इतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं . जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण आले की वळावेही लागते . अश्यावेळी मागचं विसरून समोरच्याला जाऊन भिड़ावं लागतं …. ! आता माणसांमध्ये स्त्री -पुरुष ह्या नैसर्गीक भेदांमध्येहीं एक आगळेपण दिसते . वळनांची ची ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळि ही चर्चा स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा विचार करता अधिक चिंतनीय तर होइलच पण खात्रीने करमणुकिचेही ठरेल .
स्त्रीच्या जीवनात अनेक वळनं येतात . पहिलेच वळण तिच्या जन्माबरोबरच येते . तिच्या आईच्या जीवनात . (ती ही एक स्त्रीच) कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे जिची सर्वाना जबाबदारी उचलायची आहे … ! आणि मुलाचा जन्म म्हणजे जो सर्वांची जबाबदारी उचलतो (वंशाचा दिवा ) …! अश्या सामाजिक धारणेत तिचा जन्म होतो आणि तिच्या पूर्ण जीवन प्रवासाची वळनं तिथेच निश्चत होतात …!
आई , बहिण, मुलगी अश्या नात्यांच्या गुंत्यातिल वळनांवर चालताना तिला त्यांच्याच प्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा आकार उकार घडवावा लागतो . (तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठीही तिला पिता,बंधू अथवा पति यां सारख्या पुरुष सत्ताक सामाजिक रचनेच्या चौकटीत राहून घडवावे लागते ) .
सर्वात मोठे वळण तिचे लग्न होते तेंव्हा …. माहेरी या स्त्रीचे एक वेगळे व्यक्तिमत्व तयार झालेले असते . ज्यावर तेथील माणूस प्रक्रुतिंचे प्रभाव पडलेले असतात आणि लग्नानंतर पूर्णत: वेगळ्या वातावरणात. निराळ्या माणूसप्रक्रुतिच्या माणसामध्ये तिला स्वत:ला सामावून घेणे आवश्यक असते. या सामावन्यात प्रयत्न एकतर्फी ठरतात तर कधी अपुरे पडतात आणि मग अश्यावेळि संघर्ष निर्माण होउ शकतात . आणि हे सर्वात धोकादायक वळण आहे. या वळणावर तिला आघात होउ शकतो, अनेक ठेचा लागू शकतात …!
ज्या वळनावर तिला स्वत:च्या स्वत्वाला विसरून दुस-याना आपले मानलेले असते अश्याच्या सोबतीने (जिथे फक्त विश्वासबळावर ती स्वत:ला सोपवित असते /झोकुन देते ….!) आपल्या जिवनाचे पुढचे वळण कोणतेही असेल तरी आपण आता एकटे नाही या विश्वासावर ती निर्धास्तपणे जगण्यास सीध्द होते. … !!
अश्या ह्या पदोपदी वळण घेत चालना-या स्त्रीला समाज नेहमीच मुलीला चांगलं "वळण" असावं असा आग्रह धरीत असतो …! (समाजपुरूषाला अजुन कोणत्या चांगल्या वळनांची आवश्यकता वाटते …?) स्त्रीकडून समाजाला खुप अपेक्षा आहेत … ! पण सर्व अपेक्षाच्या केंद्र स्थानी फक्त पुरुषसत्ताक प्रवृतिला पोषक असे तिचे वळन पाहिजे.!
अशी वळणा वळणाच्या गुंत्यात अडकलेली स्त्री म्हणुनच एक आगळे -वेगळे सदैव दुभंगलेले व्यक्तिमत्व आहे असे वाटते ….!
"समिधा"