मी आई होणार हे जेव्हापासून कळलं तेव्हापासूनच
होणारं बाळ मुलगा असेल तर .... हे नाव ठेवायचं आणि मुलगी असेल तर .... हेच नांव ठेवायचं पक्क केलं पण
पण जेव्हा नेमकी वेळ आली आणि बाळाचं माझ्या लेकीचं काय नांव ठेवावं हा मोठा गहन प्रश्न झाला, मी सुचवलेली नावं एकदमच आउटडेटेड आहेत असं सर्वॉचं म्हणनं पडलं... मग काय आत्या, काकी, मावश्या , ताई माई आई सा-यांची शोध मोहीम आणि
एक एक नांव सुचवणं सुरू झालं....शेवटी बाळाचं नांव ठेवायचा अलिखीत अधिकार आत्याचा असतो आणि माझ्या बाळाच्या आत्यानं तो अगदी आनंदाने बजावला! नांव ठेवलं शर्वरी .....! आणि योगायोगाने ते
आमच्या नवदुर्गा देवीचंही नांव असल्याचे कळल्याने शर्वरी नाव ठेवल्याचं सार्थक झाल्यासाखे वाटले...
बाळ आता ब-यापैकी मोठं झालं... नावांत काय आहे... ? या
शेक्सपियरला पडलेल्या प्रश्नाची उकल मला हळू हळू होऊ लागली ....एक दिवस लेक
म्हणते आई माझं नांव छानच आहे , पण अजून एखादं जरा मॉडर्न नांव का गं नाही
ठेवलं....? आलिया, प्रिटी वगैरे ... ! होणारं बाळ मुलगा असेल तर .... हे नाव ठेवायचं आणि मुलगी असेल तर .... हेच नांव ठेवायचं पक्क केलं पण
पण जेव्हा नेमकी वेळ आली आणि बाळाचं माझ्या लेकीचं काय नांव ठेवावं हा मोठा गहन प्रश्न झाला, मी सुचवलेली नावं एकदमच आउटडेटेड आहेत असं सर्वॉचं म्हणनं पडलं... मग काय आत्या, काकी, मावश्या , ताई माई आई सा-यांची शोध मोहीम आणि
एक एक नांव सुचवणं सुरू झालं....शेवटी बाळाचं नांव ठेवायचा अलिखीत अधिकार आत्याचा असतो आणि माझ्या बाळाच्या आत्यानं तो अगदी आनंदाने बजावला! नांव ठेवलं शर्वरी .....! आणि योगायोगाने ते
आमच्या नवदुर्गा देवीचंही नांव असल्याचे कळल्याने शर्वरी नाव ठेवल्याचं सार्थक झाल्यासाखे वाटले...
" का तुझं नाव आवडत नाही का?" मी
आवडतं पण वर्गातल्या ब-याच मुलींची नावं शिना , रिया, किया अशी एकदम हटके आहेत ...! " शर्वरी
" त्यांना त्यांच्या नावाच्या मागील अर्थ माहित आहेत का गं ?" मी
" हं काय माहीत...!" शर्वरी
पण तुझ्या नावांत देवींचं नाव आहे आणि इंग्रजीत ट्वीलाईट म्हणतात... म्हणजे संधी प्रकाश जिथे निसर्गपिसारा त्याच्याकडच्या सा-या रंगांची उधळऩ करून प्रत्येकाच्या मनाला एक हूरहूर लावतो
किती सुंदर आणि पवित्र नांव आहे तुझं
यावर तिचं समाधान झाल्यासारखं वाटत तरी होतं..
पण या निमीत्ताने मला एक प्रसंग आठवला आमचे एक मराठीचे प्रोफेसर होते ,. त्यांच्या
घरी पण बाळ झालं आणि त्यांनी काहीतरी
खास नांव ठेवावं म्हणून आपल्या मुलीचं नांव "श्लेश्मा"
ठेवलं , वर्गात बर्फी वाटून सर्वांना कौतूकाने नांव सांगत होते, तेवढ्यात आमच्या प्रिन्सीपल मैडम पण आल्या,
सरांनी त्यांनाही बर्फी दिली... मैडम म्हणाल्या अभिनंदन ... मुलीचं नाव काय ठेवलंस, तु काय मराठी चा हुशार प्रोफेसर नाव अगदी छान ठेवलं असशीलच,
सरांनीही अगदी छाती फुलवून कौतूकाने "श्लेश्मा" असं
सांगितलं....ते नांव ऐकताच प्रिन्सीपल मैडम चा चेहरा
कसुनसा झाला, काय रे प्रमोद हे कसलं नांव ठेवलंस,
सरांचा चेहरा एकदम पडला , " का मैडम काय झालं ?
आधी तू तुझ्या मुलीचं नांव बदल ... तुला या नावाचा या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? त्यांच्या चेह-यावर चं हसू लपत नव्हते... आम्हीही सगळे कान टवकारून ऐकत होतो,. सरांनी आमच्याकडे चोरट्या नजरेनं पाहिलं न पाहिल्या सारखं केलं,
" अरे तू मराठीचा प्रोफेसर नां मग श्लेश्मा या शब्दाचा अर्थ तुला माहीत नसावा ?
सर आता आणखीणच गोंधळून त्यांच्याकडे पहात होते.... आणि आम्ही मुलं उत्सुकतेने....
आणि मग नावाचा अर्थ ऐकून आम्ही सगळ्यांनीच वर्षभराचा हसण्याचा कोटा संपवला...
सरांचं काय झालं ते सरच जाणोत...अर्थ होता....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेवटी मैडम नी "श्लेश्मा " नावाच्या अर्थाचा भोपळा फोडला ................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"शेंबूड"....!!!!!
"समिधा"