आज जागतिक ग्रंथ दिन...
वाचाल तर वाचाल हे आपण सर्वच जाणतो . वाचन संस्कृती जपली पाहिजे , वाढली पाहिजे .
परंतु आजकालची आपली पिढी जास्तीतजास्त फेसबुकवर च्याटिंग करताना दिसते.
वाचनाचे महत्व माझ्या कट्ट्यावरच्या मित्र मैत्रीणीना कळावे म्हणून हा प्रपंच.

"या ग्रंथाचे देणे , कल्पतरुहुन उणे
परीसापरीस अगाध देणे ,चिंतामणी ठेंगणा "
परीसापरीस अगाध देणे ,चिंतामणी ठेंगणा "
अर्थात -वाचनाने मिळणारे ज्ञान आणि आनंद यांचे मोल आपण कधीच करू शकत नाही..
तिथे चिंतामणीहि ठेंगणा आहे. दर्जेदार वाचनाने आपली प्रतिभा अधिक प्रगल्भ आणि
अधिक सकस होते.
निवडक ग्रंथांची आपकमाई गाठीशी असणारा माणूस आयुष्यातील व्यथा वेदनांची गाठोडी
काहीकाळ तरी मानगुटीवरून उतरवून ठेवून स्वत:च्या त्या आनंद गुफेत प्रवेश करून आनंदविभोर
होऊ शकतो. वाचन, मग ते स्वान्तसुखाय एकांती -मुकवाचन , स्वतः शी मोठ्याने केलेले मुखवाचन
असो अथवा प्रीयजनांबरोबर केलेले सह वाचन असो . वाचनाने मिळणारे आंतरिक सुख इंटरनेट
वरील सर्फिंगने नाही मिळत. पुस्तकातील प्रत्येक वाक्यागणिक प्रेत्येकजण आपापल्या मनात
स्वत;ची कल्पना चितारतो .... तो आनंद काही वेगळाच असतो. (मिलिंद बोकील यांचे "शाळा"
पुस्तक वाचले असेल तर याचा अनुभव नक्की घ्याल किंवा डायरी ऑफ ऑन फ्रंक हे पुस्तक
वाचले तर तिचे नाझी छळ छावणीतील भोगलेल्या दुखा:चा जिवंत अनुभव मिळतो. )

यामध्ये सहवाचन हा वाचनाचा सर्वात उत्कृष्ट वाचन प्रकार आहे.कारण सहजीवनाच्या
आंतरिक प्रेरणेचाच एक अविष्कार पुस्तकांच्या सहवाचनात प्रकटतो .
" तुका म्हणे सर्व सुख त्या संगती , घडले पण ते संतांचिया " सहवाचन हि अशीच एक
सुखाची पंगत आहे. सहवाचन म्हणजे सर्वांचे संगतीत केलेले ग्रंथ वाचन . कथा, पोथी -पुराणे
वाचन हे सहवाचनाचे प्रकार आहेत. सर्वाना बरोबर घेऊन घेतलेला वाचनाचा आनंद म्हणजे
काव्यसंमेलन. आणि काव्यसंमेलनातील आनंद म्हणजे परम सुखाची अनुभूति। …!

"समिधा "
तुम्हास आत्मचरित्रं वाचायला आवडतात ना? आयुष्याचं पुस्तक 'नजरे'खालून घालताना किती धडे शिकायला मिळतात! त्यासाठी शब्दांपलीकडचा अर्थ समजून घेण्याची 'दृष्टी' जरूर हवी. स्वत:शी संवाद साधला, अंत:र्मनातील जाणलं की, जगणं, वाचणं, लिहिणं कसं सोपं होतं; नकळत स्फुरत जातं. आत्मानुभूती ही प्रामाणिक अभिव्यक्तीची पहिली पायरी. अर्थात प्रेरणा बनून कोण येईल व आपणास जगायला-लिहायला शिकवेल, स्व:ताशी आपसूक जोडेल, हे तर काळ व नियती ठरवते. आपण व्यक्त होत राहायचे, एखाद्या लहान मुलाच्या कुतुहलाने जग पाहायचे. जगायचं, लिहायचं. झाले-गेले विसरून नव्याने आयुष्याची पाटी गिरवायची. तुम्ही अशाच "लिहित्या" रहा! पुढील सजग, संवेदनशील, तितक्याच सहज-संपन्न लेखन-प्रवासासाठी तुम्हास मनमोकळ्या शुभेच्छा!
उत्तर द्याहटवासमिधाजी आपल्या लेखाचा हेतू उदात्त आहे. पण हे लोकांच्या गळी उतरेल तेव्हा खरे.
उत्तर द्याहटवा