"स्वप्न" म्हणजे काय .....? याचा शोध घेताना आपण नकळत आपल्या आंतर गाभा-रयात जातो ......!
जिथे कधी कधी आपल्यातला स्व अवती भवति असतो ...... पण तरीही तो अदृश्य असतो…! तर कधीतरी तो आपल्या सोबत इतराना घेतो… ! स्वप्न खुप अधभुत असतात ...... कालच मला स्वप्न पडले ......! मी लहानशी आमच्या जुन्या घराच्या मागच्या पडवित माझ्या बबली नावाच्या मैत्रीणीशी भातुकली भातुकली खेळत होते…! आणि तिथे आमच्यात खेळायला कोण आले ...... तर माझीच सहा वर्षाची चिमुकली मुलगी .....! आणि मी तिला माझ्यात खेळायलाच घेतले नाही … ! ती बिचारी एवढेसे तोंड करून निघून गेली ......!
सकाळी उठले .... आणि मलाच माझ्या स्वप्नाची गंमत वाटली ......! माझ्या स्वप्नात मी एक लहान मुलगी ..... आणि माझ्याबरोबर खेळायला मिळावे म्हणून हट्ट करणारी माझीच चिमुकली लहान लेकही स्वप्नात येते ......! या स्वप्नाचा अर्थ काय लावावा ......?
पण या स्वप्ना च्या अर्थाचा खुप विचार नाही करावा लागला .....! मी नोकरी करणारी आई ..... माझ्या लेकीला कितीसा वेळ मी देते ...?
तिलाही माझ्या बरोबर खेळावेसे वाटते .....! पण मी तिच्या बरोबर मनसोक्त खेळुही शकत नाही ......! मलाही तिच्याबरोबर तिचे बालपण अनुभवायाचे आहे ..... पण घड्याळाच्या काट्यांमधे आमचे दोघींचे खेळणे हरवले आहे…! मी माझ्या लेकीला माझ्या खेळात म्हणूनच नाही घेतले …!
स्वप्नांचे आणि आपल्या जगण्याचे धागे असे एकमेकांत गुंफलेले असतात ......! फक्त ती स्वप्ने जागेपणी हरवलेल्या दुर्लक्षित क्षणांची जाग स्वप्नात आणून देतात…!
"स्व" ला समजून घेण्यासाठी स्वप्नांचा असा उपयोग होऊ शकेल कदाचित ........!!!!!!
" समिधा "
kaharch chaan vichar aahet............halli anek palak aapalya mulanna velach det nahit tyamule mule bharkatat aahet.........!! sadhya tar mulinna sanbhalane khupach garjeche aahe tyanna bhavnik adhar dyayala tyanchya samvet jast vel ghalavlach pahije ,tyanna samjun ghetale pahije ,apulakine vicharpus keli pahije ,kuni ched kadhtoy ka ajun kasala tras detoy ka he sarv mitra-maitrinichya natyanech aapn vicharu shakato.........palak banun rahilo tar mule hatha baher jatil !!
उत्तर द्याहटवाThanks vishalji....! tumache vichar avadale...!
उत्तर द्याहटवाAajachya kalat navara-bayko doghehi nokari kartaat mhanun mulaankade lakshy denyas welach nasto.... wadilaanpeksha Aaiche mulaanvar jast prem aste.
उत्तर द्याहटवाkaaran tine nau mahine Aaplya potat saambhalele aste nokari karnarya Aaichi khanttumhi swapnatun mandlit dhanyawad
Thanks Kiran ..!!
हटवा