" मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर …!!"
एखादी गोष्ट हानिकारक आहे कळतय पण मन काही ऐकत नाही ....!! नको वागू तसं , नको करू तसं
तरी हेकट (हलकट) मन जातंच त्या वळणावर …!! नुसतं जात नाही चांगलं फिरून येतं मनसोक्त ....!! किती हाकलांवं तिथून पण जरा वेळ हलेल तिथून आणि पुन्हा वाटा शोधत तिथेच पोहचेल …!!
मनाचा मनाला दम देऊन पाहिला…, शेवटी आपल्यालांच भोगावे लागेल , असं मनाला समजावून पाहिले !
शेवटी याची , त्याची जवळच्यांच्या शपथा घेऊन संपल्या …!! पण मनाला आवर नाही …!!
मनाने मनाचं ऐकलं नाही तर फार फार वेदना होतात …… पश्च्चातापाच्या !!!
शेवटी जग्गनीयतां निर्मिकालाच धरते धारेवर .... आता तू तरी सांभाळ …! तुझ्या शिवाय कोण तारील मला ?? तुझी शपथ पुन्हा असं करणार नाही …!!
पण तोहि हरतो काही दिवसात …! आणि मनही …!! जाते त्याच वाटेवर … पुन्हा पुन्हा सर्वदूर …!!!
"मन भुकेला भुकेला
नाही त्याला समाधान
कसा आवरावा त्याला ??
कसा आवरावा त्याला ??
मन चंचल , बैचेन "
"समिधा "