' देव ही एक केवळ संकल्पना आहे
आणि ' देवपण ' हे त्या संकल्पनेचे
मूर्त स्वरुप आहे ...!
देवपण म्हणजे चमत्कार नव्हे ....!
देवपण म्हणजे ईष्ट अनिष्टाची जाण आहे ...!
देवपण म्हणजे शांत निरामय
क्षमाशीलतेचा भाव आहे ...!
देवपण म्हणजे सदैव प्रेम माया लळा
यांचा अविरत वाहणारा स्रोत आहे ....!
देवपण म्हणजे कर्तव्या प्रति भक्ति
आणि लोकांप्रति सहयोगाची आसक्ति
या आणि अश्या सा-या भावभावनांनी
युक्त असा आपली कर्म करतो तो
देवपणाला पोहचतोच .....!
मग ' देव ' आहे की नाही ....?
हा प्रश्न नगण्य ठरतो .....!
म्हणूनच देव माहित होण्या साठी ,
प्रथम ' देवपण ' समजून घेणे जास्त महत्वाचे आहे ....!!
श्रीकृष्णार्पणमस्तु ......!!
' समिधा '
चांगलं, तार्किक विवरण!
उत्तर द्याहटवाथोडं अजुन elaborate केलं तर!!
प्रमोद गानू सर प्रतिक्रयेबद्दल तुमचे आभार ...! तुम्ही म्हणता तसे ते अधिक विस्तृत आणि स्पष्ट लिहीता येईलच ...! पण माफ़ करा मला जेवढा देव आणि देवपण कळले तेवढेच स्वानुभवाने मांडू शकले ....! ते जसजसे कळत जाईल तसतसे त्याबद्दलची माझी भूमिका आणि त्याबद्दलचे विवेचन अधिक स्पष्ट आणि विस्तृत होईल अशी आशा आहे ...!
उत्तर द्याहटवा