"देवाशी भांडण" या लेखावरिल वरील आपले विचार काही पातळी वर समर्थनीय वाटतात तर काही पातळीवर मनाला पटत नाहीत .
एक म्हणजे "देवाशी भांडण" करणारी स्त्री ही पुरुष प्रधान समाजरचनेला शरण गेलेली पापभिरू स्त्री वाटते .किंवा कदाचित ती खरोखरच दुस-याच्या उद्धारात आपला उद्धार आहे असे समजुन उमजुन 'सवत ' घरात आणून स्वत:च्या स्वत्वाला मिटवून 'मोठ्या हृदयाची म्हणून त्यागमूर्ति झालेली 'निष्ठावान स्त्री असावी असे वाटते .
पण दूसरी आजची आधुनिक बुद्धिवादी स्त्री मला अधिक खरी वाटते . कारण ती तिच्यातील स्वत्वाशी ख-या अर्थाने निष्ठावान आहे , त्यामुले ती पुरुषी समाज रचनेला शरण जात नाही की त्याग मूर्ति हो सार्थक्यही मिळवत नाही .ती आपली निष्ठा डोळसपणे जागवते/जगवते म्हणून कोणतीही सजग आधुनिक स्त्री जेंव्हा तिला कळते की , आपला नवरा आपल्याला मूल देऊ शकत नाही तेंव्हा ती आधुनिक बुद्धिवादी
स्त्री डोळसपणे परिस्थितीचा स्वीकार करते 'त्याचा ती त्याग करत नाही तर उपलब्ध सर्व उपचार उपायांचा अगदी 'दत्तक ' घेण्याचाही निर्णय घेण्यास तयार असते . पण जर याच्या उलट परिस्थिति असेल तर ...?पुरुष काय करेल , जरी त्याची मूल्य, निष्ठां कितीही घट्ट असले तरी परिस्थितीला मुरड घालणार नाही .... तो मुल्याना त्याच्या निष्ठेला मुरड घालेल ....! (म्हणजेच स्वत:ची समाज मान्य सोय पाहील )
त्यामुले आजच्या आधुनिक बुद्धिवादी स्त्रीचे वागणे व तिची बदलाणारी मूल्य ही तिच्या ठायी बदलत असणा-या सक्षमतेचे प्रतिक आहे असे वाटते .....!
एकुणच जगण्याच्या मुल्यांचा विचार केला तर जसे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . मग मानवी मूल्य काळाप्रमाणे बदलणारच .....त्यांच्यातही परिवर्तन घडणारच (कारण आज परिस्थितीला मुरड घालण्यापेक्षा मुल्यांना मुरड घालणे अधिक सोपे झाले आहे )
मुल्यां बाबत अधिक व्यापक विचार केला तर "जेंव्हा मूल्य ही मानवी जीवनाची वृत्ति बनते तेंव्हा मानव स्वत:पासून मुक्त होउन सर्वांशात जाउन मिळतो ....! अर्थात मुल्य आपला आत्मशोध आहे जो परमात्म्याशी जाउन मिळण्याची शक्ति आहे ऊर्जा आहे . आणि अशी ऊर्जा स्वत:पार होउन इतरांच्या ठायी आनंद देण्यास आपल्याला उद्युक्त करते ...! आणि म्हणुनच 'आनंद ' चित्रपटातील 'आनंद' मला खरा वाटतो ....!
थोडक्यात आजची परिवर्तनशील मूल्य आजच्या जगण्यासाठीची गरज असेल व "जगण्याशी प्रमाणिक असतील" तर ती लेखन आणि प्रत्यक्ष जगण या दोन्ही स्तरांवर स्विकारावीच लागतात ….!
" समिधा "