स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका महत्वाचा का वाटतो …?

     

                                                


       सुनंदा  पुष्कर यांच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रीने जीने इथपर्यंतचा प्रवास अतिशय कनखरपणे केला   .... ती  स्त्री केवळ एका पुरुषासाठी आपले जीवन संपवू शकते  …?

         एकटे असून एकटे जगणे  शक्य होते  .... मात्र दुकटे असून एकटे जगणे खुपच कठीण  …! असा माणुस खचत जातो  ....! मग ही  शारारिक  बाब रहात नाही  …! ती मानसीक होते  … माणूस नैराश्याने वेढतो  आणि मग मनाने खचतो  तिथे मग स्त्री असो   वा पुरुष असो तो मग अश्या स्वत:ला  सपंविण्याच्या निर्णयाप्रत पोहचतो  …!!

          तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की   शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका  महत्वाचा  का  वाटतो  …?
         जेंव्हा याचा शोध घेते तेंव्हा मला समजलेली … उमजलेली काही कारणे आपली भारतीय समाज व्यवस्था याला जबाबदार आहे  ! कारण उच्च विद्या विभूषित  … स्वत:चे  एक विशिष्ट  स्थान प्राप्त केलेल्या स्त्रियांना कदाचित पुरुषी स्थैर्याची  गरज नसेल पण ज्या स्त्रियांचे विश्वच त्यांच्या पुरुषाच्या प्रेम, विश्वास  या भोवती वेढलेले आहे त्यांचे काय  …! ज्यांच्या जवळ शिक्षण, आर्थिक स्वावलंबन  सारे आहे  …! पण स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाही  … आणि कधी  असली तरी अश्या पुरुषी समाजात एकटे राहण्याचा आत्मविश्वास नसतो  …अश्या स्त्रीया  घरगुती हिंसाचाराच्या शिकार होऊनही कधी सामाजाच्या भीतीने त्याच्या बरोबर रहात असतात   …!  पण  तरीही काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या  नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात  …आणि स्वत:ही जगतात   !   म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाला डावलून जगण्याचा  संस्कार म्हणा , भीति म्हणा , या मुळे त्यांची तयारी   नसते  ! आणि म्हणूनच ज्याच्यावर त्या खरे प्रेम करतात म्हणून  … किंवा स्वत:चा स्वार्थ म्हणुनही   (  कोणताही स्वार्थ …) स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष  महत्वाचा  वाटतो  अगदी कुणाच्याही जीवापेक्षा   ....! 

   पण आजकाल ही परिस्थिति बदलत आहे   …! म्हणूनच कदाचित (मुलींकडूनही ) घटस्पोटांचे प्रमाण वाढत आहे  …!

                                                                                                          " समिधा "

४ टिप्पण्या:

  1. काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात …आणि स्वत:ही जगतात.
    sadya paristhitiche utkrusth lekhn .

    उत्तर द्याहटवा
  2. किती कठीण आहे ना स्त्री चे आयुष ..स्वतःला पदोपदी जपणे ..सर्वांच्या मनासारखे वागणे ..कोण काय म्हणेल ..तुम्हाला तुमचा स्वतः चा फोटो पण किती जपावा लागतो ..मनासारखे जगत येत नाही ..लोक चुकीचा अर्थ लावतात ...तुम्ह्च्या चारित्र्य विषयी चुकीचा समाज करवून घेतात ...पण निसर्ग पण असाच त्याने तुम्हाला खूप नाजूक बनवलेय ..पुरुष च्या आधाराशिवाय जगणे पण मुश्किल ना ...नाही तर तुमचे अस्तित्व च नष्ट करायला पदोपदी लांडगे तयार ...पण हे सर्व इतर प्राण्यांच्या मध्ये पण तसेच असते ..मादी ला दुख आणि नराचे अत्याचार सहन करावे लागतात ..पण त्याच मादीला निसर्ग चालवायचे आव्हानात्मक कार्य पण निसर्गाने सोपवले आहे ..तुम्हाला सतत भीती खाली आणि दडपण खाली वागावे लागते ..मित्र आवडला एखादा पुरुष पण त्यातला हि नर कधी कधी जागा होतोच ..वाटते ना तुम्हाला पण तुमचे मन जाणणारा सर्व तुम्ह्च्या भावना समजणारा कोणी असावा ..तुम्हालाही अधिकार आहे एका पेक्षा जास्त पुरुष आवडण्याचा ..त्यात गैर ते काय ..पण का नाही सर्व जन ते इतक्या सहज पण घेत ..कठीण आहे ..अनाकलनीय आहे हे सर्व ...आम्ही पुरुष बिनधास्त जगतो आम्हाला थोडे हि बंधन नाही आवडत ..कोणी तसे केले तर लगेच चिडतो ..का निसर्गाने असे बनवले असावे...आम्हालाही नाही आवडत स्त्री ने आमच्या विषयी चुकीचा अर्थ काढून आमच्या पासून दूर राहिलेले ..आम्हाला पण इमानदारी असते ..आम्हालाही कळते..स्त्री ला जबरदस्ती अथवा ओरबाडून आपलेसे करणे पेक्षा तिचे मन जिंकणे कधीही चांगले ..तिच्या शरीर पेक्षा तिचे मन जास्त सुंदर असते ..ती खूप खूप सुंदर असते मनातून खूप delicate आहे ..तिच्या डोळ्यात टचकन पाणी त्यामुळेच येते ..सर्व निसर्गाचे खेळ आहेत ...विश्वास फार मोठी गोष्ट आहे ..प्राण्यांना पण ती भावना असतेच ..म्हणून एखादा प्राणी प्रेमाने हात लावू देतो ना आपल्याला नाही तर त्याला नसला विश्वास तर तो आपल्या पासून दूर जातो .....बंधनात ठेवून कोणी आपलासा नाही होत..विश्वास ठेवावा ..अन स्वात्यंत्र ठेवले तर कोणी हि आपल्या पासून दूर नाही राहू शकत ..कारण त्याला आपल्या ठिकाणी एक ओलावा जाणवतो ..एक सुखावणारा मनाला हवाहवासा भाव मिळतो..शांतता मिळते ..मन फार विशाल करता येते ..अशा मनाची शक्ती पण अफाट असते ..अशा मनातील भावना ..कोणासाठी हि दिलेली चांगली भावना प्रेरणा त्या व्यक्तीला जाणवतेच ..त्याला अचानक तुमची आठवण येतेच ..म्हणून तर आपल्या कुटुंबात पण बरेच वेळेस आपण असे क्षण अनुभवतो ....मन आपल्यालाच असते का प्राण्यांना नसते ? ..असते वाटते पण इतके प्रबळ नसते कारण त्याला मेंदू आणि स्मृतींचा पण आधार लागतो ..त्यांचा मेंदू आणि स्मृती तितक्या शक्तिशाली नसतात ..पण हो कुत्रा कितीही वर्ष झाले तरी आवडत्या व्यक्तीला ओलाखातोच ना ....भावना जपाव्या ..अनुभवाव्या ..खूप सुंदर आहे ना निसर्ग आणि किती किचकट पण .... :

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. किती सुंदर शब्दात व्यक्त केलं आहे! खुप छान ! खुप खुप धन्यवाद !

      हटवा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......