवा संवेदना
वेदना जाणून घ्या !
चिड़िया घर पाहताना पर्यटकांना आनंद देण्यासाठी कितीतरी जातिप्रजातीच्या सुंदर मोहक रंगांच्या , अावाजाच्या त्या रंगबिरंगी पक्ष्यांना त्यांच्या मूळ स्थानांपासून इथवर लांब आणून पिंज-यांमध्ये बंद केले होते.
प्रत्येक पिंज-यापुढे उभे राहून मोठा वैश्विक आनंद प्रत्येक पर्यटक घेत होता . आणि आतले पक्षी कावरे बावरे झालेले …! भेदरलेले , घाबरलेले दिसत होते . (निदान मला तरी तसेच दिसत होते ) . जंगलात
झाडांवर स्वैरपणे उड़ने , हुंदडने … आनंदाने ओरडणे … मना प्रमाणे आकाशाचा वेध घेणे । मर्जी प्रमाणे फुलांचा मकरंद , फळांचा रसास्वाद घेणे , बिया दाने टिपणे हा स्वत:चा स्वत: उपभोगलेला आनंद त्यांना या
पिंज-यात, कृत्रिम फांद्यांवर आणि अडकवलेल्या धान्य आणि पाण्याच्या भांड्यांतून मिळणार कसा ?? (फिश टैंक मधले मासे पाहुनही मनाची अशीच घालमेल होते ) .
किती क्रूर आहे माणूस ! त्यालाही असे अडकवले पिंज-यात तर त्याची प्रतिक्रिया काय असेल ?
"समिधा"