" तुझसे नाराज नहीं ..... मगर हैरान हूँ ...!!"



Image result for AAMIR KHAN IN LAGAAN

 

   "आमिर खान" पर्फेक्टनिस्ट  ! माझा अगदी कॉलेज पासून रोल मॉडेल आहे.  आणि माझा रोल मॉडेल किती परफेक्ट होता हे जसजसा काळ पुढे जात होता तस तसे सिद्धही होत होते. दिवसेंदिवस त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर वाढत होते   ...! त्याचे एका पेक्षा एक सुंदर अर्थगर्भ आणि मनाचा वेध घेणारे सिनेमा येत होते.  खरं तर जस जसा तो वयाने वाढत होता तस तशी त्याच्यातील संवेदनशीलता अधिका अधिक व्यापक होतानाचा प्रवास थक्क करणारा होता   ....! अगदी "कयामतसे क़यामत तक"  ते "पीके " पर्यन्त त्याने 
 स्वत :च्या अभिनय क्षमतेवर आणि समाजमनावरील विशिष्ट संस्कारांवरही अतिशय प्रभावी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला   ....!  कधी तो या प्रयोगात "तारें जमीं पर " "थ्री ईडियट्स" या सारख्या चित्रपटातील भाष्यातून कमालीचा यशस्वी होतानाही पाहिले तर कधी "पीके" सारख्या चित्रपटातून थोड़ा अयशस्वी, गोंधळलेलाही दिसला ! "सत्यमेव जयते "  या कार्यक्रमातून त्याने भारतातील  राजकीय, सामाजिक, कौटुंबिक एकूण सर्वच स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनते समोर अनेक गोष्टी उघड केल्या , त्यावर चर्चा घडवून आणल्या आणि जनतेच्या सक्रीय सहभागातून अनेक प्रश्नांची उत्तरे   मिळवण्याचा प्रयत्नही केला  ...! त्यावेळी तर मला आमिर खान बद्दलचा अभिमान अधिकच वाढला ! प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मला  एक गोष्ट मनाला समाधान देऊन जायची  की , हा माणूस केवळ एक्टर नाही , हा हौस  म्हणून सिनेमा करीत नाही  किंवा केवळ पैसा कमावणे हाच याचा उद्देश नाही तर एक भारतीय म्हणून , एक जबाबदार नागरिक म्हणून.,
एक सजग संवेदनशील माणूस म्हणून समाजप्रती आपली जबाबदारी स्वीकारुन या माध्यमातून तो देशसेवा करीत आहे   ..! समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे !   आपल्या देशवासियांना प्रतिकूल परिस्थितिशी 
लढण्यासाठी स्वत:सोबत समाजातील सर्वच घटकांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील एकीची शक्ति जागृत करून  हा "सेक्युलर" भारताला बळकट करण्याचे किती महत्वाचे कार्य अगदी विचारपूर्वक करीत आहे  ...! 

     आणि एका क्षणी मला " महात्मा गांधींचे " आभार मानावेसे वाटले   ...  हिन्दुस्थान  / पाकिस्तान  फाळणीच्या वेळी ज्या मुस्लिम बांधवांना  हिंदुस्थानच  आपली मातृभूमि आहे असे वाटते ते हिंदुस्थानात राहतील असे घोषित केले आणि म्हणून आज " आमिर खान " आपला आहे ! आमचा  " हिंदुस्थानी " आहे ! 

     पण  परवाच्या त्याच्या वक्तव्याने मात्र  मी चकित झाले   ....!! भारतात असहिष्णुता वाढत आहे ! माझ्या पत्नीला आमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते ! तिने मला देश सोडण्याबाबतचा विचारही  बोलून दाखवला ! हे आमिर खान बोलू शकतो ह्या वर विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण  होते ! कारण मिडिया ध चा मा करण्यात पेशवेकालीन आनंदीबाईंचा सीक्वेल आहे   !! 

     भारतातील असहिष्णुता वाढत आहे   ... म्हणजे भाजप सरकार हे हिंदू प्रणीत सरकार आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे असे म्हणायचे आहे का ?  मग कांग्रेस सरकारच्या काळातील मुंबईतील केवळ मुस्लिम समुदयाने केलेली दंगल आणि महिला पोलिसांचा केलेला विनयभंग  , केवळ  मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवुन कांग्रेसने अनेकदा मुस्लिमेतर समाजाची केलेली पिळवणूक , त्यावेळी सहिष्णुता कुणी दाखवली?  पण त्यावेळी तू काही असहिष्णुते बद्दल बोललेले मी ऐकले नाही!  मला वाटले , बरेच आहे तुझ्या सारख्या विवेकी माणसाने अश्या समाजाचा एक व्यक्ति म्हणून स्वत:ला का " पेश " करावे ?
तू  " न्यूट्रल " राहून आपले कार्य करतो आहे , किती महान !!

     तुझ्या पत्नीला तुमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते   ...  म्हणजे ? हिंदुस्थानात इतर मुले नाहीच का ? त्यांच्या भविष्याचा विचार तू करणार नाहीस ?  मग तारें जमींपर  सोडून देणार तू ? इतका आत्मकेंद्रित कधीपासून झालास ? ज्या हिंदुस्तान मध्ये तुझे भविष्य घडले जे आज सर्व जग पाहत आहे त्या हिन्दुस्ताना बद्दल तू असा कसा बोलू शकतोस ?  पाकिस्तानातील  मुलांचे भविष्य तुला माहित आहे ? नोबेल विजेति " मलाला" आज  पाकिस्तान सोडून अमेरिकेत आहे !  का ? ती  तर तिच्याच मातृभुमित पाकिस्तानात नकोशी आहे ! का ? एका  मुस्लिम राष्ट्रात एक सुधारणावादी , पुरोगामी विचारांची मुस्लिम शाळकरी मुलगी नको  आहे ! का ? आणि तू म्हणतोस तुझ्या मुलाचे भविष्य धोक्यात आहे !!

     आणि सगळ्यात कहर म्हणजे तू पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणतोस तुझा देश सोडण्याचा विचार आहे!  तो तूच आहेस ना ? जो अतुल्य भारत म्हणत , सत्यमेव जयतेचा घोष करीत देशाच्या एकतेसाठी आणि एकूणच देशाच्या प्रतिमेला अधिका अधिक उज्वल प्रकाशमान करण्याची ग्वाही देतोस ! आणि आज तू सगळ्या समस्यांपासून पळ कसा काढतोस ? तुझा तुझ्यावरील विश्वास उडाला आहे की तुझ्या मातृभूमीवरील ? तुझ्या अश्या विधानांमुळे तू आपल्या मातृभूमीचा , आम्हा सर्व भारतीयांचा अपमान केला आहेस !

     तुला जर खरच असे असुरक्षित वाटत होते तर आपल्या भारतीय बांधवांशी मोठ्या विश्वासाने संवाद साधू का नाही शकलास ? तू संवाद साधलास पण चुकीचा,संशयास्पद सर्व भारतीयांना गृहीत धरून आणि अतिशय बेजबाबदारपणे !तिथे  " सरफ़रोश " मधील ACP अजयसिंघ राठोड  कुठेच दिसला नाही ! " लगान " मधला भुवनला तू कसा विसरलास ? आम्ही तर त्याला आमच्यात जगवण्याचा प्रयत्न करीत आहोत   ...! आणि तूच आता अश्या आपल्याच शिलालेखांना  उध्वस्त करीत चालला आहेस ?  तुझा प्रवास प्रकाशाकडून अंधाराकडे होत आहे !!

      प्रिय आमिर " तुझसे नाराज नहीं  ..... मगर हैरान हूँ   ...!!"



                                                                                         " समिधा "




     

" घन दूर अंधाराचे …!! "


 
 मन मनास सांगे 
नको आकारु 
रूप दुर्दैवाचे   .......

     मन मनास सांगे 
     शोध आधार 
     रूप सौजन्याचे  ……  

मन मनास सांगे 
नको घाबरु 
जग लढणा-यांचे   ……

     मन मनास सांगे 
     कर प्रकाश 
     घन दूर अंधाराचे   …!!
     घन दूर अंधाराचे   …!!
 
माझ्या सर्व सुहृदय मित्र मैत्रिणींना  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीपावलीच्या नव  तेजाने सर्वांची आतंरिक मनं उजळून जाउ देत  ....!
नव प्रकाशाने आत्मरंगी नवचेतना  उमलू दे  ....!!

                                                                                       " समिधा "


" हतबल …!"


 
     तो तिला बोलत होता    …  तो बोलत नव्हता तर तिला अनुकूचीदार , धारदार शब्दांनी सोलत होता ! तिच्या असण्या नसण्याची लक्तरे सर्वांसमोर फेडत होता   …! तिच्या शरीरावर  घाव असतीलच पण आता ते मला आणि माझ्या सारख्या इतरांना दिसत नव्हते    !  पण आता तिच्या मनावरचे घाव मला तरी  बसत होते ! तिच्या भावनांच्या या उड़ना-या चिंधड्या आणि त्यामधून तिची आर्त वेदना  आणि आक्रोश माझ्या आणि माझ्या सारख्या तिथे हज़र सर्वच जणींच्या मनापर्यंत पोहचत असलेच   …!!!

     ती स्त्री दिवसभर लोकल ट्रैन मध्ये भेळ विकून आपल्या तोड़मोड़क्या संसाराला हातभार लावणारी व  कष्ट करून आपल्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणा साठी तिच्या भविष्या साठी धडपडणारी मायमाउली होती! आणि तो पुरूष तिचा मालक/नवरा होता (परंपरेने  नव-याला मालक बोलविले जाणे म्हणजे नवरा बायको यांच्यातील  स्तर इथेच नोकर मालक  म्हणून अधोरेखित केला जातो ) दिवसभर कष्ट करणा-या आपल्या हक्काच्या बायकोकडे दारु पार्टी साठी तो पैसे मागत होता आणि ती ते द्यायला तयार नव्हती ! त्याला नकार  म्हणजे  … नव-याला नकार मग मालकाच्या आवेशात तिला भर लोकांमध्ये शिव्यांची लाखोली वाहत होता !
(घरातील  शाररिक आणि मानसिक त्रास याची कल्पनाच नको )

"अगं  ये x x x x x ने  मला पैसे दे !
मारुन टाक तुझ्या पोरीला   ....!
कायला तिला उरावर घेऊन राहलियस … ?
रांडेचे तुझ्या x x x x x "
असं आणि बरच काही    ....!

      त्याला नाही पण तिला आजूबाजूचं भान होतं  . तो जेवढ्या रागाने आणि त्वेषाने तिच्या कानाजवळ ओरडत खेकसत शिव्या देत होता तितक्याच संयमाने आणि शांतपणे ती त्याला थोपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती !  आणि मी , आजूबाजूचे आम्ही काय करत होतो ?

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  अश्या परिस्थितीत स्त्रियांना मदत करणारी कोणतीच यंत्रणा नाही का   …? अश्यावेळी पोलिस ख़ास करून लेडीज पोलिस आसपास असणे किती गरजेचे आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली ! दूसरे काही नाही पण त्याला शाब्दिक दम देऊन तत्पुरता तिचा होणारा मानसिक छळ तरी थांबवता आला असता ! म्हणून मी पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक फेरी मारून आले पण मला साधे  रेल्वे  पोलिसही दिसले नाहीत ! हा मी सभ्यपणे  कायद्यात राहून केलेला एक "निष्फळ" प्रयत्न !

    मला त्याचा भयंकर राग आला होता ! अश्या परिस्थितीत वाटत होते त्याच्या कॉलरला पकडून चांगले लाथाबुक्क्यानी , कानाखाली दोन चार लगावून बदडून काढावे !  हा मी केलेला  असभ्यपणे कायदा मोडून तिला मदत करण्याचा "निष्क्रिय" प्रयत्न !

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  मी माझ्या आजूबाजूच्या बायका पोरींना विचारले आपणच जरा त्याला "समजवावे"  का ?  पण कोणी "तो दारुड्या आहे आपल्यालाही काहीतरी बोलायचा , त्यांच्या भांडणात पडणे नकोच! बरे दिसेल का? उगीच लोकांना शोभा !  त्यांना कसली आली आहे अब्रू आपल्याला ते शोभत नाही ! त्यांचे ते पाहुन घेतील ! आणि मग हळूहळू एक एक जण तिथून काढता पाय घेऊ लागल्या !

     आता मला भयंकर राग आला होता !  माझा, माझ्या आजूबाजूच्या सुसंस्कृत म्हणवणा-या लोकांचा, आमच्या असंवेदनशील  संस्कारांचा , आमच्या सोकोल्ड सभ्यपणाचा  आणि यातून येणा-या वांझोटया भितीचा आणि  "बृहन्नडा"  हतबलतेचा   ……!!!

                            " समिधा "





      



एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

 

     किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिकाव्याने हल्ला करावा आणि जीत्या जागत्याला आपल्यापासून दूर दूर न्यावे   …!  जिथे त्याला आपली हाक ऐकू येत नाही   … आपला आक्रोश  … आपले आक्रंदन  दिसत नाही   ! या सा-याच्या पलीकडे तो निघून जातो   …!  मागे उरतात आपले कोंडलेले श्वास आणि अधीर मन आणि मनाचा न दिसणारा कोंडमारा  !  गेलेल्याचे दुःख असते  की त्या सोबत उरलेल्या आनंदाच्या  ठेव्याचे आता काय करायचे याचा शोक असतो  …!!  असा "तो" आपला मित्र असतो आप्त असतो  आणि कधी कधी कुणीच नसतो   … पण काही क्षण जरी आपण "त्या" व्यक्ति सोबत घालवले असतील तरी पुढच्याच काही काळात तो आपल्यातून गेला तरी हृदयात खोल खोल खड्डा पडतो ....! अदॄश्य दुःखाची कळ छातीत येतेच  येते ....!!


           अगदी अलीकडेच आमच्या कॉलनीत  एक ड्रेस मटेरियल चे दुकान उघडलेले होते ! गेला आठवडा मी
ते पाहत होते ! दुकानाबाहेर लावलेले ड्रेसेस रोज पाहत होते,  आणि एकदिवस शेवटी त्या दुकानात प्रवेश केलाच   ....  तिथे एक २४/२५ वर्षाची लग्न झालेली मुलगी होती , तीचेच ते कलेक्शन होते! मोठ्या आवडीने तिने मला खुप सारे ड्रेसेस दाखविले, एक दोन मी  घेतलेही पण घरी येऊन पाहिले तर एक छोटा तर एक मोठा होत  होता  . पुन्हा मी  तिच्या दुकानात गेले  , तीनेही न वैतागता न रागवता अगदी हसत मला पुन्हा ड्रेसेस हसतमुखाने आणि तेव्हढ्याच उत्साहाने दाखवले   … पुन्हा घरी येऊन तेच छोटा मोठा  ! आता जर मी  तिच्या कड़े पुन्हा ड्रेसेस बदलायला गेले तर ती  नक्कीच वैतागणार म्हणून मी जरा कचरतच तिच्या दुकानात गेले पण तिच्या चेह-यावरचे तेच हसमुख भाव ! मग मात्र मला तिच्या बद्दल अतीव प्रेमच वाटले !

       थोड्या आस्थेनेच तिच्या दुकानाची तिची माहिती विचारली   … आज तिच्या दुकानात तिचा नवरा आणि तिची दीड वर्षाची छोटुली मुलगी पण होती  !  तिने सांगितले तिचे वडील लहानपणीच वारल्याने आईसोबत लहानपणापासूनच काहिनाकाही कष्ट करायची आवड होती ! लग्न झाल्यावरही हा उत्साह कमी नाही  झाला।    दुकानात तिने ड्रेसेस सोबत इमिटेशन ज्वेलरी पण विकायला ठेवली होती.   घर मुलगी संसार  सारे सारे सांभाळून ती स्वतः सर्व खरेदी करण्यासाठी दादर मुंबई ठाणे इथे प्रवास करायची   …! ताई मला अजुन खुप वाढवायचे आहे माझे दूकान   । ही तर अजुन सुरवात आहे ! मीहि तिच्या मेहनीति स्वभावावर खुश झाले , तिचा तो उत्साह पाहुन तिचे कौतुक वाटले। . आणि नको असताना अजुन दोन अधिकचे ड्रेसेस तिच्याकडून खरेदी केले ! आणि माझ्या मैत्रीनींनाही तिच्या दुकानाची माहिती देईन हाँ असं तिला सांगितले तर तीला आनंदही झाला ! हसत हसत मी तिचा निरोप घेतला  !

       नंतर मी एकदोन  दिवस येता जाता तिला कधी लहानग्या मूली सोबत गि-हांइकाना हसतमुखाने ड्रेसेस दाखवताना पाहत होते   …!  पण एक दिवस  दूकान बंद दिसले मला वाटले आज सोमवार म्हणून दूकान बंद असेल ,  पण नंतर दोन दिवस दूकान बंदच होते !  माझे मलाच वाटले गेली असेल गावी, किंवा नव-या बरोबर मुलीसोबत फिरायला  … ! पण सलग एक आठवडा दूकान बंदच होते , खरंतर मला असंच दुकानातून ज्वेलरी पहायची होती  .   पण दूकान बंदच ! तिला भेटून एक आठवडा उलटला होता  .

      त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी लेकिला शाळेच्या बसवर सोडायला मी घराच्या गेटपाशी उभी होते
माझ्या सोबत अजुन एक दोन जणी आपल्या मुलांना घेऊन उभ्या असतात  .  बस आली मुले गेली की आम्ही काही मिनिटे बोलत असू  … आणि बोलता बोलता माझी मैत्रीण दीपिका बोलली  अगं आमच्या बिल्डिंग मधली एकजण गेली ना अचानक   … ! मी विचारलं कोण गं ?  अगं तीच जिचे ते नवीनच कोप-यावरचे ड्रेसचे
दूकान होते !  ती अशी बोलली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! डोळ्यापुढे अक्षरशा अंधेरी आली ! कसेतरी तोंडातून शब्द आले , अगं काय सांगतेस काय ? गेल्या आठवडयात तर मी तिच्याकडून चार ड्रेसेस घेतले ! किती गोड हसमुख मेहनती होती  गं  ती !  काय  झालं काय गं तिला !  हार्ट अटॅक  आला असं कळलं ! काय ? एवढ्या लहान वयात ? खरच माणसाचं काही काही खरं नाही  !

       मला प्रचंड मोठा धक्का होता तो !  तसे काही नाते नव्हते तिच्याशी पण तरीही तिच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांसोबत नकळत  तिच्या स्वप्नांशी माझे नाते जोडले गेले होते !  तिच्या हसमुख मेहनती स्वप्नाळु कष्टांसोबत मनाचे भावबंध जोडून बसले होते !  तिच्या त्या छोटुल्या लेकिसोबतच्या तिच्यानंतर तिचं कसं होणार ह्या काळजीसोबत मीही काळजीत पडले होते !  किती किती नात्यांनी मी जोडले गेले !  तिची स्वप्न इथेच ठेवून गेली ती माझ्या जवळ   … त्यांचांच आक्रोश माझ्या मनात उमटत होता पण तो तिच्या पर्यन्त कसा जावा  … ?

        जे अवेळी जातात त्यांच्या स्वप्नांचे काय करावे ?  त्यांनी योजून ठेवलेल्या प्लॅन्सचे  काय करावे? त्यांनी त्यांच्या जीवन डायरीची काही पाने आगाऊच लिहिली असतील त्या पानांचे काय करावे?  चटका बसतो जिव्हारी अश्या "अवेळी" गेलेल्यांच्या सरणावरील ज्वाळांचा   .... आपण कितीही दुरुन त्यांना पहात असलो तरी ! मग त्यांच्या सोबतच्या  अद्वैतांचे काय होते  ?  ते जळतात आयुष्यभर काळ  कितीही लोटला तरी   … मध्ये मध्ये आठवत राहते त्यांची सोबत  … ! कितीही हळुवार असली तरी चटका देणारीच   ....!

      किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!



                                                                                         "  समिधा "

     



         

" सारं सारं जपून ठेवलय .... !! "


 

प्रिय  ....,

     तू लिहिलेल्या  "त्या " ओळींवरून प्रेमळ नजर फिरवली  .... अलगद हात  फिरवून त्यांना स्पर्श केला तेंव्हा  खुप दिवसांपासूनची तुझी अक्षरं मायेच्या , प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेली वाटली   ....  माझ्यासारखीच   …!! 

     तू दिलेले घडयाळ जपून ठेवलय ....! त्या वेळेसारखंच जेंव्हा तू अनं मी वेळेचे भान विसरून बोलत असू  …
ते शब्द आणि त्या मागील अर्थ जे तेंव्हा समजले  अनं  काहींचे अर्थ जे अजूनही वेगवेगळ्या संदर्भात शोधून लावत असते  .... तुला पुन्हा पुन्हा नव्याने भेटत असते  … पारखत असते  .... शोधत असते  ....!! 

     तू दिलेले पेन जपून ठेवलय  … !   पेनातली शाई कधीच संपलीय  … पण त्या शाईने तू गिरवलेले माझे नांव अजूनही तसेच ताजे  … टवटवीत आहे , त्या  कवितेच्या ओळी सारखेच  … " गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "

     तू दिलेल्या  गज-याला जपून ठेवलय  .... !  फुलं , पाकळ्या गळून गेलेत …  पण फुलं गुंफलेली गुंफण अजुन तशीच आहे … फक्त फुलांच्या  जागी  तुझ्यात अडकलेल्या प्रत्येक क्षणांच्या स्मृतीं गुंफल्या आहेत …! 

     काळ  पुढे सरकलाय पण तुझ्यासोबतचे क्षण काळासोबत माझ्याजवळच घुटमळत आहेत  …! त्या क्षणांना मुक्ती मिळावी असं मलाही वाटत नाही  … !! कारण जेंव्हा जेंव्हा जगण्याच्या मुळाशी ते क्षण मी  शिंपडते जगणे ताजे ,  टवटवीत  होते …! 

     हो मी  हे  सारं  सारं  जपून ठेवलय  निर्मळ , निरागस ,  उत्फुल्ल जगण्यासाठी   …!!


                                                                                          " समिधा "

    


    

" प्रिय पाऊसा ......!



प्रिय  …,
    खरं  तर ' सात जून ' हा दिवस पावसाच्या आगमनाचा  संकेत असतो   ....  मागच्या वर्षी मात्र पहिला पाऊस  कधी  पडला माहीत नाही   ....  पण यावर्षी  'पहिला पाऊस ' सात जूनलाच आला  ..... पहिल्या पावसाची पहिली  सर म्हणजे मातीच्या गंधाचा दरवळ  आणि आतापर्यंत तापलेल्या जमिनीला शीतलतेचा स्पर्श   ....  यावेळी सर्वांच्याच चित्तवृत्ति उमलुन येत असतात   … एक विलक्षण नवचैतन्याची लहर सा-या वातावरणात वहायला सुरुवात होते   .... त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साहाची हिरवळ फुलत असेलच  ....!! 

     हा अनुभव मला नविन नाही   ....  पण प्रत्येक वर्षी मनाला तो नविन भासतो   …!! म्हणूनच पहिल्या पावसाने दिलेला अनुभव एव्हढया आत्मीयतेने सांगावासा वाटतो   ....!! 

     ज्या दिवशी पहिला पाऊस आला त्या दिवशी माझी मनस्थिती थोड़ी बैचेन होती   … पण पाऊस आला आणि मनाची बैचेनी , मरगळ पार विरुन गेली   …!! मातीच्या  चित्तवृत्ति उल्हासित झाल्या   … आनंदी आवेगाने तो मृण्मयसुगंध साठवत  होते   … पण माला अजूनही न सुटलेले कोडं त्या दिवशीही पुन्हा कोडयात टाकून गेले     ....!!!

      पहिल्या पावसाचे आणि माझे काही  अनामिक बंध आहेत  ....?  की त्याच्या येण्याने माझ्या हृदयात अगदी एक अनामिक हुरहुर तो लावून जातो  ....  कशाची असते ती   …? जुन्या स्मृती अश्यावेली मातीच्या गंधासोबत आपलाही दरवळ मांगे सोडून जातात   …!!!

     माझ्याभोवतीचा हां अनुभव घेऊन मी पहिल्या पावसाला  एक फ्लाईंगकिस देऊन निरोप दिला   …! तोही  विरघळला  हळुवार थंडगार हवेत   …ओलेत्या पानांवरून घरंगळणा-या थेंबात   …!! मी  पाहिलं  तो शहारला  … माझ्यासारखाच   .... एका अनामिक स्पर्शाने   ....!!!


                                                                                       " समिधा "

    

'कन्फेशन बॉक्स' ….!

 सॉरी  शोना  .... परत असे नाही होणार   … !  आणि असं मी म्हणताच माझी लेक माझ्यावर काही वेळापूर्वी रागवलेली असते ती मला एका क्षणात प्रेमाने बिलगते   ....! 
       खरच आहे आपण कित्येकदा आपल्या पिलांवर केवळ  आपल्याला आवडले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आनंदासाठी केलेल्या कित्येक गोष्टीसाठी  आपण रागावलेलो असतो  …… ! फटकावलेले असते …!  पण  ती  मात्र आपल्याला किती सहजपणे माफ करतात …! ( खरच माफ करतात की आपला तो "सॉरी"   म्हणतानाचा  बापूडवाना चेहरा पाहून त्यांना त्यावेळी दया येते…?)  पण   जसजसे ते बुद्धीने आणि वयाने मोठी होतात त्यांच्यातील मानापमानच्या  जाणिवा जाग्या होतात ……!  त्यांच्यातील बालसुलभता हळुहळू कमी होऊन  मोठ्यांमधला व्यवहार त्यांच्या ठायी येतो तेंव्हा मात्र आपण अस्वस्थ होतो  …!  ह्या  स्वभावातील आवर्तनातून आपण मोठेही गेलेलो असतो   … … तरीही त्यांच्या वागण्याने आपल्याला धक्का बसतो. 

        खरे तर आपल्या मुलांना समजून घेणे आणि समजावून सांगणे एका पातळीवर फारच कठिण असते  .   त्यावेळी आपल्या संयमाची खरी कसोटी लागते   .... !  मुलांमुळे संयम आणि सहनशीलता आणि अतीव  माया हे  स्वभावतील स्थित्यंरण  आपले पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलू शकते   !   आई /बाबा  होण्यापूर्वीचा आपला हटटीपणा , संताप तुलनेने कमी झालेला असतो  … हृदयातील माया , कणव  जास्तच वाढलेली असते  … !  एक नवा आयाम संपूर्ण  जगण्याला आणि वागण्याला मिळत जातो  .... ! 

        मी माझ्या लेकीची  अत्यंत आभारी आहे  … !  तिच्यामुळे आज माफ़  करण्यातला सहजपणा मला कळला  … !  माफ करण्यातला आनंद कळला  ....! संयम, सहनशीलता, प्रेम याची नेमकी ओळख करून दिली   .... !!   
थैंक्यू शोना  .....!! 

पुष्पांजली कर्वे


                                                                                                                                              समिधा                                    

"सहवाचन"


आज जागतिक ग्रंथ दिन...
वाचाल तर वाचाल हे आपण सर्वच जाणतो . वाचन संस्कृती जपली पाहिजे , वाढली पाहिजे .
परंतु आजकालची आपली पिढी जास्तीतजास्त फेसबुकवर च्याटिंग करताना दिसते.
वाचनाचे महत्व माझ्या कट्ट्यावरच्या मित्र मैत्रीणीना कळावे म्हणून हा प्रपंच.
"या ग्रंथाचे देणे , कल्पतरुहुन उणे
परीसापरीस अगाध देणे ,चिंतामणी ठेंगणा "
अर्थात -वाचनाने मिळणारे ज्ञान आणि आनंद यांचे मोल आपण कधीच करू शकत नाही..
तिथे चिंतामणीहि ठेंगणा आहे. दर्जेदार वाचनाने आपली प्रतिभा अधिक प्रगल्भ आणि
अधिक सकस होते.
निवडक ग्रंथांची आपकमाई गाठीशी असणारा माणूस आयुष्यातील व्यथा वेदनांची गाठोडी
काहीकाळ तरी मानगुटीवरून उतरवून ठेवून स्वत:च्या त्या आनंद गुफेत प्रवेश करून आनंदविभोर
होऊ शकतो. वाचन, मग ते स्वान्तसुखाय एकांती -मुकवाचन , स्वतः शी मोठ्याने केलेले मुखवाचन
असो अथवा प्रीयजनांबरोबर केलेले सह वाचन असो . वाचनाने मिळणारे आंतरिक सुख इंटरनेट
वरील सर्फिंगने नाही मिळत. पुस्तकातील प्रत्येक वाक्यागणिक प्रेत्येकजण आपापल्या मनात
स्वत;ची कल्पना चितारतो .... तो आनंद काही वेगळाच असतो. (मिलिंद बोकील यांचे "शाळा"
पुस्तक वाचले असेल तर याचा अनुभव नक्की घ्याल किंवा डायरी ऑफ ऑन फ्रंक हे पुस्तक
वाचले तर तिचे नाझी छळ छावणीतील भोगलेल्या दुखा:चा जिवंत अनुभव मिळतो. )
यामध्ये सहवाचन हा वाचनाचा सर्वात उत्कृष्ट वाचन प्रकार आहे.कारण सहजीवनाच्या
आंतरिक प्रेरणेचाच एक अविष्कार पुस्तकांच्या सहवाचनात प्रकटतो .
" तुका म्हणे सर्व सुख त्या संगती , घडले पण ते संतांचिया " सहवाचन हि अशीच एक
सुखाची पंगत आहे. सहवाचन म्हणजे सर्वांचे संगतीत केलेले ग्रंथ वाचन . कथा, पोथी -पुराणे
वाचन हे सहवाचनाचे प्रकार आहेत. सर्वाना बरोबर घेऊन घेतलेला वाचनाचा आनंद म्हणजे
काव्यसंमेलन. आणि काव्यसंमेलनातील आनंद म्हणजे परम सुखाची अनुभूति। …!

                                                                              "समिधा "

कोंडलेल्या या जीवांच्या .....!!


 birds in pinjara साठी प्रतिमा परिणाम


कोंडलेल्या या जीवांच्या
यातना समजून घ्या  !
जागवा संवेदना
वेदना जाणून घ्या   !

चिड़िया घर पाहताना पर्यटकांना आनंद देण्यासाठी कितीतरी जातिप्रजातीच्या सुंदर मोहक रंगांच्या , अावाजाच्या त्या रंगबिरंगी पक्ष्यांना त्यांच्या मूळ स्थानांपासून इथवर लांब आणून पिंज-यांमध्ये बंद केले होते. 

     प्रत्येक पिंज-यापुढे उभे राहून मोठा वैश्विक आनंद प्रत्येक पर्यटक घेत होता  .  आणि आतले पक्षी कावरे बावरे झालेले   …!  भेदरलेले , घाबरलेले  दिसत होते   . (निदान मला तरी तसेच दिसत होते ) .  जंगलात 
झाडांवर स्वैरपणे उड़ने , हुंदडने … आनंदाने ओरडणे  … मना प्रमाणे आकाशाचा वेध घेणे  । मर्जी प्रमाणे फुलांचा मकरंद , फळांचा रसास्वाद घेणे , बिया दाने टिपणे हा स्वत:चा स्वत: उपभोगलेला आनंद त्यांना या 
पिंज-यात, कृत्रिम फांद्यांवर आणि अडकवलेल्या धान्य आणि पाण्याच्या भांड्यांतून  मिळणार कसा  ??  (फिश टैंक मधले मासे पाहुनही मनाची अशीच घालमेल होते )  . 
किती क्रूर आहे माणूस ! त्यालाही असे अडकवले पिंज-यात तर त्याची प्रतिक्रिया काय असेल  ? 


                                                                                                      "समिधा"


" एक शायराना चिमटा …!!


    तिला माझ्याशी काय खुन्नस होती कोण जाणे ? ऑफिसात आम्ही सा-याजाणी लंच टाईम मध्ये एकाच टेबलवर  एकत्रच जेवायला बसायचो  !  तिच्याकडे रोज एक नवा मेनू , ती  स्वैपाकात सुग्रण होती , ( तर मी बा-याचदा फोडणीचा भातच टिफिनला आणायची फक्त कधी तो पिवळा कधी लाल एवढीच काय ती  व्हारायटी ) तिची रोज एक नवी साडी ( माझी आठवड्यातून एक साडी दोनदा रिपीट व्हायची ), प्रत्येक सणाला तिचा नवरा तिला एकतरी नवा दागिना तिला गिफ्ट द्यायचा  …! ( मी जुनेच पॉलिश करून घालायचे )  तिच्याकडे चपला , सैंडल , सपाता , शूज नुसता खच ( मी  खचलेल्या तुटलेल्या चपला जुळवून शिवून वापरायची ), तिच्या नव-याचं तिच्यावर खुप प्रेम आहे असं सतत सांगायची ( माझे माझ्या नव-यावर खुप प्रेम आहे असं कधी नव-याला पण सांगितले नाही) तिला एक छान उमदा मित्र होता . ( मी नव-यातच तो शोधत होते ) तिला छान मेकअप सेन्स होता , ( माझ्या कड़े मेकअप सेन्स म्हणजे मीना  पाउडरच माझ्या साठी कॉम्पेक्ट होता ) खरं तर आम्हाला तिचा हेवा  वाटावा असे , ती जगत होती  ....! मलाही तिचे कौतुक होते  !  पण तरीही तिला माझ्याशी खुन्नस काय  होती  … कोण जाणे  …?? 

     एक दिवस जेवणाच्या टेबलवार तिने जेवण झाल्यावर " प्लीज अटेंशन प्लीज़ म्हणत  सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले , मी आज एक शेर ऐकवते !  माझ्याकडे बोट दाखवून हं,  तू ऐक  हं  this is specialy for u   …!  आणि तिने शेर ऐकवला   .... 

                     
                                          " अगर तुझमें है हिरेकी सिबत 
                                             तो उजालेमें चमक कें दिखा  …!
                                             अंधेरेमें तो शिशेभी चमकतें हैं   …!!


     माझ्यासह सर्वांनीच या शेरवर टाळ्या वाजवल्या  … तिही खुश झाली   …!! पण मी  मात्र आतून फारच दुखावले   …!  मी  कधी कुठे पुढे पुढे करायला जात नाही   .... !  फक्त मी वाचन करते, गाणं छान  गाते , सूत्रसंचालन करते   ,  थोड़े फार लेख लिहीते ,  माझ्या आनंदासाठी कविता करते   …! कधीतरी एखाद्या मासिकातून छापून आलेली कविता कौतुकाने मैत्रिणींना वाचून दाखवते   …!  या पलीकडे माझ्याकडे कौतुक करण्यासारखे काय होते  …?  पण तरीही तिला माझ्याशी खुन्नस काय  होती कोण जाणे   …?

     मी खुप अस्वस्थ झाले होते  . तो शेर फ़क्त माझ्यासाठी का होता ? हे मला तिला विचारावेसे वाटत होते  …!
पण असे सरळ भाषेत प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या " शेर " ला " सव्वाशेर " नेच उत्तर द्यावे असे ठरविले   . एका कागदावर मी त्यांच्या शेर वर प्रतिशेर लिहिला   …!!  शिपायाला बोलवून सांगितले , मैडम जिथे कुठे असतील तिथे त्याना हा घडीचा कागद दे   …!! 

     थोड्याच वेळात मला उपायुक्तांच्या केबिन मध्ये बोलावल्याचा निरोप घेऊन शिपाई आला  … !! बाई साहेबांकडे गेली की काय माझा कागद घेऊन ? मनात विचार करतच मी  आत केबिन मध्ये गेले  .  साहेबांच्या समोरच ती  वरिष्ठ मैडम बसली होती  . आणि मघाशी मी  शिपयाकडे पाठवलेला कागद उपायुक्तांच्या हातात होता  .…!  " हे तुम्ही लिहिले आहे ? मी चाचरतच हो  म्हणाले   … !  " छान लिहिले आहे ! मी खालची नजर वर  केली  .  साहेब आणि ती  छान हसत होते  ! मैडम सांगत होत्या तुम्ही कविता करता ! keep it up ! आधीचा वृत्तांत मैडमनी स्पष्ट केलेला दिसत होते   …!  

     मी त्या कागदावर लिहिले होते   .... 
     (तिला चश्मा होता )

                                                   " तेरी आँखे हैं चश्मेबद्दूर  … 
                                                   पर हाय  ! उसमें ना  हो अगर वों नूर 
                                                  जो हिरे को हिरा नहीं , शीशेकोभीं पत्थर समझें  …!! "


                                                                                       
                                                                                                                 "समिधा "


                                                  

 

माझा आनंदाचा ठेवा …!


     खुप महिन्यांपासून मी ऑफिसच्या वाटेवर असलेल्या त्या फुटपाथ वरुन जात येत आहे  . फुटपाथवर चने शेंगदाने वाला,  फळवाला , पेपरवाला ते अगदी चप्पल दुरुस्त करणारा यांची रोजचीच जागा ठरलेली होती  ! कधीतरी मी वर्तमानपत्र विकत घेत असे तर कधी शेंगदाणे , फळ तर कधी माझी तुटलेली सैंडल शिवून घेतली आहे ! पण एक दिवस सकाळी तिथून जाताना  त्यांच्याच रांगेत फुटपाथ लगत असलेल्या ग्रील बसवलेल्या कठड्यावर आता  एक मोठा अल्युमिनियमचा पेटारा ठेवलेला दिसला ! पण त्याच्या आसपास कुणीही बसलेले अथवा उभे नव्हते   माझे कुतुहल चाळवले ,  मी मुद्दाम त्याच्या जवळून गेले , पेटारा मोठ्या दोरानी गच्च बांधून व्यवस्थित ठेवला होता  . आणि त्यावर एक कागद चिटकवला होता  . त्यावर मराठीत लिहिले होते , येथे जुनी नवी पुस्तके विकत मिळतील तसेच अल्प डिपॉज़िट मध्ये पुस्तके घरी वाचण्यासाठीही मिळतील . वां  !!! मनातल्या मनात मी माझा आनंद व्यक्त केला ! मी इकडे तिकडे पाहिले पण कोणीच त्या पेटा-याचा मालक दिसला नाही  मी जवळच्या मोचिला  विचारले इसका मालिक किधर है  ? त्याने नुस्तीच नकारार्थी मान हलवली , मलाही ऑफिसला जायला उशीर होत होता , मी तो नाद सोडून ऑफिसला निघून आले  . 

     संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याच फुटपाथवरून जात असतांना सहज नजर पुढे गेली , तर तो पेटारा आता उघडलेला दिसत  होता आणि ग्रिलवर पुस्तकेच पुस्तके मांडलेली दिसत होती  .  माझी चाल नकळत वेगात आली आणि तिथे पोहचले, एक व्यक्ति ( पेटा-याचा मालक ) त्या ग्रिलवरील पुस्तके व्यवस्थित लावत होता। . भराभर डोळ्यात भरतील अशी पुस्तकांवर नजर फिरवली ,घड्याळात पाहिले गाडीला काही मिनिटेच उरली होती , थांबून पुस्तके चाळण्याचा मोह आवरला उद्या ऑफिस मधून जरा लवकर निघावे ऐसा विचार करून गाड़ी पकडायला धावले  .  जुनी , जुन्या लेखकांची प्रथम आवृतीतील पुस्तके मिळण्याचे हमखास ठिकाणम्हणजे फुटपाथ , असे मी अनेक मोठ्या लेखकांच्या लेखनातून वाचलेले होते , त्यामुळे मलाही एक दिवस हा खजिना मिळेल अशी आशा पल्लवित झाली .  तो विक्रेता संध्याकाळीच उन्हें उतरल्यावर आपले पुस्तकांचे दुकान इथे थाटत असे त्यामुळे मला गाड़ी पकडण्याच्या घाइगड़बड़ित मनसोक्त पुस्तके पाहताच येत नव्हती  . 

     दुस-या दिवशी ऑफिस मधून लवकर निघणे झालेच नाही।   आठवडा असाच निघून गेला , एक दिवस अगदी ठरवून लवकर निघाले , पण तो पुस्तक विक्रेता तिथे नव्हताच फ़क्त तो पिटारा त्या दिवसा सारखाच दोरान  गच्च बांधलेला  . हिरमुसुन गेले मी , पण पुढे दोन तीन दिवस असेच गेले  . मात्र त्या दिवशी तो पिटारा ही होता आणि तो  विक्रेता ही आज नेहमीची गाडी घालविण्याचे ठरवून त्या पुस्तकांजवळ थांबले , पुस्तके मनसोक्त पहिली, थोड़ी थोडक्यात वाचून  नजर फिरवली , पण एकहि घ्यावेसे असे पुस्तक मात्र वाटले नाही  . 

    त्यानंतर मी फ़क्त येता  जाताच त्या पुस्तकांवर नजर फिरवित असे , आणि पुस्तक विक्रेता आशेने माझ्याकडे पाहत असे।   पण एक दिवस मात्र थांबून त्याला विचारले जुनी चरित्र, काव्यसंग्रह नाहीत का  ? हो आहेत ना उद्या मी आणून ठेवतो , मी पण खुश झाले  . दुस-या दिवशी थोड़ी लवकर निघाले पण मला काही त्याने आणलेले पुस्तक पटले नाही  .  पुन्हा दोन तीन आठवडे असेच गेले . त्या पुस्तक विक्रेत्यानेही माझ्याकडे आशेने पहायचे सोडून दिले. 
                                                              V.H.Kulkarni 2
                                                              प्रा. वि. ह. कुळकर्णी   
     पण एक दिवस मात्र माझी मीच तिथे थबकले , एका पुस्तकावर माझी नजर गेली।  ते चरित्र होते, मधल्या काळातील, जुने वाटत होते , पुस्तक हातात घेऊन थोड़े चाऴले , पुस्तकाचे नाव होते "अच्युत बळवंत कोल्हटकर , चरित्र आणि वाङमय" आणि लेखक होते वि  . ह  . कुळकर्णी पुस्तक तसे जुने असले तरी चांगल्या स्थितीत होते , मुळातच मला चरित्र, आत्मचरित्र वाचायला खुप आवडतात, त्यामुळे अच्युत बलवंत कोल्हटकर यांच्या बद्दल मी  यापूर्वी कधीच वाचले किंवा ऐकलेही नव्हते पण तरीही त्यांचे चरित्र थोड़े चाळल्यावर आपल्याला ते नक्की आवडेल म्हणून ते मी  घेतले।   लेखक वि. ह. कुळकर्णी यांचेबद्दलही मला विशेष माहिती नव्हती पण त्यांचे नाव ऐकून होते  . पुस्तक विक्रेत्याने १०० रु. सांगितले मी  घासघिस करून व एक  "वसंतवीणा " हा  अतिशय जुना  काव्यसंग्रह रु. १० /- स घेऊन ते चरित्र रु. ६० /- घेऊनएकूण  ७०/ रुपयात   सौदा करून ते पुस्तक घरी आणले   .

     घरी येताच नेहमी प्रमाणे पुस्तकाची कितवी आवृत्ति पासून पाहायला सुरुवात केली ती पुस्तकाची १९७९ ची प्रथम आवृत्ति होती आणि सर्वात महत्वाचे आणि माझ्यासाठी सुखद  आश्चर्यकारक धक्का म्हणजे त्यावर या पुस्तकाचे लेखक  उत्तम ज्येष्ठ समीक्षक, लेखक प्रा. वि. ह. कुळकर्णी   (१४ एप्रिल १९०२ – ९ डिसेंबर १९८२) यांची स्वाक्षरी होती   . त्या प्रतिवर " श्री बापूराव नाईक  यांस  स्नेहपूर्वक भेट " असे  स्वहस्ताक्षरात लिहून त्या खाली त्यानी स्वाक्षरी केली होती ,  व दिनांक होती २९ नोव्हेंबर , ८०  .  त्यांच्या ओरिजिनल स्वाक्षरीची ही आवृत्ति माझ्यासाठी अमूल्य आहे  !   थोरा मोठ्यांची स्वाक्षरी आम्हा पुस्तक वेडयांसाठी अमूल्य ठेवा असतो  . प्रख्यात बॉलीवुड सीने नट नटयांचे ऑटोग्राफ मिळाल्यावर जेव्हढा आनंद आजच्या कॉलेज तरुण  तरुणींना होतो अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आम्हा साहित्य प्रेमींना होतो ! आमच्या साठी  तो खजिना असतो आनंदाचा ठेवा असतो   तेंव्हा मनातून उगीचच स्वतःला आम्ही  विशेष भासतो  !     
       

  
   
      वेब नेट मुळे सारेच जग अगदी आपल्या कवेत आले आहे त्यामुळे  फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क मुळे चांगले लेखक , कवी आपल्या संपर्कात येतात तेंव्हा त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्यक्ष भेटीपेक्षा इथे अधिक वाढतो कारण एवढे थोर , श्रेष्ठ असूनही समान्य वाचक साहित्य प्रेमींशी ते थेट संपर्क ठेवतात. यात त्यांचा व्यावसायिक स्वार्थ असेल नसेल पण तरीही त्यांची आपल्या भिंतीवरची दखलही अशीच त्यांच्या औटोग्राफ मिळाल्यावार होणा-या आनंदासारखी असते   .!! आणि तो आमच्या भींतीवरचा "मास्टरपीस " असतो !



                                 
                                                                                                             "समिधा "


     







     

" मन वढाय वढाय ...........!!

                                              
                            
                                                    " मन वढाय वढाय
                                                     उभ्या पिकातलं ढोर
                                                     किती हाकला  हाकला
                                                     फिरी येतं पिकांवर   …!!"

     एखादी गोष्ट हानिकारक आहे कळतय  पण मन काही ऐकत नाही    ....!!  नको  वागू तसं , नको करू तसं 
तरी हेकट  (हलकट) मन जातंच त्या वळणावर    …!!  नुसतं जात नाही चांगलं फिरून येतं मनसोक्त   ....!! किती हाकलांवं तिथून पण जरा वेळ हलेल तिथून आणि पुन्हा वाटा शोधत तिथेच पोहचेल   …!!

     मनाचा मनाला दम देऊन पाहिला…, शेवटी आपल्यालांच भोगावे लागेल , असं मनाला समजावून पाहिले !
शेवटी याची , त्याची जवळच्यांच्या  शपथा घेऊन संपल्या   …!! पण मनाला आवर नाही   …!! 
मनाने मनाचं ऐकलं नाही तर फार फार वेदना होतात  …… पश्च्चातापाच्या !!!

     शेवटी जग्गनीयतां निर्मिकालाच धरते धारेवर   .... आता तू तरी सांभाळ  …! तुझ्या शिवाय कोण तारील मला ??  तुझी शपथ पुन्हा असं करणार नाही  …!!

     पण तोहि हरतो काही दिवसात …!  आणि मनही …!!  जाते त्याच वाटेवर … पुन्हा पुन्हा सर्वदूर    …!!!


                                                      "मन भुकेला भुकेला 
                                                       नाही त्याला समाधान
                                                       कसा  आवरावा त्याला ??
                                                       मन चंचल ,  बैचेन  "
                                                      

                                     
                                                                                                    "समिधा "

                                                                                                         

                                                        

                                     





  

कधी कधी मला माझं कळतच नाही …!



               
दोन दिवसांपासून डोळे चुरचुरत होते  ....! मागच्यासारखे इन्फेक्शन झाले की काय ....? म्हणून लगेच दॄष्टि हॉस्पिटलला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन परस्पर ऑफिस सुटल्यावर जायचे नक्की झाले  .  संध्याकाळी ट्रेन मधून उतरले  ती दवाखान्याच्या दिशेने जावे की नाही मी   .... ? पण नाही  … माघी गणपती निमित्त आमच्याकडे मोठी जत्रा भरलेली आहे   …!  जाता जाता  ती जत्रा रस्त्यावरच!  भरगच्च निरनिराळ्या वस्तु बांगड्या , क्लिपा , घरगुती उपयोगी सामान   .... वा वा वा   …  मी  तर नुसती खुष नाही ते सर्व पाहुन काय काय घेऊ नी काय नाही .... वेडी झाले नुसती  …!!  आणि मग झाली ना माझी शॉपिंग सुरु   …!! हे घे  … ते घे …अहं तेही घे    …  हं हे तर घेतलेच पाहीजे   ! असं कसं हे पण घे   … !  माझी शोप्पिंगबाई ऐकाला तयारच नाही   …! अरे भैया ये क्या   … कितना महाग देता है  …! दुकानवाला एक किंमत सांगायचं माग मी मोठी हुशारच आहे टाटा बिर्ला थाटात बिजिनेस डील करुन ती वस्तु अर्ध्या किंमतीत मिळवायची …! (खरं तर त्याने मला उल्लू बनवलेले असणार ही शंका मध्येच चिमटा काढायची … ) मग , हं भैयाजी मुझे पता है ये वस्तु इससेभी सस्ती होगी नं  ! आणि तो भैया दात  निकालके मस्त हसला की समजायचं   …! मै उल्लुही बनी थी  …!!!  पण तोपर्यंत पुढच्याच्या पुढ्यातल्या पायपुसण्या मला खुणवायच्या (खुणवायच्या की मस्तच भुलवायच्या  …!!)

     अशी खरेदी करत करत निघाले  … आणि समोर दवाखाना दिसला   …! दातांचा  … !! आणि मला माझ्या डोळ्यांची आठवण झाली   … !  खरेदिला जरा आवरले   .   पर्स तपासली फक्त सातशे रुपये उरलेले   …!! एव्हढयात माझा दवाखाना भागेल  …?  मनात मोठी शंका आणि हातात हे येवढे सामान घेऊन हॉस्पिटल मध्ये प्रवेश केला!  माझ्याकडे जुनी फाईलही नव्हती   ! हं नाव बोला  … रिसेप्सनिस्ट माझ्या लहानग्या लेकीच्या मैत्रीणीची आईच होती . ( या बाईंशी   मी तिची मुलगी माझ्या लेकिला मारते म्हणून भांडले होते ) अश्या ओळखीचा फायदा घेऊन  त्या बाईंना   जरा कचरत , थोड़े चाचरत तोंडभर हसु आणत "तुम्ही आर्याची आई नां ? हो  ! आणि त्या मस्त हसल्या ! मग मी धीर करून विचारलेच " किती फी होईल हो  ?" त्यांनी न कळून   … भुवया ताणुन डोळे मोठे करून  … पाहिले  ! मग मी  माझी शॉपिंग दाखवून  … अहो लक्षात नाही राहिले हो मी दवाखान्यात निघाले आहे ते …! त्या सगळं समजून हसल्या .आणि विचारले , " किती उरलेत  ? सातशे   !! " मी  उत्तर दिले,   तीनशे कंसल्टिंग फी आणि औषधे  होतील  . "  डोळे तपासून मी बाहेर पडले  …!! 

     फाईलवर डॉक्टरांनी औषधे लिहून दिली होती   ! समोरच्या मेडिकल मध्ये गेले   ।! हसून विचारले , औषधोका कितना होगा   ?  त्याने हिशोब केला  .  ढाईसो   …! म्हणजे आपले औषधांचेहि भागेल !  औषधे घेऊन परत निघाले  … जत्रेतून   …! मघाशी अर्धवट सोडलेली बरणी  … कपांचा सेट  … खूणवलंच त्यांनी  !! गेले आणि उरलेले सगळे रुपये संपवले   … हा हा हा दिल खुष हो गया  … !!  ढीगभर पिशव्या , पर्स , फाईल  कशातरी सांभाळत , सावरत … निघाले  … !!  आता घरापर्यंत स्पेशल रिक्शा करावी लागणार   …! 

     आणि लक्षात आले रिक्शावाल्याला द्यायलाही पैसे उरले नव्हते   …! तेव्हढ्यात एक ट्रेन आली   …! रिक्षेला गर्दी वाढायच्या आत रिक्शा पकडली   …! चार सीट मिळतात गर्दीत रिक्शावाल्यांना, मग आम्हा स्पेशल वाल्यांना कोण विचारतो   … ?

     रिक्शा ज़रा पुढे आल्यावर हळूच अतीव मायने रिक्शावाल्या दादाला बोलले , भाऊ  … तुम्हाला माझ्या घराजवळ  थोडवेळ  थांबावे लागेल हं   .... ! माझं वाक्यही धड़ पूर्ण होऊ न देता   … मी असं बोलते नाही तर तो उसळलाच   … ओ  … काय पण तुम्ही ताई   … आधी नाही का बोलायचं   … धंद्याच्या टाईमाला खोटी करता माझी  … ( तो सगळं न सांगताच समजला होता  ! अशी त्याला उल्लू बनवणारी मी  पहिलीच  नसावी ) आता तुम्ही उतरणार कधी  … वर जाणार कधी   … आणि माझे पैसे देणार कधी  ?  फोन लावा फोन लावा घरी  … खाली आणून देतील कुणीतरी  पैसं !  "भाऊ, माझं घर वर नाही खालीच आहे  !"    पण  नाही ओ घरी कोण पण नाही  …!! पण मग तर तो जास्तच उसळला ....  आणि त्याच्या दुप्पट त्याची रिक्शा उसळायला लागली ! आदळत आपटत फास्ट मध्ये कशीतरी रिक्शा घराजवळ आली  .  दरम्यान मी इथून तिथून पर्स मध्ये हात  घालून चिल्लर गोळा   केली   … एखाद कागदी नोट  असे   तीस रुपये त्याच्या हातावर ठेवले   …!  "भाऊ! तुमचं नशीब चांगलं म्हणून मिळाले   …!  आणि मग तो शेवटचा उसळला "काय वो तुमी ताई   .... फुकाट टेन्शन वाडीवला माझा , तुमचाबी नशीब चांगला म्हणून यवस्तित  पोचल्या  घरी…  ख्या ख्या ख्या …!!  मी सेंकंदभर स्तब्धच ! , आणि  मग मी पण  ख्या ख्या ख्या   करीत रिक्षेतुन सामाना  सहीत   उतरले   … !!  खरंच  कधी कधी  माझं  मला  कळतच नाही  …!!! :)

            
                                                                                                     "समिधा "


तीळ गुळ घ्या गोड बोला ....???

8291363514 .,8433677524      तीळ गुळ  घ्या गोड बोला असं म्हणत हातावर तिळगुळ ठेवायचा थोरा  मोठ्यांच्या वाकुन  पाया पडायचे आणि मनात गोडवा साठवत छान हसत पुढे जायचे  !!

        लहानपणी आम्ही पोरिसोरी आईची साड़ी आणि न होणाऱ्या पोलक्याला  नको तेवढे टाके मारून  नाहीतर शाळेच्या शर्टाची कॉलर आत दुमडून घ्यायची आणि आपल्या मापाचा ते पोलकं  घालून नटून थटून घरोघरी 
अगदी शेजार पाजार  गावातील जमतील तेव्हढी घरे आम्ही पोरी  फिरत असू  !  चिमुकल्या त्या आम्ही आम्हाला साड़ी सावरत चालतानाची आमची धडपड कधी जाणवली नाही  !  ओळख न पाळख अश्या घरांत 
गेलो तरी अामचे हसत स्वागत व्हायचे  …! आम्हीही बिनधास्त घरातील प्रत्येकाला तिळगुळ देऊन  वाकुन 
नमस्कार करायचो  ।!  मग आमच्या हातात लाडू नाहीतर चॉकलेट मिळायचे   ।!   तेंव्हा होणारा आनंद वीचारु नका   .!

             आमच्या गावात एक नीमकर वकील होते.  दिसायला आड़ दंड  भल्या मोठया मिशा  आणि आवाज तर तोफेसारखा  …!!  त्यांच्याकडे एक कुत्रा होता  … तोहि तसाच भलामोठा  !!  शाळेच्या रस्त्यावर त्यांचे 
घर होते   … जाता येता  आम्ही त्याला  खूपच घबरायचो  .... कुणीही दिसले की कुत्रा असा काही भुंकायचा की आमची पाचावर  धारण बसायची  !  मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र आम्ही सर्वजनी  नीमकर वकिलांच्या वाड्यावर  जायचोच अगदी कुत्रा असला तरी   …!!   कारण या दिवशी नीमकर वकील कुत्र्याला बांधून ठेवत   ।! आणि सर्वात खरे कारण म्हणजे नीमकर वकील आम्हाला एक नाही दोन  नाही चांगली चार पाच  चॉकलेट देत तिही  अगदी वेगळी जी गावात कुठेच कधीच मिळत नसत  .  

               तिळगुळ वाटून पाय थकायचे पण आम्ही मनाने मात्र उत्साहित असायचो   … रात्री  उशिरा पर्यंत 
गावत फिरून  तिलगुळ वाटून  घरी परतायचो  तो  साठवलेला गोडवा जिभेवर  ठेवून घरच्यांना गमतीजमति सांगायचो   ....!!

                  आज मात्र हे दिवस हरवलेत   …!  पोरिसोरींना गावभर अनोळखी लोकांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटण्यासारखी परिस्थिती  राहिलीय  कुठे  …!!  तो गोडवा ,  ती  माणसे  भेटतील  का कधी   …??


       8291363514 .,8433677524         
                                                                                                            " समिधा "


" आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय .....!!!

     

                                                  


          आज सावित्रीबाई फुलेंची १८३  जयंती  …!! आम्हा आया बायांची मूली बाळींची ज्ञानाई माउली …!
 प्रतिगामी म्हणवणा-या समाजाच्या शिव्या शाप झेलुन न डगमगता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले नसते 
तर आज मी हा त्यांच्यावरील कृतज्ञतेचा लेख लिहु शकली नसती ! 

          मुलींना शिकवणे म्हणजे सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून  सनातन्यांनी विरोध केवळ विरोध केला नाही तर . अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. हा सनातन धर्मांधळा समाज किती क्रूर होऊ शकतो याचे आज आपण साक्षीदार आहोत  …! त्या सनातनी कर्मठ काळात महनीय सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेणाचे गोळे खाल्ले  आणि आज  पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी "मलाला युसफजई "  कर्मठ जिहादी तालिबनियांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलत आहे  .! 

       सावित्रीबाई फुले यांच्या  कार्याची माहिती आणि महती सर्वश्रुत आहे .  त्या काळात बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता.त्यांच्या पुढ्यात समजाने सती  किंवा केशवपन हे दोन मार्ग ठेवले होते  .! जीवंतपणी  मरणयातनाना रोज सामारे जात जगणे नाहीतर कुणाच्या तरी भोगाचे बळी ठरुण गरोदर रहाणे 
 मग आत्महत्या नाहीतर भ्रूणहत्या   .... !  समाजाच्या या क्रुरतेला ब पडलेल्या बाळींना या माउलीने पदरात घेतले त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली हे सर्व सनातनी कर्मठ समाजाच्या चालीरिती , परंपरा याच्या विरोधी जाऊन तेही स्त्रीने हे काम  करणे म्हणजे डोक्यावरून पाणी !  पण हे कार्य केले नसते तर मुलींच्या शिक्षणाची मुहर्त मेढ रोवली गेली नसती  .
           आज आम्ही तिच्या लेकी  लिहुवाचू शकतो   …! तिच्यामुळे आमच्या पंखात बऴ आले  …! आमच्या 
विचारांना , आमच्या अस्तित्वाला अर्थ आला आहे.  " आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय , मी सडून होतो , पडून होतो , कुढून होतो  …! नाहीतर माझे आयुष्य एक पोतेरे झाले असते  .!  आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय …!!  ही जाणीव या माय ने आमच्यात जागवली   !! तिचे आम्ही ऋण कधीच फेडू शकणार नाही  .!
         आजही  सवित्रीच्या आत्म्याची नितांत गरज आहे   .!  आजही आम्ही नागवले जातो , पुरुषी  मानसिकतेपुढे  नमवले जातो    …!  आजही आम्हाला प्रश्नांची उत्तरे मागताना संघर्ष करवाच लागतो  …!
   तुला आमच्यातले विझलेले निखारे नकोत , हुंदके नकोत आसवांचे झरे नकोत , तुला हवेत  आमच्यातल्या पेटत्या मशाली , आन्यायाच्या छाताडावर  नाचना-या वीरांगनी  …!!  तुझ्या प्रेरणेने आम्ही उभ्या राहु  , आमच्या छाटलेल्या पंखाना नवे  बळ मिळवत राहु    ....!हीच आमची ज्ञानाई माउलीतुला श्रद्धांजलि   …!!

           

                                                                                    "समिधा"


          
    

                                                 


                   

       

सन २०१५ तुझे स्वागत आहे ....!!


 


                                                   सन २०१५ तुझे स्वागत आहे   ....!!

      सन २०१४ आज सरत चालले आहे…! तस तशी मनाची घालमेल, हुरहूर  वाढते आहे  …! प्रत्येक वर्षाप्रमाणे
यही वर्षी परमेश्वरचे नामस्मरण करून नूतन वर्षाचे स्वागत करणार  ।!   नव्या आशा , नवे संकल्प, नवी स्वप्न, नवी स्वत:ला इतरांना दिलेली वचने पूर्ततते साठी परमेश्वाराची कृपादृष्टि मागणार  …!!

      मी  सहज मागे  पहाते  … मी हर्मोनियम शिकणार होते  … ! कधीपासूनची माझीच ही इच्छा पण दरवेळी अडचणी वाकुल्या दाखवून पूर्ण होऊ देत नाहीत  …! यावर्षी पुनः संकल्प केला आहे  …! माझी मैत्रीण नंदिनी केंव्हाची तिची नविन पेंटिंग्स पाहायला बोलवते आहे  , अजुन मी पोहचले नाही. पुस्तकांचे कपाट , त्यातील पुस्तके रोज येता जाता हाक मारतात  । पण त्यांच्याकडे केवीलवाने पाहुन सरळ किचन कड़े धावावे लागते
नाहीतर लेकिच्या  चिमुकला आवाजात पुस्तकांचे आवाज विरुन जातात   …!

      तरीही नव्या आशांनी , नव्या स्वप्नांनी  नवीन वर्षाचे माझ्या मनाचे , माझ्या इच्छांचे कैलेंडर भरगच्च
भरले आहे  …!  नव्या नव्या संकल्पांच्या फुलांनी माझे इच्छेचे झाड़ डवरले आहे  !!   अवकाश फ़क्त येत्या
दिवसांमधली माझी सृजनात्मक ऊर्जा टिकण्याची   .... वाढण्याची....! ती  मला लाभो आणि माझ्या सर्व
सहोदरांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना  ....!

      नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा   …! २०१५  तुझे मन:पूर्वक स्वागत   आहे  …!!

       

"कागदी " पण .... "जिवंत माणसे " !!

       काल १५ ऑक्टोबर २०१४ मतदानाचा  दिवस   …!! सकाळी उठले खूपच अस्वस्थ होते  …! कारणही  तसेच होते  …! माझा नवरा सकाळीच मस्त दाढ़ी करून  कड़क इत्श्रीचे  कपडे घालून शीळ  घालित मतदानाला जायची तयारी करत होता  ! ( जसा काही मैत्रीणीला भेटायला निघाल्या सारखा )  आदल्या दिवसापासून मला तो चिडवत होता  …! सरकारी  माणसे असून घरात बसणार आणि आम्ही मतदानाचा हक्क बजावणार  ! नागरिकत्वाचा हक्काचा हक्क ! त्यामुळे मी  जरा घुश्शातच होते  ! एवढे वर्ष निवडणुकीचे कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान कधी करता आले नाही, पण निवडणुकीचा एक भाग म्हणून या प्रक्रियेत असल्याचे समाधान मला नक्कीच मिळायचे  … पण या वेळी नेमकी माझी इलेक्शन ड्यूटी लागलीच नाही आणि एवढे वर्ष लग्नानंतर मतदार यादीतील नाव सासरी स्थलांतरित केले नाही  ! त्यामुळे मतदार यादीत नावच नव्हते  मी  खूपच हिरमुसले होते  ! जाताना घरातले सर्वच मला मुद्दाम आवाज देऊन जात होते   …!  शेवटी न राहून आईकडे फ़ोन लावला   luck by chance घ्यायचे ठरवले   … ! " आई माझ्या नावाची इलेक्शन पावती आली आहे का गं ?"  मी   .  " हो  …! " आईचे ते शब्द ऐकून मी जोरात ओरडलेच "काय  खरंच ?"  हो का  गं ? येतेस का ?" मी पण केले नाही मतदान थांबते  तुझ्यासाठी  " आई   .  हो  ! निघते लगेच ! मी  . 

         पण एक प्रॉब्लम होता लग्नानंतर माझे नाव पत्ता सारेच बदलले होते  ! जुन्या नावाचा आयडी प्रूफ काहीच नव्हता शेवटी माझा प्यान  कार्ड शोधून काढले त्यामध्ये माझ्या नावा सोबत माझ्या बाबांचे नाव होते  … बस्स एव्हढेच ! पण तरीही मला मतदान करू देतील की नाही याची खात्री नव्हती  … ! पण इच्छाशक्ति जबरदस्त होती   ! दुपारची गाडी पकडून माहेरी गेले आणि मतदान केन्द्रावर जाऊन आईच्या मागे रांगेत उभी राहिले !  एक मतदार म्हणून मी ब-याच वर्षानी अनुभव  घेत होते   .!  मतदान केंद्रात प्रवेश केला आधी आईचा नंबर होता आईकडे फक्त एक पावती आणि रेशनकार्ड होते आणि मतदान अधिक-यांकडून अपेक्षित प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली  ! " अहो मैडम तुमचा फोटो  कुठे आहे ? सगळे आहे हो , पण मला वाटले यादीत  माझा फोटो असेल मी फार जुनी मतदार आहे हो, गेली चाळीस वर्षे इथे राहते !  नाही    … ! तसे चालत नाही ! चला तुम्ही बाजूला उभ्या रहा !"  आता माझा नंबर होता ! तुमचे यादीत नाव वेगळे आहे ,"  । "यादीत तुमचा फोटो नाही " काही आयडी प्रूफ आहे का ? " मी  माझ्याकडील प्यान कार्ड दाखवले ! " अहो पण यात तुमचे नाव वेगळे आहे ", " हो ते लग्नानंतरचे आहे "! पण त्या खाली पहा माझ्या वडिलांचे नाव आहे "!  तेव्हढ्यात पी आ रो  धावत आले  ! नाही मैडम नाही चालणार  …!  " का नाही चालणार ? तुम्हाला आवश्यक ते सारे प्रूफ आहेत की   । जूने  नाव आहे  … नविन नाव , फोटो आहे , आणि माझ्या बाबांचे नाव आहे   ! आणि सर्वांशी जुळणारी मी स्वत: इथे उभी आहे   !  साहेब ! मी तीच आहे   …!" आणि ही शेजारी उभी आहे ती माझी सख्खी आई आहे !! त्यांचा प्रश्न वेगळा आहे पण  तुमच्याकडे बँकेचे वगैरे पासबुक  काही ? कशाला। .? त्यातही हेच पाहाल ना ? मग ? शेवटी पि आ रों  .  ना मला मतदानाची परवानगी द्यावी लागली   ! मी विजयी थाटात बोटावर शाई लावून  । दिमाखात ईव्हीएम मशीनचे बटन दाबून  … बाहेर आले ! 

       बाहेर येऊन आईला पाहिले तर ती बाहेर नव्हतीच   । आत डोकावले तर ती पुनः पि आ रो ला विनंती करीत होती   ।!  बिच्चारी मतदान न करताच तशीच बाहेर आली   …!  आज मतदान यादीत तुमचे नांव असले आणि प्रत्यक्ष तुम्ही असलात तरी कागदी आयडी प्रूफला फार महत्व होते   …!! इथे ओरिजिनल पेक्षा तुमची झेरॉक्स कॉपी भाव खाऊन जाते  …! म्हणजे  कागदी निर्जीव माणूस जिवंत माणसामध्ये प्राण फुंकतो  आणि त्याला मतदान करता येते  … मी तोच /तीच आहे   … आणि अजूनही जिवंत आहे ! असे कागदी लिव्हिंग सर्टिफिकेट आणाल तरच पेंशनरांना पेंशन मिळते   …!!  म्हणजे आपण सारे कागदी जिवंत माणसे आहोत  …!!  स्वत: पेक्षा आपल्या अस्तिवाचे प्रूफ आसना-या कागदांना जपून ठेवा हां  .... !!

                                                                      

                                                                                                     "समिधा"  


" एकेकाचा एक दिवस ....!"


      ठाण्याला बदलापुर ट्रेनच्या लेडीज डब्यातून  त्या  काकू धडपडतच कश्याबश्या उतरल्या  , हातात दोन कापड़ी कश्याने तरी भरलेल्या पिशव्या  . उतरल्या त्याच गाडीतल्या गर्दीने भेदरलेल्या घाबरलेल्या   … उतरताच त्यांच्या लक्षात आले आपली पर्स खांद्याला नाही  । बिचा-या आणखीनच काव-या बाव-या झाल्या  लेडीज डब्या समोर इकडून तिकडे तीकडून इकडे  धावत " अगं बायांनो कुणीतरी माझी पर्स दया गं   आतमध्येच पडली ओ  !" त्यांची ती केविलवानी स्थिति पाहून प्लेटफार्म वरच्या आम्हा बायकांना त्यांची दया आली   .  माझ्या सह एकदोघी जणी त्यांच्या मदतीला धावलो पण तेव्हढ्यात ट्रेन चालू झाली   … इतक्यात  कुठल्या तरी डोअर मधून आवाज आला  "आहे आहे पर्स  मिळाली !" आणि  गाडीने वेग घेतला !! बिचा-या  काकू रडकुंडीला आल्या   .  तेव्हढ्यात मी पटकन हातातल्या मोबइलवर माझ्या मैत्रीणीचा नंबर फिरवला ती  त्याच गाडीतून प्रवास करीत होती ( अती गर्दीमुळे मी ती  गाड़ी सोडली होती ) नशीब तीने कॉल घेतला  !  " अगं गाडीत कोणती पर्स मिळाली का गं  ?"  तिने विचारुन तुला पुन्हा कॉल करते सांगितले   .  काही मिनिटातच  तिचा कॉल आला   " अगं मिळाली आहे   …  ती  बाई बदलापुरचीच आहे,  ती  म्हणाली  मी बदलापुरला  प्लॅटफॉर्मवर थांबते त्यांना बदलापुरला यायला सांग  …!!

     काकू तुम्हाला कुठे जायचे आहे ?  अगं मला इथेच एक   स्टेशन पुढे जायचे कळव्याला   …!! " काय  … !! मी आश्चर्याने विचारले    . अहो मग ह्या फ़ास्ट ट्रेन  मध्ये कशाला चढलात   .?  स्लो कुठलीही चालली  असती  .  काय  सांगू   ! मी  जास्त  काही  ट्रेनचा प्रवास करीत नाही  …!  गाडीत चढले तेंव्हा कळले ही गाडी कळव्याला थांबत नाही  … म्हणून ठाण्याला धडपडत कशीबशी उतरले   ! तरी माझा मुलगा सांगत होता आई दुपारच्या गाडीने जा गर्दी कमी असते  .  पण  ऐकले नाही  ! बाई बाई संध्याकाळी कसली ही गर्दी   …!  आता मी  काय  करू  ? माझा मुलगा मला ओरडेलच   ! पैसे पर्स सगळेच गेलं  !  तुमची पर्स मिळाली पण ती  बाई बदलापुरची आहे  .  ती  थांबणार आहे प्लॅटफॉर्मवर  !! काय करता  ?  हो हो मी बदलापुरला येते म्हणून सांग  तिला   !! पर्स मिळाली तर बरेच झाले  !!   पण काकू तुम्हाला परत गर्दीच्या गाडीतच चढ़ावे लागणार   …!  चढाल  ना   ?  ह्या गाडीला पण गर्दी असते  …!! हो गं हो चढायला तर लागेलच   …!!"

     तेव्हढ्यात  गाडी आलीच  … काकू आपल्या हातातल्या दोन्ही कापड़ी पिशव्या  पकडून आता गाड़ी पकडायचीच ह्या तयारीत उभ्या होत्याच  …!! गाडी आली ही तूफान गर्दी उतरली  … आणि तेव्हढीच तूफान गर्दी  डब्यात घुसण्यासाठी रेटारेटी करत जीवाच्या आकांताने गाडीत चढली  …!! मीही त्या गर्दीत धक्केबुक्के खात कोपर आडवे तिडवे करीत गर्दी कापत आत घुसले  … चढताना त्या काकूंचे काय झाले असेल  …? चढल्या  असतील का  …? हे विचार डोक्यात होतेच   …!  दारातून आत मी कशी तरी  आले। . मागुन  बायका धक्के देतच होत्या मी अजूनच आत लोटले गेले  … !  मी त्या काकुना मागे पुढे पाहण्याचा  प्रयत्न करीत होते  तेव्हढ्यात माझ्या मागून कुणाच्या तरी धक्क्याने त्याही आत लोटल्या गेल्या   …!  आत आल्या  पण हातात पिशव्या नव्हत्याच  ....  पिशव्यांऐवजी  पिशव्यांचे फक्त हॅन्डलच ( बंदच ) होते  ....!  काय हो काकू पिशव्या कुठे आहेत  …? अगं  बाई पिशव्या कुठे गेल्या  …?  मेल्या ह्या गर्दीत माझ्या पिशव्या पण गेल्या !! त्या , मी  इकडे तिकडे खाली शोधायला लागलो   … इतक्यात  दारातल्या बायका  ओरडायला लागल्या  " हे नारळ कुणाचे पडलेत ....? फुलं  हार  ....!!! कुणाचे आहे हे  … ?  काकू तश्याच दाराकडे धावल्या   … माझं  माझं  आहे ते  सगळं  !" बायकांनी  एक दोन  नारळ  उचलून दिले  । हार फुलांचा तर कचराच झाला होता  …!! तुटलेल्या पिशव्यापैकी एकच पिशवी होती तीही बायकांच्या पायांखाली येऊन पार मळुन गेली होती   . दुस-या पिशवीचा पत्ताच नव्हता  . बहुतेक ती बाहेरच फेकली गेली असेल  ! नारळ घेऊन काकू गर्दीतून कश्या बश्या परत आत आल्या …! "अगं  कळव्याला दिराकडे चालले होते  ।! आमची कुलदेवता असते त्यांच्याकडे  … आज तिची पूजा मांडली होती म्हणून दर्शनाला हे सारं घेऊन निघाले होते  …!!  काय गं  माझी ही दशा   …!  परत म्हणून मी ट्रेनला  यायची नाय बाबा   !! कशा  गं  पोरींनो तुम्ही रोज प्रवास करता  …??" ह्या  सा-या प्रकाराने  काकू वैतागल्या होत्या   ! पण त्यांच्याकडे दूसरा पर्याय पण नव्हता   .  मला मात्र त्यांची दयाही येत होती   . पण सा-या एकूणच प्रकाराने हसुही येत होते  ! गाडीत बसायला मिळालेच नाही ,  प्रत्येक स्टेशनला गर्दी कमी जास्त चढ़त होती , उतरत होती  !  इतक्यात माझ्या मोबइलची रिंग वाजली  ....  पहाते  … तर त्याच मैत्रीणीचा कॉल होता   … " काय गं  ? हो हो आम्ही दहा मिनिटांत पोहचूच आता   …!!  हा हां त्यांना  प्लेटफार्मवरच्या कैंटीन जवळ थांबायला सांग    !! ओके  । बाय  थैंक्स हां   !!" मी मोबइल  ठेवला  . काकू माझ्याकडेच काय झाले , प्रश्नार्थक   बघत होत्या  .   " काकू त्या बाई थांबल्यात प्लॅटफॉर्मवर  … काकूंच्या चेह-यावर एव्हढयावेळात पहिल्यांदाच हसु दिसले   ! चला एव्हढया खटपटी -लटपटी ,त्रासा नंतर निदान आपली पर्स तरी आपल्याला परत मिळतीय ह्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते  .

         गाडी स्टेशनमध्ये आली    ! उतरताना पण ही एव्हढी  गर्दी   .  काकूंना मी  माझ्या पुढे घेतले आणि लोटालोटित  आम्ही खाली प्लॅटफॉर्मवर उतरलो   !  एवढ्या गर्दीची काकूंना सवय नव्हती  .  मी त्यांना थोडावेळ  तिथल्याच एका बाकड्यावर बसवले  . कैंटीन मिड्ल डब्या जवळ होती  !   प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी झाली  ।! काकूंना मी हात धरून  उठवले   । कश्याबश्या  त्या उठल्या  .  आम्ही कैंटीन जवळ पोहचलो  माझी मैत्रीण व ती बाई तिथेच उभ्या होत्या  …! मी  तसे  काकूंना सांगितले  आणि काकू जरा उत्सहानेच  जोरात चालू लागल्या।   त्या त्यांची पर्स घेण्यासाठी उत्साहित  झाल्या होत्या  .  आम्ही त्यांच्या जवळ पोहचलो   , ती  बाई अगदी आनंदाने हसली   । कुणाला तरी त्याची वस्तू  त्याला सुपुर्द करणार असल्याचा अभिमान तिच्या डोळ्यांत दिसत होता .  काकूंनी तिचे आभार मानले  , " प्रेमाने तिचे नाव विचारले ";चारु !" तीनेही प्रेमानेच नाव सांगितले "तुमच्यामुळे माझी पर्स मिळाली ! नाहीतर आजकाल कोण कुणासाठी एवढे करते ?" मीही माझ्या मैत्रीणीचे आभार मानले! थैंक्स हं  !"  आभार साभार प्रदर्शन कार्यक्रम झाला    … आणि चारु बाईंनी  त्यांच्या पर्स मधून एक मध्यम आकाराची पर्स (पाउच)  बाहेर काढला  . आणि काकूंना देऊ लागल्या  … पण  .... काकू त्याच्याकडे पहातच  राहिल्या  …… !  कारण ती पर्स  काकूंची  नव्हतीच    ....!!

        काकूंच्या चेह-याकडे पहावत नव्हते   … जीवाचा एव्हढा आटापिटा करून इथपर्यंत आले    … पण काय  झाले ?  " माझा मुलगा आता मला किती ओरडेल  ..., जीवाचे हाल तर केलेच   … पूजा गेली   … पर्स गेली   … पैसे गेले  … पिशव्या गेल्या  … हारफूलें   … काही  काही हाती आले नाही   …!! "काकू तुम्हाला आता कुठे जायचे आहे ?" माझ्या प्रश्नाने त्या भानावर आल्या !  " सांताक्रुज   माझ्या घरी …!"  आता मला घेरी यायची बाकी होती    .  काकू पुनः तीन तासाचा प्रवास करणार होत्या  ....!!!!


                                                                                 
                                                                                                  " समिधा  "

      


लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......