"संकलन " हे श्री . बा . जोशींचे पुस्तक वाचले …! यातील प्रत्येक निबंध वाचताना हे पुस्तकच आपल्या संग्रही असावे असे वाटले . लेखक कलकत्त्यातील राष्ट्रीय ग्रंथ संग्रहालयात ग्रंथपाल असल्यामुळे त्यांचे अफाट वाचनाची कल्पना येते …! या "संकलनात " एकूण सतरा निबंध आहेत .
"लिहून छापून नामानीराळे" या लेखाने मी थक्कच झाले . नामांतर वाद आपल्याला नवा नाही पण तो किती जूना आहे हे वाचून गंमतच वाटली .! नाव बदलने हा प्रकार किती रोचक आणि मनोरंजक असू शकतो याची प्रचिती हा लेख वाचून आला . नाव बदलूं लिहिणारे देशी परदेशी लेखक त्यामुळे उडणारे गोंधळ सारे वाचताना मजा येते .
"खोदावया हवे खोल" हा लेख म्हणजे माहितीचा खजिना ! यात पुराविद्येचा परिचय मिळाला .! या पुराविद्येतही प्रागौतिहासिक आणि साधारण पराविद्या असा स्थूल भेद करण्यात येतो . तसेच संग्राहक आणि संशिधक यातही फरक आहे . संशोधनाच्या चार पातळया -
१. भूपृष्ठ संशोधन २. भूमिगत संशोधन ३. जलगत संशोधन आणि ४. आकाशगामी संशोधन या सर्वाँबद्दल वाचने म्हणजे नव्या अद्भुत गोष्टीचा अनुभव घेणे !
"माणुस रविंद्रनाथ " या लेखात रवीन्द्रनाथ टागोरांचा संपूर्ण परिचय घडतो . त्यांच्या स्वभाव वैशिष्टयांपासून ते त्यांच्या आहार शास्त्रापर्यंत , त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून ते त्यांच्या लेखनापर्यंत सा-याचा अत्यंत रोचक भाषेत वेध घेतला आहे .! रवीन्द्रनाथ टागोरांना नविन नविन पदार्थ खाण्याची आणि करण्याचीही आवड होती .! आणि त्यांचा पेहराव निसर्गातील प्रत्येक मोसमाचे स्वागत करणारे असे । या लेखातुन त्यांचे आलौकिकत्व पटते .
यातील "अहिल्या कर्मयोगी " हा लेखहीं असाच सुन्दर आणि रोचक आहे ! पेशवकालिन एक स्त्री . ज्या स्त्रीला दैवाने अनेक समरप्रसंगातून जाण्याचे भाग्य् दिले … त्या दैवालाच तिने जीवनांता पर्यन्त पुजले !
राज्यकरभाराचा भार एखाद्या श्रेष्ठ , धुरंधर राजकारण्या सारखा पेलला …! सासु गोपिकाबाइंच्या मार्गदर्शनाखाली त्यानी प्रजेची सेवा केली ....! त्यांची अहिल्या कर्मयोगिनी ही ओळख मनोमन पटते …!
थोडक्यात "संकलन " हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे .! अनेक अश्या माहिती आपल्याला नव्याने कळतात ! अतिशय रंजक आणि तरीही उद्बोधक आणि संग्रहणीय माहिती या पुस्तकातून मिळते !
पुस्तकाचे नांव :- "संकलन"
लेखक :- श्री . बा। जोशी (लेखक कलकत्ता राष्ट्रिय ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते . )
समिधा
Mahitibaddal Dhanywad !
उत्तर द्याहटवाThanks Datar sir....!
हटवा