आजचा समाज कुठे चालला आहे …. ? जुन्या पारंपारिक नितिमुल्याना चिकटून बसलेला समाज आजच्या यंत्रयुगात माणसाच्या मनात संघर्षच निर्माण करीत आहे . माणसाचा माणसावरचा विश्वास उडत चालला आहे . भोगवादाच्या आणि वासनेच्या नशेचं प्रमाण वाढत आहे . जुनी नैतिक मूल्य जोपासली जात नाहीत . पैशाला अवास्तव महत्व आल्यानं कुठल्याही नितिमुल्यांची चाड न बाळगता तो मिळवण्याच्या मागे माणूस धावत आहे . भावभावनांनाही बाजारी स्वरुप येत आहे की काय असं वाटत आहे .
यंत्राला मन नसतं , अगदी संगनकावरही हुकूमत चालते ती माणसाची . जो पर्यन्त माणसाच्या मनाची जागा यंत्र घेऊ शकत नाही तोपर्यन्त माणसाची मन:शक्ति सर्वश्रेष्ठच राहणार . म्हणुनच मला वाटते की माणसाच्या प्रेमभावना , वात्सल्यभावना आणि स्नेह्भावना जपनं आवश्यक आहे . या भावनांचे बंध गुंफणारी नवी मूल्य आणि त्यावर आधारलेला समाज व कुटुंबव्यवस्था निर्माण करणे अधिक निकोपपणाचे ठरेल असे वाटते …!
" समिधा "