मनाला नवे पंख फुटले की माणूस स्वप्नांच्या अवकाशात स्वत:ला झोकून देतो आणि कल्पनातरंगाची अनेक वलये तो आपल्या भोवती वेढून घ्यायला लागला कि नकळत तो स्वत:पेक्षा या दिवास्वप्नामध्येच अधिक गुंतायला लागतो .... !!स्वप्नं भंगली की मन निराश होते …। आणि ते मग सर्वांमध्ये असूनही अलिप्त राहायला लागते … शरीर बोलत असते पण मन .... मात्र कुठल्यातरी नकळत्या कोप-यात एकटेच विचार तंद्रित भरकटत दूर .... जात असते …! पुन्हा पुन्हा ते समोरच्या वास्तवात येण्याचा प्रयत्न करीत असला तरी निराशा तसे करू देत नाही .... ! अश्या निराश मनाला स्वत:भोवती गोळा करण्यास बरेच प्रयास पडतात .... आणि असे मन थकून भागुन परतले कि , समोरच्या वास्तवाशी त्याचे नाते तुटलेले असते वास्तवाचे मन तो पर्यन्त दूर गेलेले असते …!
कधी कधी हे निराश मन … दुस-या मनाचा आधार घेते … त्यावेळी दुस-या मनाने सांत्वन करणे त्याला त्यावेळी हवेहवेसे वाटत असेल तरी सुद्धा त्याला ते मन कितपत समाधान देईल हे परिस्थिति प्रकृतिवर अवलंबून असते …। कदाचित हे दूसरे मनही निराश मनासारखे समदुःखी असेल तर साथ सोबतीने वाटचाल करण्यास त्याना आनंदच होत असतो … ! पण दोघांचा प्रवास नव्या आशावादाकडे होत नसतो …!!
म्हणूनच मनासारखे आशेलाही नवे पंख फुटू शकतात ....! एकीकडून निराशा झाली पण दुसरा मार्ग खचितच मोकळा असतो …! फक्त तो आपण सतर्क व्यापक दृष्टीने शोधायचा असतो …! कारण अनेक मार्ग आपल्या समोर असतात हे काहीअंशी खरे असेल तरी आशेला नवे पंख फुटल्यावर सर्वच मार्ग सुकर वाटतात … आपलेच वाटतात …! म्हणूनच आशेला नवे पंख फुटु दया .... ! त्या पंखानी आपण आकाशावरच स्वार होण्यास सज्ज होणे म्हणजे खरा आशावाद आहे ....!
"समिधा "
एकीकडून निराशा झाली पण दुसरा मार्ग खचितच मोकळा असतो …! फक्त तो आपण सतर्क व्यापक दृष्टीने शोधायचा असतो .
उत्तर द्याहटवाखरा आशावाद !
Dhanyavad ....Datar sir...!
उत्तर द्याहटवाKhup sundar rachana aahet
उत्तर द्याहटवाआकाशात उंच भरारी घ्यावी त्या गरुडाने साध्या चिमण पाखराचे ते काम नव्हे .!! भरारी घेण्यासाठी गरुडाच्या पंखा सारख बळ स्वतः मध्ये एकत्र करावे !!
उत्तर द्याहटवा