प्रत्येक दिवस सारखा नसतो ....!! गेलेले दिवस, आजचे दिवस आणि येणारे दिवस असे साधे विभाजन शक्यच नाही ....!
आतापर्यंत माझ्या गेलेल्या दिवसांत बरेच दिवसांना सोनेरी झळाळी आहे .! काहींना दू:खाची किनार , तर काही मनस्ताप पश्चातापाच्या वर्खाने झाकोळलेले आहेत ! प्रत्येक दिवसाचा स्व:ताचा एक रंग आहे …! भाव आहे …!
येणारा पत्येक दिवस असेच विविधरंगी असतीलच … पण एखाद्या दिवसामध्ये एक विशिष्ट गती-चैतन्य आणि विशिष्ट जीवंतपणा असतो तो प्रत्येक दिवसात नसतो …!
माझ्या वाट्याला असे चैतन्यमय - गतिशील "दिवस" बरेच आलेत आणि "जो दिवस " असा असतो तो दिवस माझ्या प्रत्येक दिवसाला ह्याच दिवसाचा जीवंतपणा लाभावा असे वाटल्यावाचून रहात नाही …!
मला माझे जीवन - जीवनातील प्रत्येक दिवस कसा भरजरी पाहिजे, पण माझी ही इच्छा अतिशयोक्तीपूर्ण आहे … पण तो इतका सामान्यही नसावा की ज्यामुळे येणा-या प्रत्येक दिवसातील चैतन्य नष्ट करेल की काय अशी भीति निर्माण करेल … तर येणा-या प्रत्येक दिवसाला आणि येणा-या प्रत्येक दिवसाने आपल्याला काही ना काही नवसृजनतेच्या रुपात द्यावे जेणेकरून आपली जगण्याची उमेद वाढेल …!
मुळातच मला केवळ सामान्य म्हणून जगायचेच नाही … अर्थात असामान्य होण्याइतकी आपली कूवत आहे की नाही हे समजण्या इतकी मी समंजस नक्कीच आहे ....! पण मी माझ्या पुरती एक स्वतंत्र अवकाश नक्कीच निर्माण करू शकेन असा मला विश्वास आहे … !! मनातील प्रत्येक नवसृजनेतेची उर्मी मी दाबणार नाही … कारण तीच उर्मी माझ्या जगण्याचा … येणा-या प्रत्येक नव्या दिवसाचा एक नवा रंग आणि एक नवा भावनानुभव असणार आहे .... जगण्याची नवी उमेद असणार आहे …! त्या माझ्या प्रकाशतल्या वाटा आहेत !!
" समिधा "
मला केवळ सामान्य म्हणून जगायचेच नाही …
उत्तर द्याहटवाअर्थात असामान्य होण्याइतकी आपली कूवत आहे की नाही -
हे समजण्या इतकी मी समंजस नक्कीच आहे
Utkrust dainandiniche pan !
Thanks Datar Sir ....!!
उत्तर द्याहटवा