सन २०१५ तुझे स्वागत आहे ....!!
सन २०१४ आज सरत चालले आहे…! तस तशी मनाची घालमेल, हुरहूर वाढते आहे …! प्रत्येक वर्षाप्रमाणे
यही वर्षी परमेश्वरचे नामस्मरण करून नूतन वर्षाचे स्वागत करणार ।! नव्या आशा , नवे संकल्प, नवी स्वप्न, नवी स्वत:ला इतरांना दिलेली वचने पूर्ततते साठी परमेश्वाराची कृपादृष्टि मागणार …!!
मी सहज मागे पहाते … मी हर्मोनियम शिकणार होते … ! कधीपासूनची माझीच ही इच्छा पण दरवेळी अडचणी वाकुल्या दाखवून पूर्ण होऊ देत नाहीत …! यावर्षी पुनः संकल्प केला आहे …! माझी मैत्रीण नंदिनी केंव्हाची तिची नविन पेंटिंग्स पाहायला बोलवते आहे , अजुन मी पोहचले नाही. पुस्तकांचे कपाट , त्यातील पुस्तके रोज येता जाता हाक मारतात । पण त्यांच्याकडे केवीलवाने पाहुन सरळ किचन कड़े धावावे लागते
नाहीतर लेकिच्या चिमुकला आवाजात पुस्तकांचे आवाज विरुन जातात …!
तरीही नव्या आशांनी , नव्या स्वप्नांनी नवीन वर्षाचे माझ्या मनाचे , माझ्या इच्छांचे कैलेंडर भरगच्च
भरले आहे …! नव्या नव्या संकल्पांच्या फुलांनी माझे इच्छेचे झाड़ डवरले आहे !! अवकाश फ़क्त येत्या
दिवसांमधली माझी सृजनात्मक ऊर्जा टिकण्याची .... वाढण्याची....! ती मला लाभो आणि माझ्या सर्व
सहोदरांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ....!
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा …! २०१५ तुझे मन:पूर्वक स्वागत आहे …!!