"केव्हातरी या स्वप्नातुनी
पड़ेन का मी बाहेरी
एकदाच , जाईन जेंव्हा मी
अखेरच्या त्या माहेरी
तेंव्हा ही पण असेल माझ्या
सूत्र प्रीतीचे हेच गळां ,
भाळावरती असेल तेंव्हा
अहवतेचा हाच टीळा| "
आता एवढे विवेचन केल्यावर वाचणा-यांच्या भुवया कदाचित उंचावल्या जातील म्हणजे मी "मंगळसूत्र " न घालना-या स्त्रियांना हिंदू संस्कृतिच्या मारक तर ठरवित नाही …?
थोडक्यात आजच्या आधुनिक स्त्रीचे विचार आणि कृती दोन्हींचा गोंधळ उडालेला दिसतोय ..! म्हणजे " मंगळसूत्र" हे स्वरक्षण आहे , परंपरा संस्कृती आहे , की केवळ एक आभूषण आहे...? आजच्या समाजातील स्त्री पुरुष विशेषतः स्त्रीया या "मंगळसूत्राला" नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहतात हे समजून घ्यायला आवडेल ...!
"समिधा"
पड़ेन का मी बाहेरी
एकदाच , जाईन जेंव्हा मी
अखेरच्या त्या माहेरी
तेंव्हा ही पण असेल माझ्या
सूत्र प्रीतीचे हेच गळां ,
भाळावरती असेल तेंव्हा
अहवतेचा हाच टीळा| "
कवितेच्या या ओळींमध्ये एका विवाहित स्त्रीची कपाळावरचं कुंकु आणि गळ्यातलं "मंगळसूत्र " या अहवतेच्या या लेण्यांसह अंतीमच्या माहेरी जाण्याची इच्छा दिसते ....!! आपल्या भारतीय संस्कृतीत "कुंकु" आणि " मंगळसूत्राला " एखाद्या स्त्रीच्या ठायी हे एवढे महत्व आहे !
स्त्रीच्या लग्नानंतरच्या तिच्या आभूषणांत "मंगळसूत्र " हे एक आभूषण वाढलेले असते …एक "दागिना" एवढीच किंमत असते का "त्याला " त्या दागिन्यात कुणाच्यातरी हक्काची बायको हेच फक्त अधोरेखित होते का ....? खरच गळ्यातील हे काळे मणी स्त्रीच्या अस्तिवाला संरक्षण देतात का असा विचार केला तर हल्लीच्या समाजात वावरताना मला आज अश्या अनेक स्त्रीया दिसतात ज्या विवाहीत सधवा असूनही मंगळसूत्र घालीत नाहीत …! का …? कदाचित ते त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आड़ येत असावे .... किंवा "मुक्त स्त्रीमुक्तीच्या भूमिकेतून "मंगळसूत्राला " एक "दागिना " या पलीकडे महत्व त्यांना द्यावेसे वाटत नसावे .... ! किंवा अगदी साधेसे कारण मॉडर्न आउटफीट वर ते आउटडेटेड फॅशन केल्या सारखे वाटत असावे ....!
आता एवढे विवेचन केल्यावर वाचणा-यांच्या भुवया कदाचित उंचावल्या जातील म्हणजे मी "मंगळसूत्र " न घालना-या स्त्रियांना हिंदू संस्कृतिच्या मारक तर ठरवित नाही …?
पण खरं तर मला वेगळाच प्रश्न पडला आहे …! कारण मी आज अश्याही स्त्रीया पहाते आहे ज्या विधवा आहेत …अगदी प्रौढ़ कुमारीका आहेत पण त्याही गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसतात .... ! का …? नव-या शिवाय , एका पुरुषा शिवाय परंपरावादी पुरुषी समाजात वावरताना स्वरक्षण व्हावे या साठी …? बरे हे स्वरक्षण कुणापासून आणि कसे हा मोठा प्रश्नच आहे ! कारण हल्लीच्या काळात मुक्तस्वातंत्र्याचे स्वैर वारे संपूर्ण समाजातच वाहत आहेत ..... त्यामुळे हे "मंगळसूत्र " पुरुष काय आणि स्त्री काय दोघांचेही नित्तिमता आणि नैतिकता टिकवण्या साठी किती उपयोगी आहे हा अभ्यासाचा विषय व्हावा !
खरे तर नवरा नसला म्हणून काय झाले … त्याच्या मागे मी माझे सौभाग्यलेणे का त्यागुं …? या भूमिकेतून ज्या स्त्रीया मंगळसूत्र घालतात त्यांचे कौतुक करावे की "मुक्त स्त्रीमुक्तीच्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीला छेद म्हणून "मंगळसूत्राला " एक "दागिना " या पलीकडे महत्व नाही या भूमिकेतून मंगळसूत्र घालणे नाकारतात त्यांचे कौतुक करावे?
थोडक्यात आजच्या आधुनिक स्त्रीचे विचार आणि कृती दोन्हींचा गोंधळ उडालेला दिसतोय ..! म्हणजे " मंगळसूत्र" हे स्वरक्षण आहे , परंपरा संस्कृती आहे , की केवळ एक आभूषण आहे...? आजच्या समाजातील स्त्री पुरुष विशेषतः स्त्रीया या "मंगळसूत्राला" नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहतात हे समजून घ्यायला आवडेल ...!
"समिधा"