टॉलस्टॉयची " war and pease " मधील शेवटच्या पानातील काही भाग .
'इतिहास ' या संकल्पनेवरच खुपच विस्ताराने विचार मांडला आहे .
एखादी गोष्ट घडून गेल्यावर खुप काळाने जेंव्हा आपण मागे वळून त्या गोष्टीकडे पहातो तेंव्हा त्या काळी
प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची कारण परंपरा आपण आजच्या परिणामाच्या संदर्भात ठरवत असतो . म्हणजे
समजा , एखादी लढाई होउन गेली . पुढे तिचा इतिहास लिहायचा झाला तर ती लढाई जो जिंकला तोच कसा
शूर होता, त्याची योजना,शिस्त, त्याच्या सैनिकांची स्वामिनिष्टा , सात्विकता , पुण्याई सर्व काही गुणांनी त्याची बाजू अधिक जड़ असल्याने तो जिंकला , आणि त्या मानाने अनेक बाबतीत कमी पडल्याने त्याचा शत्रु
हरला, हेच इतिहासाचे सार असते .
प्रत्यक्षात मात्र परिस्तिथी फार वेगळी असू शकते .कधी कधी असेही असू शकते की , इतिहासकाराने जिंकणा -यांच्या खाती जमा केलेले गुण खरे तर हरलेल्याच्या जवळ असतात . तो कुठेही कमी नसतो . पण
अचानक पाउस येतो , रोगराई येते , अपघात होते , निरोप पोहचवाण्याच्या मार्गात अनपेक्षित अडचणी येतात नैसर्गिक किंवा मानव निर्मित एखादे क्षुल्लक कारण परिणामी फार महत्वाचे ठरते आणि डांव उलटा पडतो .
टॉलस्टॉयची इतिहासाची ही संकल्पना वाचल्यावर एकुणच इतिहासाकडे 'खरे वास्तव ' म्हणून पहावे का .?असा प्रश्न पडतो .! अगदी आताचेच उदहारण म्हणजे संभाजी ब्रिगेड़ने 'ख-या' इतिहासाचे दाखले देत 'शिवाजी महाराजांचे 'दोदोजी कोंडदेव' हे गुरु नव्हतेच ... आणि त्यांचा पुतळा रातोरात हट्वायला लावला .....! शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ महाराज एकदाही प्रत्यक्ष भेटले नाहीत मग ते त्यांचे अध्यात्मिक गुरु कसे ...? असाही ऐतिहासिक प्रश्न विचारला गेला .
पण शेवटी इतिहास हे काळाचे 'चरित्र ' असते ! आणि ते काळा प्रमाणे त्याच्यातही उलथापालथ होत राहणारच ......! आपल्या पर्यन्त आज पोहचलेला इतिहास हा कानगोष्टी सारखा एका कानातून दुस-या कानापर्यंत पोहाचलेला नसेल कशावरून .....? वेगळ्या अर्थी वेगळा अन्वयार्थ घेउन नवी फलश्रुति देणारा इतिहास ! पुढच्या पिढीपर्यन्त पोहचण्या पुर्वीच इतिहास "इतिहासजमा" होउ नये हीच इच्छा .......!
he sambhaji brigade vale jara atich shahane aahe aso !! itihasatun manus khup kahi shiku shakato......aani tyacha fayada mansala hou shakato !!
उत्तर द्याहटवा