"शब्दांनी शब्दांना साथ द्यावी.... "


indian shopping mall साठी प्रतिमा परिणाम

रत्नाचा सकाळीच मोबाईलवर मीस्ड कॉल पाहिला आणि मनातल्या मनात मी समजून गेले , आज बाईसाहेबांच्या गळाला मी लागणार....! म्हणजे आज तिने मला सकाळीच फोन केलाय याचा अर्थ बाकी सख्यांनी तिची नकारांनी बोळवण केली असणार.😃
आणि माझा आज विंडो शॉपींगचा जाम मुड होताच!
जमले तर एखादी खरेदी करण्याचा शॉपींग मानसही होताच😃 त्याच मुड मध्ये रत्नाला फोन केला !
अंजू अगं वीकएन्ड झाला म्हणून काय एवढ्या उशीरा उठायचं ? सुट्टी म्हणजे काय आरामच करायचा का?
चल थोडी मज्जा करून येऊ सेंटरमॉल ला मस्त सेल लागलाय ...!
काय म्हणतेस? चल मग मला पण पाडव्याची ओवाळणी मिळालीय ...!
हं वाटलंच होतं मला म्हणून पहिला फोन तुलाच केला!
मग लेकीला नव-याला मस्का मारून थोडी प्रायव्हसी, स्पेसच्या गप्पा मारून निघाले ....!
रत्ना अनं मी जाम भटक भटकलो ...मोठ मोठी दुकानांची सुंदर सुबक सिरेमैकची मॉडेल आणि त्यांनी घातलेली उंची कपडे मनातल्या मनात स्वत:लापण भारी दिसतील असं इम्याजीन करून आमची मनाची गाडी तोपर्यंत पुढच्या काचांच्या पल्याडला पोहचलेली असायची...! एक दीड तास विंडो शॉपींग करून आम्ही आलिशान सेंटरमॉलमध्ये शिरलो...!
तिथे मला शॉपच्या काचांच्या आड ख-या खु-या सुंदर सुडौल मुली उंची कपडे घालून हसून मुरडत होत्या तसेच पुरूष ही उंची कपडे घालून तसेच रुबाबात हसत होते...! इथे तर सारे अजबच होते! जीवंत माणसे मॉडेल म्हणून काचांच्या कपाटांत उभे करून ग्राहकांना दुकांनामध्ये येण्यासाठी आकर्षीत करत
होते 😞😞😞! बापरे ....मनात म्हटलं माणूस व्यापारीकरणामुळे कुठे जाऊन पोहचलाय...?
ते मॉडेलचे चेहरे वरून हसरे पण आत आत खचलेल्या खाबांसारखे एकटेच कधीही धाय मोकलून कोसळतील असे वाटले ....एकटे ....चेह-यावर फक्त हसू....शब्दांना तिथे काही अर्थच नव्हता! काचांच्या आतून कितीही शब्दांना मोकळे केले असते तरी ते
काचेला थडकून आतच खाली पडून विरले असते!
ते एकटे तसे शब्दही एकटेच...!
अंजू इकडे बघ ...रत्ना ने हाक मारली , मी भानावर आले! ए आपण इकडून या गेट ने जाऊ या
मी : ओके डीयर!:)
तिथे दोन गेट होते ....! तिथून पुढे अजून काही पॉश दुकाने होती ! रत्ना पुढे मी तिच्या मागे ....
हैलो....! कुणीतरी मागून हैलो बोलले होते!
मी मागे वळून पाहिले ....! त्या गेटवर एक मुलगी उभी होती....तिनंच मला हैलो केलं होतं ! मी मागे आले , मीही तिला हसून हैलो केलं! केवढा आनंद झाला तिला ...😃😃 तिचा तो आनंद पाहून मला मात्र प्रश्नच पडला !
काय गं माझ्या एका हेलो ने तुला एवढा आनंद झाला?
हो मैम ...आज खुप खुप दिवसांनी माझ्या हैलोला कुणीतरी रिप्लाय दिलाय.....!
ती तसं बोलली आणि मनात चर्रर्रर्रर्र.....झालं !
मी: म्हणजे?
ती: मैम मी या मॉलच्या गेटवर जॉब करते!
मी: गेटवर ? शिक्षण कमी का?
ती: नाही मैम मी ग्रज्युऐट आहे!
मी: मनातून हबकलेच ...मग गेटवर?
ती: हं फक्त गेटमधून आलेल्या प्रत्येकाला
हसून हेलो करायचे ! पगार चांगला आहे.
सुट्टी पण मिळते महिन्यातून दोन दिवस!
मी: ......गप्पच
ती:. आज किती दिवस मी इथून येणा-या ला हेलो
करते पण प्रत्येकजण स्व:च्याच धुंदीत , कुणाचं
माझ्या हैलोकडे लक्ष तर दुरच पण गेलेच कधी
लक्ष तर रिप्लाय तर नाहीच! पण आज तुम्ही
मात्र मागे फिरून रिप्लाय दिलात..
मी: ..... गप्पच! ती आज धबधब्यासारखी बोलत
होती..आणि मी तिच्या फेसाळत्या बोलक्या आनंदाला
फक्त न्याहळत होते!
तेवढ्यात माझे दुस-या गेटकडे लक्ष गेले.....! तिथे
एक मुलगा असाच हिच्यासारखाच उभा होता! पण
तो जरा विचीत्रच वागत होता! त्याच्या एका हातात आरसा होता आणि त्या आरशात स्वत:चा चेहरा पाहून तोंड वेडवाकडं करून हैलो हैलो करत होता!
मी : हे काय करतोय वेड्यासारखा? एकटाच काय
असा हैलो हैलो करतोय?
त्या मुलाचा हैलो हैलो करतानाचा तो केवीलवाणा
चेहरा पाहून मन गलबललं!
ती: हं तो पण माझ्या सारखाच गेटवर जॉब करतोय!
आजकाल जॉब मिळणं कठीण ! तो तर एम बी ए
आहे! त्याच्या गेटवर मुळात येजा कमी, गेले दोन वर्ष तो तिथे हैलो हैलो करतोय पण रिप्लाय मिळतोच असं नाही ! आणि दोन आडवड्यापासून तो एकटाच हैलो हैलो करतोय...स्वत:ला रमवतोय!
मी : तो मन रमवतोय की एकटेपणाच्या अबोल्यात
गुरफटत खोल खोल बुडतोय... भासांच्या अंधारातून
तो रिप्लायचे शब्द शोधतोय....?
कित्ती कित्ती भयंकर आहे हे सारे....! माझेच शब्द माझ्या घशात अडकल्यासारखे ... आत आत एकदम घुसमट जाणवायला लागली.....! मनातल्या शब्दासकट माझा कोणीतरी गळा दाबतोय असं वाटलं ! शब्द अडकले होते ...
त्यांना व्यक्त व्हायचे होते ... पण ते एकटेच होते
त्यांना रिप्लाय नव्हता .....मग ते पुन्हा आत आत गुरफटून मौनात गेले ...!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
तुम्ही विचार करीत असाल , असंलं कसलं सेंटरमॉल मला कुठे सापडलं? पण मित्र हो हे काल मला पडलेलं स्वप्नच आहे! स्वप्नातलं जग आपल्या वास्तवातल्या जगाची जाणीव करून देतं !
दोन जीवलग मैत्रीणी काय मित्र काय भेटल्यावर
ज्या आनंदानं उत्साहानं भेटतात , बोलतात तो जो शब्दा शब्दांचा संवाद असतो तो मनामनांचा मोकळ्या आकाशातला एक निश्चिंत विहार असतो! ज्यानं जुन्याच आठवांतून जुन्याच शब्दसोहळ्यातून नवा आनंद आणि नवी उर्जा मिळते!
हो याच नव्या उर्जे साठी आम्ही सर्वजणी सख्या कॉलेज सोडून वीस बावीस वर्ष झाली त्यानंतर भेटलो प्रथमच भेटलो ते माझ्या " माझे तुला नि:शब्द शब्द" या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसेहळ्याच्या निमीत्ताने! तेव्हा केवळ एकमेकींना भेटलो पण दि.२७/१०/०१७ ला पुन्हा भेटलो ते मात्र फक्त बोलण्यासाठी .... प्रत्येकीला बोलायचं होतं! ज्योती तर म्हणाली भेटून मोकळ होणं महत्वाचं !
खरंच आहे खुप खुप साचलेलं असतं ... ते जीवाभावाच्या सानीध्यात मोकळं करावसं वाटतं!
मोकळ केलं की कसं मन पिसासारखं हलक होतं !
शब्दाला शब्द मिळाला की संवादाची माळ तयार होते! शब्दांना रिप्लाय मिळाला की आपल्या शब्दांना ही एकटं वाटत नाही .... संवाद बहरतो तो शब्दांना सोबत मिळते तेव्हाच! तोच बहर आम्हा सर्व सख्यांनी कित्ती कित्ती वर्षांनी अनुभवला! आम्ही पुन्हा पुन्हा भेटू मोकळं होण्यासाठी ! या दिवशीचं हे सारं सारं एका मनाच्या गाठोड्यात बांधून. जीनं तीनं आपआपला आनंदाचा वाटा घेऊन घरी गेल्या अगदी पिसासारख्या हलक्या होऊन! पुन्हा भेटायच्या ओढीनं!
तर मित्र मैत्रीणींनो बोलत रहा , शब्दांनी शब्दांना जोडत रहा... मग तुम्हीही एकटे नाहीत आणि शब्दही!
                               💝🌷💝🌷💝🌷💝🌷💝


©    समिधा

३ टिप्पण्या:

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......