माझा आनंदाचा ठेवा …!


     खुप महिन्यांपासून मी ऑफिसच्या वाटेवर असलेल्या त्या फुटपाथ वरुन जात येत आहे  . फुटपाथवर चने शेंगदाने वाला,  फळवाला , पेपरवाला ते अगदी चप्पल दुरुस्त करणारा यांची रोजचीच जागा ठरलेली होती  ! कधीतरी मी वर्तमानपत्र विकत घेत असे तर कधी शेंगदाणे , फळ तर कधी माझी तुटलेली सैंडल शिवून घेतली आहे ! पण एक दिवस सकाळी तिथून जाताना  त्यांच्याच रांगेत फुटपाथ लगत असलेल्या ग्रील बसवलेल्या कठड्यावर आता  एक मोठा अल्युमिनियमचा पेटारा ठेवलेला दिसला ! पण त्याच्या आसपास कुणीही बसलेले अथवा उभे नव्हते   माझे कुतुहल चाळवले ,  मी मुद्दाम त्याच्या जवळून गेले , पेटारा मोठ्या दोरानी गच्च बांधून व्यवस्थित ठेवला होता  . आणि त्यावर एक कागद चिटकवला होता  . त्यावर मराठीत लिहिले होते , येथे जुनी नवी पुस्तके विकत मिळतील तसेच अल्प डिपॉज़िट मध्ये पुस्तके घरी वाचण्यासाठीही मिळतील . वां  !!! मनातल्या मनात मी माझा आनंद व्यक्त केला ! मी इकडे तिकडे पाहिले पण कोणीच त्या पेटा-याचा मालक दिसला नाही  मी जवळच्या मोचिला  विचारले इसका मालिक किधर है  ? त्याने नुस्तीच नकारार्थी मान हलवली , मलाही ऑफिसला जायला उशीर होत होता , मी तो नाद सोडून ऑफिसला निघून आले  . 

     संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याच फुटपाथवरून जात असतांना सहज नजर पुढे गेली , तर तो पेटारा आता उघडलेला दिसत  होता आणि ग्रिलवर पुस्तकेच पुस्तके मांडलेली दिसत होती  .  माझी चाल नकळत वेगात आली आणि तिथे पोहचले, एक व्यक्ति ( पेटा-याचा मालक ) त्या ग्रिलवरील पुस्तके व्यवस्थित लावत होता। . भराभर डोळ्यात भरतील अशी पुस्तकांवर नजर फिरवली ,घड्याळात पाहिले गाडीला काही मिनिटेच उरली होती , थांबून पुस्तके चाळण्याचा मोह आवरला उद्या ऑफिस मधून जरा लवकर निघावे ऐसा विचार करून गाड़ी पकडायला धावले  .  जुनी , जुन्या लेखकांची प्रथम आवृतीतील पुस्तके मिळण्याचे हमखास ठिकाणम्हणजे फुटपाथ , असे मी अनेक मोठ्या लेखकांच्या लेखनातून वाचलेले होते , त्यामुळे मलाही एक दिवस हा खजिना मिळेल अशी आशा पल्लवित झाली .  तो विक्रेता संध्याकाळीच उन्हें उतरल्यावर आपले पुस्तकांचे दुकान इथे थाटत असे त्यामुळे मला गाड़ी पकडण्याच्या घाइगड़बड़ित मनसोक्त पुस्तके पाहताच येत नव्हती  . 

     दुस-या दिवशी ऑफिस मधून लवकर निघणे झालेच नाही।   आठवडा असाच निघून गेला , एक दिवस अगदी ठरवून लवकर निघाले , पण तो पुस्तक विक्रेता तिथे नव्हताच फ़क्त तो पिटारा त्या दिवसा सारखाच दोरान  गच्च बांधलेला  . हिरमुसुन गेले मी , पण पुढे दोन तीन दिवस असेच गेले  . मात्र त्या दिवशी तो पिटारा ही होता आणि तो  विक्रेता ही आज नेहमीची गाडी घालविण्याचे ठरवून त्या पुस्तकांजवळ थांबले , पुस्तके मनसोक्त पहिली, थोड़ी थोडक्यात वाचून  नजर फिरवली , पण एकहि घ्यावेसे असे पुस्तक मात्र वाटले नाही  . 

    त्यानंतर मी फ़क्त येता  जाताच त्या पुस्तकांवर नजर फिरवित असे , आणि पुस्तक विक्रेता आशेने माझ्याकडे पाहत असे।   पण एक दिवस मात्र थांबून त्याला विचारले जुनी चरित्र, काव्यसंग्रह नाहीत का  ? हो आहेत ना उद्या मी आणून ठेवतो , मी पण खुश झाले  . दुस-या दिवशी थोड़ी लवकर निघाले पण मला काही त्याने आणलेले पुस्तक पटले नाही  .  पुन्हा दोन तीन आठवडे असेच गेले . त्या पुस्तक विक्रेत्यानेही माझ्याकडे आशेने पहायचे सोडून दिले. 
                                                              V.H.Kulkarni 2
                                                              प्रा. वि. ह. कुळकर्णी   
     पण एक दिवस मात्र माझी मीच तिथे थबकले , एका पुस्तकावर माझी नजर गेली।  ते चरित्र होते, मधल्या काळातील, जुने वाटत होते , पुस्तक हातात घेऊन थोड़े चाऴले , पुस्तकाचे नाव होते "अच्युत बळवंत कोल्हटकर , चरित्र आणि वाङमय" आणि लेखक होते वि  . ह  . कुळकर्णी पुस्तक तसे जुने असले तरी चांगल्या स्थितीत होते , मुळातच मला चरित्र, आत्मचरित्र वाचायला खुप आवडतात, त्यामुळे अच्युत बलवंत कोल्हटकर यांच्या बद्दल मी  यापूर्वी कधीच वाचले किंवा ऐकलेही नव्हते पण तरीही त्यांचे चरित्र थोड़े चाळल्यावर आपल्याला ते नक्की आवडेल म्हणून ते मी  घेतले।   लेखक वि. ह. कुळकर्णी यांचेबद्दलही मला विशेष माहिती नव्हती पण त्यांचे नाव ऐकून होते  . पुस्तक विक्रेत्याने १०० रु. सांगितले मी  घासघिस करून व एक  "वसंतवीणा " हा  अतिशय जुना  काव्यसंग्रह रु. १० /- स घेऊन ते चरित्र रु. ६० /- घेऊनएकूण  ७०/ रुपयात   सौदा करून ते पुस्तक घरी आणले   .

     घरी येताच नेहमी प्रमाणे पुस्तकाची कितवी आवृत्ति पासून पाहायला सुरुवात केली ती पुस्तकाची १९७९ ची प्रथम आवृत्ति होती आणि सर्वात महत्वाचे आणि माझ्यासाठी सुखद  आश्चर्यकारक धक्का म्हणजे त्यावर या पुस्तकाचे लेखक  उत्तम ज्येष्ठ समीक्षक, लेखक प्रा. वि. ह. कुळकर्णी   (१४ एप्रिल १९०२ – ९ डिसेंबर १९८२) यांची स्वाक्षरी होती   . त्या प्रतिवर " श्री बापूराव नाईक  यांस  स्नेहपूर्वक भेट " असे  स्वहस्ताक्षरात लिहून त्या खाली त्यानी स्वाक्षरी केली होती ,  व दिनांक होती २९ नोव्हेंबर , ८०  .  त्यांच्या ओरिजिनल स्वाक्षरीची ही आवृत्ति माझ्यासाठी अमूल्य आहे  !   थोरा मोठ्यांची स्वाक्षरी आम्हा पुस्तक वेडयांसाठी अमूल्य ठेवा असतो  . प्रख्यात बॉलीवुड सीने नट नटयांचे ऑटोग्राफ मिळाल्यावर जेव्हढा आनंद आजच्या कॉलेज तरुण  तरुणींना होतो अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आम्हा साहित्य प्रेमींना होतो ! आमच्या साठी  तो खजिना असतो आनंदाचा ठेवा असतो   तेंव्हा मनातून उगीचच स्वतःला आम्ही  विशेष भासतो  !     
       

  
   
      वेब नेट मुळे सारेच जग अगदी आपल्या कवेत आले आहे त्यामुळे  फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क मुळे चांगले लेखक , कवी आपल्या संपर्कात येतात तेंव्हा त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्यक्ष भेटीपेक्षा इथे अधिक वाढतो कारण एवढे थोर , श्रेष्ठ असूनही समान्य वाचक साहित्य प्रेमींशी ते थेट संपर्क ठेवतात. यात त्यांचा व्यावसायिक स्वार्थ असेल नसेल पण तरीही त्यांची आपल्या भिंतीवरची दखलही अशीच त्यांच्या औटोग्राफ मिळाल्यावार होणा-या आनंदासारखी असते   .!! आणि तो आमच्या भींतीवरचा "मास्टरपीस " असतो !



                                 
                                                                                                             "समिधा "


     







     

" मन वढाय वढाय ...........!!

                                              
                            
                                                    " मन वढाय वढाय
                                                     उभ्या पिकातलं ढोर
                                                     किती हाकला  हाकला
                                                     फिरी येतं पिकांवर   …!!"

     एखादी गोष्ट हानिकारक आहे कळतय  पण मन काही ऐकत नाही    ....!!  नको  वागू तसं , नको करू तसं 
तरी हेकट  (हलकट) मन जातंच त्या वळणावर    …!!  नुसतं जात नाही चांगलं फिरून येतं मनसोक्त   ....!! किती हाकलांवं तिथून पण जरा वेळ हलेल तिथून आणि पुन्हा वाटा शोधत तिथेच पोहचेल   …!!

     मनाचा मनाला दम देऊन पाहिला…, शेवटी आपल्यालांच भोगावे लागेल , असं मनाला समजावून पाहिले !
शेवटी याची , त्याची जवळच्यांच्या  शपथा घेऊन संपल्या   …!! पण मनाला आवर नाही   …!! 
मनाने मनाचं ऐकलं नाही तर फार फार वेदना होतात  …… पश्च्चातापाच्या !!!

     शेवटी जग्गनीयतां निर्मिकालाच धरते धारेवर   .... आता तू तरी सांभाळ  …! तुझ्या शिवाय कोण तारील मला ??  तुझी शपथ पुन्हा असं करणार नाही  …!!

     पण तोहि हरतो काही दिवसात …!  आणि मनही …!!  जाते त्याच वाटेवर … पुन्हा पुन्हा सर्वदूर    …!!!


                                                      "मन भुकेला भुकेला 
                                                       नाही त्याला समाधान
                                                       कसा  आवरावा त्याला ??
                                                       मन चंचल ,  बैचेन  "
                                                      

                                     
                                                                                                    "समिधा "

                                                                                                         

                                                        

                                     





  

कधी कधी मला माझं कळतच नाही …!



               
दोन दिवसांपासून डोळे चुरचुरत होते  ....! मागच्यासारखे इन्फेक्शन झाले की काय ....? म्हणून लगेच दॄष्टि हॉस्पिटलला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन परस्पर ऑफिस सुटल्यावर जायचे नक्की झाले  .  संध्याकाळी ट्रेन मधून उतरले  ती दवाखान्याच्या दिशेने जावे की नाही मी   .... ? पण नाही  … माघी गणपती निमित्त आमच्याकडे मोठी जत्रा भरलेली आहे   …!  जाता जाता  ती जत्रा रस्त्यावरच!  भरगच्च निरनिराळ्या वस्तु बांगड्या , क्लिपा , घरगुती उपयोगी सामान   .... वा वा वा   …  मी  तर नुसती खुष नाही ते सर्व पाहुन काय काय घेऊ नी काय नाही .... वेडी झाले नुसती  …!!  आणि मग झाली ना माझी शॉपिंग सुरु   …!! हे घे  … ते घे …अहं तेही घे    …  हं हे तर घेतलेच पाहीजे   ! असं कसं हे पण घे   … !  माझी शोप्पिंगबाई ऐकाला तयारच नाही   …! अरे भैया ये क्या   … कितना महाग देता है  …! दुकानवाला एक किंमत सांगायचं माग मी मोठी हुशारच आहे टाटा बिर्ला थाटात बिजिनेस डील करुन ती वस्तु अर्ध्या किंमतीत मिळवायची …! (खरं तर त्याने मला उल्लू बनवलेले असणार ही शंका मध्येच चिमटा काढायची … ) मग , हं भैयाजी मुझे पता है ये वस्तु इससेभी सस्ती होगी नं  ! आणि तो भैया दात  निकालके मस्त हसला की समजायचं   …! मै उल्लुही बनी थी  …!!!  पण तोपर्यंत पुढच्याच्या पुढ्यातल्या पायपुसण्या मला खुणवायच्या (खुणवायच्या की मस्तच भुलवायच्या  …!!)

     अशी खरेदी करत करत निघाले  … आणि समोर दवाखाना दिसला   …! दातांचा  … !! आणि मला माझ्या डोळ्यांची आठवण झाली   … !  खरेदिला जरा आवरले   .   पर्स तपासली फक्त सातशे रुपये उरलेले   …!! एव्हढयात माझा दवाखाना भागेल  …?  मनात मोठी शंका आणि हातात हे येवढे सामान घेऊन हॉस्पिटल मध्ये प्रवेश केला!  माझ्याकडे जुनी फाईलही नव्हती   ! हं नाव बोला  … रिसेप्सनिस्ट माझ्या लहानग्या लेकीच्या मैत्रीणीची आईच होती . ( या बाईंशी   मी तिची मुलगी माझ्या लेकिला मारते म्हणून भांडले होते ) अश्या ओळखीचा फायदा घेऊन  त्या बाईंना   जरा कचरत , थोड़े चाचरत तोंडभर हसु आणत "तुम्ही आर्याची आई नां ? हो  ! आणि त्या मस्त हसल्या ! मग मी धीर करून विचारलेच " किती फी होईल हो  ?" त्यांनी न कळून   … भुवया ताणुन डोळे मोठे करून  … पाहिले  ! मग मी  माझी शॉपिंग दाखवून  … अहो लक्षात नाही राहिले हो मी दवाखान्यात निघाले आहे ते …! त्या सगळं समजून हसल्या .आणि विचारले , " किती उरलेत  ? सातशे   !! " मी  उत्तर दिले,   तीनशे कंसल्टिंग फी आणि औषधे  होतील  . "  डोळे तपासून मी बाहेर पडले  …!! 

     फाईलवर डॉक्टरांनी औषधे लिहून दिली होती   ! समोरच्या मेडिकल मध्ये गेले   ।! हसून विचारले , औषधोका कितना होगा   ?  त्याने हिशोब केला  .  ढाईसो   …! म्हणजे आपले औषधांचेहि भागेल !  औषधे घेऊन परत निघाले  … जत्रेतून   …! मघाशी अर्धवट सोडलेली बरणी  … कपांचा सेट  … खूणवलंच त्यांनी  !! गेले आणि उरलेले सगळे रुपये संपवले   … हा हा हा दिल खुष हो गया  … !!  ढीगभर पिशव्या , पर्स , फाईल  कशातरी सांभाळत , सावरत … निघाले  … !!  आता घरापर्यंत स्पेशल रिक्शा करावी लागणार   …! 

     आणि लक्षात आले रिक्शावाल्याला द्यायलाही पैसे उरले नव्हते   …! तेव्हढ्यात एक ट्रेन आली   …! रिक्षेला गर्दी वाढायच्या आत रिक्शा पकडली   …! चार सीट मिळतात गर्दीत रिक्शावाल्यांना, मग आम्हा स्पेशल वाल्यांना कोण विचारतो   … ?

     रिक्शा ज़रा पुढे आल्यावर हळूच अतीव मायने रिक्शावाल्या दादाला बोलले , भाऊ  … तुम्हाला माझ्या घराजवळ  थोडवेळ  थांबावे लागेल हं   .... ! माझं वाक्यही धड़ पूर्ण होऊ न देता   … मी असं बोलते नाही तर तो उसळलाच   … ओ  … काय पण तुम्ही ताई   … आधी नाही का बोलायचं   … धंद्याच्या टाईमाला खोटी करता माझी  … ( तो सगळं न सांगताच समजला होता  ! अशी त्याला उल्लू बनवणारी मी  पहिलीच  नसावी ) आता तुम्ही उतरणार कधी  … वर जाणार कधी   … आणि माझे पैसे देणार कधी  ?  फोन लावा फोन लावा घरी  … खाली आणून देतील कुणीतरी  पैसं !  "भाऊ, माझं घर वर नाही खालीच आहे  !"    पण  नाही ओ घरी कोण पण नाही  …!! पण मग तर तो जास्तच उसळला ....  आणि त्याच्या दुप्पट त्याची रिक्शा उसळायला लागली ! आदळत आपटत फास्ट मध्ये कशीतरी रिक्शा घराजवळ आली  .  दरम्यान मी इथून तिथून पर्स मध्ये हात  घालून चिल्लर गोळा   केली   … एखाद कागदी नोट  असे   तीस रुपये त्याच्या हातावर ठेवले   …!  "भाऊ! तुमचं नशीब चांगलं म्हणून मिळाले   …!  आणि मग तो शेवटचा उसळला "काय वो तुमी ताई   .... फुकाट टेन्शन वाडीवला माझा , तुमचाबी नशीब चांगला म्हणून यवस्तित  पोचल्या  घरी…  ख्या ख्या ख्या …!!  मी सेंकंदभर स्तब्धच ! , आणि  मग मी पण  ख्या ख्या ख्या   करीत रिक्षेतुन सामाना  सहीत   उतरले   … !!  खरंच  कधी कधी  माझं  मला  कळतच नाही  …!!! :)

            
                                                                                                     "समिधा "


तीळ गुळ घ्या गोड बोला ....???

8291363514 .,8433677524      तीळ गुळ  घ्या गोड बोला असं म्हणत हातावर तिळगुळ ठेवायचा थोरा  मोठ्यांच्या वाकुन  पाया पडायचे आणि मनात गोडवा साठवत छान हसत पुढे जायचे  !!

        लहानपणी आम्ही पोरिसोरी आईची साड़ी आणि न होणाऱ्या पोलक्याला  नको तेवढे टाके मारून  नाहीतर शाळेच्या शर्टाची कॉलर आत दुमडून घ्यायची आणि आपल्या मापाचा ते पोलकं  घालून नटून थटून घरोघरी 
अगदी शेजार पाजार  गावातील जमतील तेव्हढी घरे आम्ही पोरी  फिरत असू  !  चिमुकल्या त्या आम्ही आम्हाला साड़ी सावरत चालतानाची आमची धडपड कधी जाणवली नाही  !  ओळख न पाळख अश्या घरांत 
गेलो तरी अामचे हसत स्वागत व्हायचे  …! आम्हीही बिनधास्त घरातील प्रत्येकाला तिळगुळ देऊन  वाकुन 
नमस्कार करायचो  ।!  मग आमच्या हातात लाडू नाहीतर चॉकलेट मिळायचे   ।!   तेंव्हा होणारा आनंद वीचारु नका   .!

             आमच्या गावात एक नीमकर वकील होते.  दिसायला आड़ दंड  भल्या मोठया मिशा  आणि आवाज तर तोफेसारखा  …!!  त्यांच्याकडे एक कुत्रा होता  … तोहि तसाच भलामोठा  !!  शाळेच्या रस्त्यावर त्यांचे 
घर होते   … जाता येता  आम्ही त्याला  खूपच घबरायचो  .... कुणीही दिसले की कुत्रा असा काही भुंकायचा की आमची पाचावर  धारण बसायची  !  मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र आम्ही सर्वजनी  नीमकर वकिलांच्या वाड्यावर  जायचोच अगदी कुत्रा असला तरी   …!!   कारण या दिवशी नीमकर वकील कुत्र्याला बांधून ठेवत   ।! आणि सर्वात खरे कारण म्हणजे नीमकर वकील आम्हाला एक नाही दोन  नाही चांगली चार पाच  चॉकलेट देत तिही  अगदी वेगळी जी गावात कुठेच कधीच मिळत नसत  .  

               तिळगुळ वाटून पाय थकायचे पण आम्ही मनाने मात्र उत्साहित असायचो   … रात्री  उशिरा पर्यंत 
गावत फिरून  तिलगुळ वाटून  घरी परतायचो  तो  साठवलेला गोडवा जिभेवर  ठेवून घरच्यांना गमतीजमति सांगायचो   ....!!

                  आज मात्र हे दिवस हरवलेत   …!  पोरिसोरींना गावभर अनोळखी लोकांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटण्यासारखी परिस्थिती  राहिलीय  कुठे  …!!  तो गोडवा ,  ती  माणसे  भेटतील  का कधी   …??


       8291363514 .,8433677524         
                                                                                                            " समिधा "


" आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय .....!!!

     

                                                  


          आज सावित्रीबाई फुलेंची १८३  जयंती  …!! आम्हा आया बायांची मूली बाळींची ज्ञानाई माउली …!
 प्रतिगामी म्हणवणा-या समाजाच्या शिव्या शाप झेलुन न डगमगता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले नसते 
तर आज मी हा त्यांच्यावरील कृतज्ञतेचा लेख लिहु शकली नसती ! 

          मुलींना शिकवणे म्हणजे सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून  सनातन्यांनी विरोध केवळ विरोध केला नाही तर . अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. हा सनातन धर्मांधळा समाज किती क्रूर होऊ शकतो याचे आज आपण साक्षीदार आहोत  …! त्या सनातनी कर्मठ काळात महनीय सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेणाचे गोळे खाल्ले  आणि आज  पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी "मलाला युसफजई "  कर्मठ जिहादी तालिबनियांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलत आहे  .! 

       सावित्रीबाई फुले यांच्या  कार्याची माहिती आणि महती सर्वश्रुत आहे .  त्या काळात बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता.त्यांच्या पुढ्यात समजाने सती  किंवा केशवपन हे दोन मार्ग ठेवले होते  .! जीवंतपणी  मरणयातनाना रोज सामारे जात जगणे नाहीतर कुणाच्या तरी भोगाचे बळी ठरुण गरोदर रहाणे 
 मग आत्महत्या नाहीतर भ्रूणहत्या   .... !  समाजाच्या या क्रुरतेला ब पडलेल्या बाळींना या माउलीने पदरात घेतले त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली हे सर्व सनातनी कर्मठ समाजाच्या चालीरिती , परंपरा याच्या विरोधी जाऊन तेही स्त्रीने हे काम  करणे म्हणजे डोक्यावरून पाणी !  पण हे कार्य केले नसते तर मुलींच्या शिक्षणाची मुहर्त मेढ रोवली गेली नसती  .
           आज आम्ही तिच्या लेकी  लिहुवाचू शकतो   …! तिच्यामुळे आमच्या पंखात बऴ आले  …! आमच्या 
विचारांना , आमच्या अस्तित्वाला अर्थ आला आहे.  " आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय , मी सडून होतो , पडून होतो , कुढून होतो  …! नाहीतर माझे आयुष्य एक पोतेरे झाले असते  .!  आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय …!!  ही जाणीव या माय ने आमच्यात जागवली   !! तिचे आम्ही ऋण कधीच फेडू शकणार नाही  .!
         आजही  सवित्रीच्या आत्म्याची नितांत गरज आहे   .!  आजही आम्ही नागवले जातो , पुरुषी  मानसिकतेपुढे  नमवले जातो    …!  आजही आम्हाला प्रश्नांची उत्तरे मागताना संघर्ष करवाच लागतो  …!
   तुला आमच्यातले विझलेले निखारे नकोत , हुंदके नकोत आसवांचे झरे नकोत , तुला हवेत  आमच्यातल्या पेटत्या मशाली , आन्यायाच्या छाताडावर  नाचना-या वीरांगनी  …!!  तुझ्या प्रेरणेने आम्ही उभ्या राहु  , आमच्या छाटलेल्या पंखाना नवे  बळ मिळवत राहु    ....!हीच आमची ज्ञानाई माउलीतुला श्रद्धांजलि   …!!

           

                                                                                    "समिधा"


          
    

                                                 


                   

       

सन २०१५ तुझे स्वागत आहे ....!!


 


                                                   सन २०१५ तुझे स्वागत आहे   ....!!

      सन २०१४ आज सरत चालले आहे…! तस तशी मनाची घालमेल, हुरहूर  वाढते आहे  …! प्रत्येक वर्षाप्रमाणे
यही वर्षी परमेश्वरचे नामस्मरण करून नूतन वर्षाचे स्वागत करणार  ।!   नव्या आशा , नवे संकल्प, नवी स्वप्न, नवी स्वत:ला इतरांना दिलेली वचने पूर्ततते साठी परमेश्वाराची कृपादृष्टि मागणार  …!!

      मी  सहज मागे  पहाते  … मी हर्मोनियम शिकणार होते  … ! कधीपासूनची माझीच ही इच्छा पण दरवेळी अडचणी वाकुल्या दाखवून पूर्ण होऊ देत नाहीत  …! यावर्षी पुनः संकल्प केला आहे  …! माझी मैत्रीण नंदिनी केंव्हाची तिची नविन पेंटिंग्स पाहायला बोलवते आहे  , अजुन मी पोहचले नाही. पुस्तकांचे कपाट , त्यातील पुस्तके रोज येता जाता हाक मारतात  । पण त्यांच्याकडे केवीलवाने पाहुन सरळ किचन कड़े धावावे लागते
नाहीतर लेकिच्या  चिमुकला आवाजात पुस्तकांचे आवाज विरुन जातात   …!

      तरीही नव्या आशांनी , नव्या स्वप्नांनी  नवीन वर्षाचे माझ्या मनाचे , माझ्या इच्छांचे कैलेंडर भरगच्च
भरले आहे  …!  नव्या नव्या संकल्पांच्या फुलांनी माझे इच्छेचे झाड़ डवरले आहे  !!   अवकाश फ़क्त येत्या
दिवसांमधली माझी सृजनात्मक ऊर्जा टिकण्याची   .... वाढण्याची....! ती  मला लाभो आणि माझ्या सर्व
सहोदरांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना  ....!

      नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा   …! २०१५  तुझे मन:पूर्वक स्वागत   आहे  …!!

       

"कागदी " पण .... "जिवंत माणसे " !!

       काल १५ ऑक्टोबर २०१४ मतदानाचा  दिवस   …!! सकाळी उठले खूपच अस्वस्थ होते  …! कारणही  तसेच होते  …! माझा नवरा सकाळीच मस्त दाढ़ी करून  कड़क इत्श्रीचे  कपडे घालून शीळ  घालित मतदानाला जायची तयारी करत होता  ! ( जसा काही मैत्रीणीला भेटायला निघाल्या सारखा )  आदल्या दिवसापासून मला तो चिडवत होता  …! सरकारी  माणसे असून घरात बसणार आणि आम्ही मतदानाचा हक्क बजावणार  ! नागरिकत्वाचा हक्काचा हक्क ! त्यामुळे मी  जरा घुश्शातच होते  ! एवढे वर्ष निवडणुकीचे कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान कधी करता आले नाही, पण निवडणुकीचा एक भाग म्हणून या प्रक्रियेत असल्याचे समाधान मला नक्कीच मिळायचे  … पण या वेळी नेमकी माझी इलेक्शन ड्यूटी लागलीच नाही आणि एवढे वर्ष लग्नानंतर मतदार यादीतील नाव सासरी स्थलांतरित केले नाही  ! त्यामुळे मतदार यादीत नावच नव्हते  मी  खूपच हिरमुसले होते  ! जाताना घरातले सर्वच मला मुद्दाम आवाज देऊन जात होते   …!  शेवटी न राहून आईकडे फ़ोन लावला   luck by chance घ्यायचे ठरवले   … ! " आई माझ्या नावाची इलेक्शन पावती आली आहे का गं ?"  मी   .  " हो  …! " आईचे ते शब्द ऐकून मी जोरात ओरडलेच "काय  खरंच ?"  हो का  गं ? येतेस का ?" मी पण केले नाही मतदान थांबते  तुझ्यासाठी  " आई   .  हो  ! निघते लगेच ! मी  . 

         पण एक प्रॉब्लम होता लग्नानंतर माझे नाव पत्ता सारेच बदलले होते  ! जुन्या नावाचा आयडी प्रूफ काहीच नव्हता शेवटी माझा प्यान  कार्ड शोधून काढले त्यामध्ये माझ्या नावा सोबत माझ्या बाबांचे नाव होते  … बस्स एव्हढेच ! पण तरीही मला मतदान करू देतील की नाही याची खात्री नव्हती  … ! पण इच्छाशक्ति जबरदस्त होती   ! दुपारची गाडी पकडून माहेरी गेले आणि मतदान केन्द्रावर जाऊन आईच्या मागे रांगेत उभी राहिले !  एक मतदार म्हणून मी ब-याच वर्षानी अनुभव  घेत होते   .!  मतदान केंद्रात प्रवेश केला आधी आईचा नंबर होता आईकडे फक्त एक पावती आणि रेशनकार्ड होते आणि मतदान अधिक-यांकडून अपेक्षित प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली  ! " अहो मैडम तुमचा फोटो  कुठे आहे ? सगळे आहे हो , पण मला वाटले यादीत  माझा फोटो असेल मी फार जुनी मतदार आहे हो, गेली चाळीस वर्षे इथे राहते !  नाही    … ! तसे चालत नाही ! चला तुम्ही बाजूला उभ्या रहा !"  आता माझा नंबर होता ! तुमचे यादीत नाव वेगळे आहे ,"  । "यादीत तुमचा फोटो नाही " काही आयडी प्रूफ आहे का ? " मी  माझ्याकडील प्यान कार्ड दाखवले ! " अहो पण यात तुमचे नाव वेगळे आहे ", " हो ते लग्नानंतरचे आहे "! पण त्या खाली पहा माझ्या वडिलांचे नाव आहे "!  तेव्हढ्यात पी आ रो  धावत आले  ! नाही मैडम नाही चालणार  …!  " का नाही चालणार ? तुम्हाला आवश्यक ते सारे प्रूफ आहेत की   । जूने  नाव आहे  … नविन नाव , फोटो आहे , आणि माझ्या बाबांचे नाव आहे   ! आणि सर्वांशी जुळणारी मी स्वत: इथे उभी आहे   !  साहेब ! मी तीच आहे   …!" आणि ही शेजारी उभी आहे ती माझी सख्खी आई आहे !! त्यांचा प्रश्न वेगळा आहे पण  तुमच्याकडे बँकेचे वगैरे पासबुक  काही ? कशाला। .? त्यातही हेच पाहाल ना ? मग ? शेवटी पि आ रों  .  ना मला मतदानाची परवानगी द्यावी लागली   ! मी विजयी थाटात बोटावर शाई लावून  । दिमाखात ईव्हीएम मशीनचे बटन दाबून  … बाहेर आले ! 

       बाहेर येऊन आईला पाहिले तर ती बाहेर नव्हतीच   । आत डोकावले तर ती पुनः पि आ रो ला विनंती करीत होती   ।!  बिच्चारी मतदान न करताच तशीच बाहेर आली   …!  आज मतदान यादीत तुमचे नांव असले आणि प्रत्यक्ष तुम्ही असलात तरी कागदी आयडी प्रूफला फार महत्व होते   …!! इथे ओरिजिनल पेक्षा तुमची झेरॉक्स कॉपी भाव खाऊन जाते  …! म्हणजे  कागदी निर्जीव माणूस जिवंत माणसामध्ये प्राण फुंकतो  आणि त्याला मतदान करता येते  … मी तोच /तीच आहे   … आणि अजूनही जिवंत आहे ! असे कागदी लिव्हिंग सर्टिफिकेट आणाल तरच पेंशनरांना पेंशन मिळते   …!!  म्हणजे आपण सारे कागदी जिवंत माणसे आहोत  …!!  स्वत: पेक्षा आपल्या अस्तिवाचे प्रूफ आसना-या कागदांना जपून ठेवा हां  .... !!

                                                                      

                                                                                                     "समिधा"  


" एकेकाचा एक दिवस ....!"


      ठाण्याला बदलापुर ट्रेनच्या लेडीज डब्यातून  त्या  काकू धडपडतच कश्याबश्या उतरल्या  , हातात दोन कापड़ी कश्याने तरी भरलेल्या पिशव्या  . उतरल्या त्याच गाडीतल्या गर्दीने भेदरलेल्या घाबरलेल्या   … उतरताच त्यांच्या लक्षात आले आपली पर्स खांद्याला नाही  । बिचा-या आणखीनच काव-या बाव-या झाल्या  लेडीज डब्या समोर इकडून तिकडे तीकडून इकडे  धावत " अगं बायांनो कुणीतरी माझी पर्स दया गं   आतमध्येच पडली ओ  !" त्यांची ती केविलवानी स्थिति पाहून प्लेटफार्म वरच्या आम्हा बायकांना त्यांची दया आली   .  माझ्या सह एकदोघी जणी त्यांच्या मदतीला धावलो पण तेव्हढ्यात ट्रेन चालू झाली   … इतक्यात  कुठल्या तरी डोअर मधून आवाज आला  "आहे आहे पर्स  मिळाली !" आणि  गाडीने वेग घेतला !! बिचा-या  काकू रडकुंडीला आल्या   .  तेव्हढ्यात मी पटकन हातातल्या मोबइलवर माझ्या मैत्रीणीचा नंबर फिरवला ती  त्याच गाडीतून प्रवास करीत होती ( अती गर्दीमुळे मी ती  गाड़ी सोडली होती ) नशीब तीने कॉल घेतला  !  " अगं गाडीत कोणती पर्स मिळाली का गं  ?"  तिने विचारुन तुला पुन्हा कॉल करते सांगितले   .  काही मिनिटातच  तिचा कॉल आला   " अगं मिळाली आहे   …  ती  बाई बदलापुरचीच आहे,  ती  म्हणाली  मी बदलापुरला  प्लॅटफॉर्मवर थांबते त्यांना बदलापुरला यायला सांग  …!!

     काकू तुम्हाला कुठे जायचे आहे ?  अगं मला इथेच एक   स्टेशन पुढे जायचे कळव्याला   …!! " काय  … !! मी आश्चर्याने विचारले    . अहो मग ह्या फ़ास्ट ट्रेन  मध्ये कशाला चढलात   .?  स्लो कुठलीही चालली  असती  .  काय  सांगू   ! मी  जास्त  काही  ट्रेनचा प्रवास करीत नाही  …!  गाडीत चढले तेंव्हा कळले ही गाडी कळव्याला थांबत नाही  … म्हणून ठाण्याला धडपडत कशीबशी उतरले   ! तरी माझा मुलगा सांगत होता आई दुपारच्या गाडीने जा गर्दी कमी असते  .  पण  ऐकले नाही  ! बाई बाई संध्याकाळी कसली ही गर्दी   …!  आता मी  काय  करू  ? माझा मुलगा मला ओरडेलच   ! पैसे पर्स सगळेच गेलं  !  तुमची पर्स मिळाली पण ती  बाई बदलापुरची आहे  .  ती  थांबणार आहे प्लॅटफॉर्मवर  !! काय करता  ?  हो हो मी बदलापुरला येते म्हणून सांग  तिला   !! पर्स मिळाली तर बरेच झाले  !!   पण काकू तुम्हाला परत गर्दीच्या गाडीतच चढ़ावे लागणार   …!  चढाल  ना   ?  ह्या गाडीला पण गर्दी असते  …!! हो गं हो चढायला तर लागेलच   …!!"

     तेव्हढ्यात  गाडी आलीच  … काकू आपल्या हातातल्या दोन्ही कापड़ी पिशव्या  पकडून आता गाड़ी पकडायचीच ह्या तयारीत उभ्या होत्याच  …!! गाडी आली ही तूफान गर्दी उतरली  … आणि तेव्हढीच तूफान गर्दी  डब्यात घुसण्यासाठी रेटारेटी करत जीवाच्या आकांताने गाडीत चढली  …!! मीही त्या गर्दीत धक्केबुक्के खात कोपर आडवे तिडवे करीत गर्दी कापत आत घुसले  … चढताना त्या काकूंचे काय झाले असेल  …? चढल्या  असतील का  …? हे विचार डोक्यात होतेच   …!  दारातून आत मी कशी तरी  आले। . मागुन  बायका धक्के देतच होत्या मी अजूनच आत लोटले गेले  … !  मी त्या काकुना मागे पुढे पाहण्याचा  प्रयत्न करीत होते  तेव्हढ्यात माझ्या मागून कुणाच्या तरी धक्क्याने त्याही आत लोटल्या गेल्या   …!  आत आल्या  पण हातात पिशव्या नव्हत्याच  ....  पिशव्यांऐवजी  पिशव्यांचे फक्त हॅन्डलच ( बंदच ) होते  ....!  काय हो काकू पिशव्या कुठे आहेत  …? अगं  बाई पिशव्या कुठे गेल्या  …?  मेल्या ह्या गर्दीत माझ्या पिशव्या पण गेल्या !! त्या , मी  इकडे तिकडे खाली शोधायला लागलो   … इतक्यात  दारातल्या बायका  ओरडायला लागल्या  " हे नारळ कुणाचे पडलेत ....? फुलं  हार  ....!!! कुणाचे आहे हे  … ?  काकू तश्याच दाराकडे धावल्या   … माझं  माझं  आहे ते  सगळं  !" बायकांनी  एक दोन  नारळ  उचलून दिले  । हार फुलांचा तर कचराच झाला होता  …!! तुटलेल्या पिशव्यापैकी एकच पिशवी होती तीही बायकांच्या पायांखाली येऊन पार मळुन गेली होती   . दुस-या पिशवीचा पत्ताच नव्हता  . बहुतेक ती बाहेरच फेकली गेली असेल  ! नारळ घेऊन काकू गर्दीतून कश्या बश्या परत आत आल्या …! "अगं  कळव्याला दिराकडे चालले होते  ।! आमची कुलदेवता असते त्यांच्याकडे  … आज तिची पूजा मांडली होती म्हणून दर्शनाला हे सारं घेऊन निघाले होते  …!!  काय गं  माझी ही दशा   …!  परत म्हणून मी ट्रेनला  यायची नाय बाबा   !! कशा  गं  पोरींनो तुम्ही रोज प्रवास करता  …??" ह्या  सा-या प्रकाराने  काकू वैतागल्या होत्या   ! पण त्यांच्याकडे दूसरा पर्याय पण नव्हता   .  मला मात्र त्यांची दयाही येत होती   . पण सा-या एकूणच प्रकाराने हसुही येत होते  ! गाडीत बसायला मिळालेच नाही ,  प्रत्येक स्टेशनला गर्दी कमी जास्त चढ़त होती , उतरत होती  !  इतक्यात माझ्या मोबइलची रिंग वाजली  ....  पहाते  … तर त्याच मैत्रीणीचा कॉल होता   … " काय गं  ? हो हो आम्ही दहा मिनिटांत पोहचूच आता   …!!  हा हां त्यांना  प्लेटफार्मवरच्या कैंटीन जवळ थांबायला सांग    !! ओके  । बाय  थैंक्स हां   !!" मी मोबइल  ठेवला  . काकू माझ्याकडेच काय झाले , प्रश्नार्थक   बघत होत्या  .   " काकू त्या बाई थांबल्यात प्लॅटफॉर्मवर  … काकूंच्या चेह-यावर एव्हढयावेळात पहिल्यांदाच हसु दिसले   ! चला एव्हढया खटपटी -लटपटी ,त्रासा नंतर निदान आपली पर्स तरी आपल्याला परत मिळतीय ह्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते  .

         गाडी स्टेशनमध्ये आली    ! उतरताना पण ही एव्हढी  गर्दी   .  काकूंना मी  माझ्या पुढे घेतले आणि लोटालोटित  आम्ही खाली प्लॅटफॉर्मवर उतरलो   !  एवढ्या गर्दीची काकूंना सवय नव्हती  .  मी त्यांना थोडावेळ  तिथल्याच एका बाकड्यावर बसवले  . कैंटीन मिड्ल डब्या जवळ होती  !   प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी झाली  ।! काकूंना मी हात धरून  उठवले   । कश्याबश्या  त्या उठल्या  .  आम्ही कैंटीन जवळ पोहचलो  माझी मैत्रीण व ती बाई तिथेच उभ्या होत्या  …! मी  तसे  काकूंना सांगितले  आणि काकू जरा उत्सहानेच  जोरात चालू लागल्या।   त्या त्यांची पर्स घेण्यासाठी उत्साहित  झाल्या होत्या  .  आम्ही त्यांच्या जवळ पोहचलो   , ती  बाई अगदी आनंदाने हसली   । कुणाला तरी त्याची वस्तू  त्याला सुपुर्द करणार असल्याचा अभिमान तिच्या डोळ्यांत दिसत होता .  काकूंनी तिचे आभार मानले  , " प्रेमाने तिचे नाव विचारले ";चारु !" तीनेही प्रेमानेच नाव सांगितले "तुमच्यामुळे माझी पर्स मिळाली ! नाहीतर आजकाल कोण कुणासाठी एवढे करते ?" मीही माझ्या मैत्रीणीचे आभार मानले! थैंक्स हं  !"  आभार साभार प्रदर्शन कार्यक्रम झाला    … आणि चारु बाईंनी  त्यांच्या पर्स मधून एक मध्यम आकाराची पर्स (पाउच)  बाहेर काढला  . आणि काकूंना देऊ लागल्या  … पण  .... काकू त्याच्याकडे पहातच  राहिल्या  …… !  कारण ती पर्स  काकूंची  नव्हतीच    ....!!

        काकूंच्या चेह-याकडे पहावत नव्हते   … जीवाचा एव्हढा आटापिटा करून इथपर्यंत आले    … पण काय  झाले ?  " माझा मुलगा आता मला किती ओरडेल  ..., जीवाचे हाल तर केलेच   … पूजा गेली   … पर्स गेली   … पैसे गेले  … पिशव्या गेल्या  … हारफूलें   … काही  काही हाती आले नाही   …!! "काकू तुम्हाला आता कुठे जायचे आहे ?" माझ्या प्रश्नाने त्या भानावर आल्या !  " सांताक्रुज   माझ्या घरी …!"  आता मला घेरी यायची बाकी होती    .  काकू पुनः तीन तासाचा प्रवास करणार होत्या  ....!!!!


                                                                                 
                                                                                                  " समिधा  "

      


जाणीव .....!!!


      नोकरी निमित्त माझा रोजचाच ट्रेन चा प्रवास  …!! मुंबईच्या लोकल ट्रेन्सला कधीही जा खच्चून भरून वहात असतात  …!!  बायकांसाठी तर मोजून तीन डबे   …!!  आणि फर्स्ट क्लासचे डबे  म्हणजे  "एक किचन"  नाव  पण अगदी परफेक्ट दिले आहे  … ! या डब्यात मोजून तेरा सीट असतात  …!! त्यामध्ये चौथी सीट नो अलाउड   …! अश्या ह्या किचन मध्ये एका वेळी आम्ही पन्नास बायका घुसतो  ....!!  एकमेकींच्या पायावर पाय देत  !! खांद्याला खांदा भिडवून शाब्दिक चकमकी घडवून  … प्रवासाचा महामेरु सर करीत घराचा गड गाठत असतो   …!!

      त्यादिवशी  नेहमी प्रमाणे ट्रेनला गर्दी होतीच  … पण जरा जास्तच होती  …!!   ट्रेनमध्ये चढण्याचे दोन प्रयत्न फेल गेले  …!  पण मला  काही डब्यात घुसता आले नाही  !! माझ्यासारखी डब्यात  चढण्याची धडपड   रिटायरमेंटला आलेल्या  अजुन दोन काकू करीत होत्या   .  शेवटी त्यातील एक जण  म्हणाली " आज काय मेलं  आपल्याला गाडीत चढ़ता येईल असे वाटत नाही …!" लेडीज फर्स्ट क्लास ला लागूनच "अपंगांचा " डबा असतो  … ! तुलनेने त्यामध्ये एव्हढी गर्दी नसते    . लगेचच दूस-या काकू म्हणल्याच चला गं आपण त्याच डब्यात चढू   … मी  मात्र काकू काकू  करायला लागले   …  कारण  त्यांचं ठीक होतं   । त्या दोघी वयस्कर होत्या   … पण मी  मेली तरुण तुर्क त्यांच्या बरोबर अपंगांच्या डब्यात चढायचे म्हणजे फारच गिल्टी वाटत होते  …!! गिल्टी वाटण्यापेक्षा भितीच  जास्त …!! पण शेवटी मनाचा हिय्या करून एक काकू पुढे आणि दुस-या माझ्या मागे  . अश्या एकदाच्या "त्या " डब्यात चढ़लो  … पण आम्ही जेमतेम आत घुसु शकलो होतो  … माझ्या मागच्या काकू मागून बोंबलायला लागल्या " अगं जरा पुढे सरका मी  दाराशी लटकतेय   … ! पण माझ्या पुढच्या काकू  का कोण जाणे पण पुढे काही सरकतच नव्हत्या  …!!  " काय  झाले काकू पुढे सरका  नं  …" अगं  कशी सरकू   ......... माझ्या पुढे खाली एकजण बसला आहे  … !"   खाली बसला आहे  ……… ?"  माझी सटकलीच  … मागे त्या  काकू लटकतायत  आणि हा पठ्या खाली बसलाय  … !! काय माणुसकी बिणुसकी आहे की नाही  …? " ओ भाऊ जरा आत सरको   … दिखता नही लोक लटक रहे  है   …!  थोड़ी बी माणुसकी नहीं है   … !!  माझ्या  मराठी मिश्त्रित हिंदीला त्याने जोरात धक्का दिला " ओ मॅडम मै  "अपंग " हूँ  दिखता नहीं  …? मला  काय बोलावे सुचलेच नाही  त्या  गर्दीच्या भाऊगर्दीत मी अपंगांच्या डब्यात घुसून हुशा-या मारत होते  …!!! मागच्या काकूंचा आवाज आपोआपच बंद झाला   …!! 
  
     कुठले तरी स्टेशन आले ( गर्दीत बाहेरचे काहीच समजत नव्हते ) गर्दी थोड़ी कमी झाली आम्ही लगेचच आत सरकलो   …  तेव्हढ्यात डब्यातली माझ्या जवळची एक बाई  माझ्याकडे पायपासून  वरपर्यंत  पाहत होती   । तिच्या नजरेला मी वाचवत होते  । तेव्हढ्यात  " तुमचं काय मोडलय  …? "  तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नाला काय  उत्तर दयावं   ?  काही  नाही मोडलं  … काही मोडु नये  नं म्हणून इथं आलो  ! माझ्या बरोबरच्या काकू आधीच तत्परतेने आपला डावा हात खाली वर करून माझ्या हातात रॉड घातला आहे  बरं …!! विचारणारी बाई पण धड़ धाकटच  दिसत होती  । मी पण लगेच सूडाने विचारले तुमचे काय मोडलय   …?  तिने तिच्या जवळ बसलेल्या तिच्या अपंग मुलाकडे बोट दाखवले  … ! ह्याला पाय नाहीत  …!!  मी  पुन्हा एकदा  पार ख़जिल  खल्लास  !!

     मी सुन्न दारात  उभी राहीले  । डब्यात  सभोवर नजर फिरवली  .  प्रत्येक सीट वर कुणीतरी आंधळे बसले होते, कुणाला पाय नव्हते , तर कुणाला हात नव्हते   !!  कुणाच्या डोक्यावर केस नव्हते ते  फडकी गुंडाळलेली कॅन्सर  पेशंट होते   …!!  ते माणसाच्या जीवनाचे वास्तव चित्र होते  …!! त्या तश्या अवस्थेत प्रत्येकजण जगण्यासाठी धडपडत  होता  …!!   डबाभर ते दुःख असले तरी मला ते जगातील दुःखाची जाणीव करून गेले  …!! माझ्या पूर्णत्वाची जाणीव करून देणारा तो  अपंगाचा डबा त्याने मला माझा आरसा दाखवला   !! छोट्या छोट्या अडचणींना दुःख समजून कवटाळायचे आणि मिळालेल्या ह्या पूर्णत्वाला नकारुन सुखी जीवनापासून स्वतःला दूर ठेवायचे  …!! मला हे सत्य माहित नव्हते असे  नाही  पण आज मला सत्याची प्रखर जाणीव झाली  …!!  



     माझे स्टेशन आले मी  उतरले   आणि  खटकन माझी चप्पल तुटली मी  तीला तिथेच सोडले  आणि माझ्या मोकळ्या पायांनी चालायला लागले न लाजता  …!!


                                                                                           "  समिधा  "


आणि समजाने तिला फुलनदेवीचा अवतार समजले तरी बेहत्तर ……!!!


      बदाउन मध्ये दलित मुलींवर झालेला बलात्कार आणि त्यांची निघृन केलेली हत्या ही क्रुरतेची परिसीमा आहे  …! स्त्रियांच्या कर्तृत्वाच आलेख जेवढा वाढत आहे। … त्यांच्यावरील आत्याचारात जास्तीतजास्त वाढ होत  आहे  ....!!!  तिच्या योनिशुचितेचा अपमान म्हणजेच स्त्रीयांचे दमन  !!!  ह्या  सामजिक पुरुषी आहंकाराचा , मानसिकतेचा बिमोड करायचा असेल तर दुर्गा माता होऊन स्त्रियांच्या हातात शस्र येण्यास वेळ लागणार नाही …!! आणि समाजाने तिला फुलनदेवीचा अवतार समजले तरी बेहत्तर   ……!!!


                                                                                                                           "समिधा"





                                                                                                               

हीच हिन्दू धर्माची अस्मिता ....?

     "पुण्यात एका मुस्लिम युवकाची हिन्दू राष्ट्र सेना  कार्यकर्त्यांकडून हत्या झाली " का ? तर अमेरिकेतून कुणीतरी फेस बुक वर आपल्या पूज्य , आदरणीय महापुरुषांचा अपमान केला !  म्हणून भारतातील एका निरपराध मुस्लिमाची ह्त्या करून ह्या अपमानाची भरपाई झाली  …? अतिशय निंदनीय आणि   माणुसकीला काळीमा फासणारे  हे कृत्य आहे  ....! हीच हिन्दू धर्माची अस्मिता    ....?


                                                                                                         "समिधा" 

क्रांति घडली …!


    
 
     सहा महिन्यांच्या रणधुमाळीनंतर अखेर काल क्रांति घडली  …! आता पर्यंत चार कुबड्या घेऊन चालनारे सरकार आणि त्यांचा कोणाचा कोणाला पायपोस नाही....! त्यामुळे आंधळं दळतोय आणि कुत्रा पीठ खातोय  …! अशी परिस्थिति हिंदुस्थानात होती....!  (एक हाती सत्ता असती तर असे घडले नसते असेही ठामपणे म्हणणे अतिशयोक्ति होईल !)

      "मोदी" सरकारच्या हाती एक स्थीर सरकार देऊन हिंदुस्थानी जनतेने मोठ्या विश्वासाने आपले सरे भविष्य त्यांच्या हाती सोपविले आहे  …!  आतापर्यंत भारतीय जनता विभ्रमा अवस्थेत होती....! आपल्या नक्की कोण तारणार  …?  एक आश्वासक नेत्याची.... त्याना गरज होती  …! आज भारतातील प्रत्येक सामान्य आणि मध्यम वर्ग महागाईने त्रासला आहे  …! दैनंदिन गरजा भगवताना त्यांची होणारी दमछाक  । त्यामुळे देशाचा विकास  … देशाचे सौरक्षण  … थोडक्यात देशभक्ति  … याना मनातच दाबून स्वरक्षणाय आणि स्वभक्षणाय या मध्ये बिचारा पिचून गेला आहे…! 

       काल "मोदींचे " वड़ोदरा येथील भाषण ऐकले  …! त्या भाषणात जो जोश होता  … जो आवेश होता आणि त्यांची जी भाषा होती ती अतिशय प्रभावशाली होती  …! (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा यांच्या भाषणाची आठवण करून  देणारे भाषण)  भारताला याच आश्वासक  … आत्मविश्वासकतेची गरज आहे   …!  एक अश्या नेतृत्वाची गरज प्रत्येक आंदोलनासाठी लागतेच  …!  आणि हिंदुस्थानला पुढे न्यायचे असेल तर… हिंदुस्थानात  राहना-या प्रत्येक भारतीयाचा विकास होणे गरजेचे आहे  ....! त्यांना भिक नको काम दया  ....!  स्वाभिमान दया  ....! त्यामागे देशाभिमान असेल तर देशाला विकसाकडे नेणे कठीण नाही  ....!

      कालच्या या भाषणात मला सर्वात जास्त आवडले ते त्यांची "जनआंदोलनाची व्याख्या"  स्वतंत्र भारताची जनआंदोलनाची व्याख्या ! प्रत्येक भारतीयाने कोणतीही कृती , कार्य , भूमिका करताना मग ती वैयक्तिक असली तरी त्यामागे आपल्या देशाच्या हिताचा  .... विकासाचा विचार असावा  ....! भले ते काम कितीही लहान वा मोठे असू दे  …!   खुप मोठी शक्ति आहे या विचारात   …! देशभक्ती  केवल सीमेवर जाऊं लढून शहीद होउनच करू शकतो का  …?  ती  आपल्या पासून आपल्यातून रुजवा  …! आपोआप भ्रष्टाचार, विध्वंसक विचार नष्ट होतील  ....! सर्वाना बरोबर घेऊनच विकास घडेल  … हे सत्य "मोदींनी" आपल्याला सांगितले असेल तरी त्यासाठी प्रत्येक भारतीयाने स्वत:पासून सुरवात करावी !

          काल घडवलेली क्रांति ही प्रत्येक मतदात्या भारतीयाने घडवलेली क्रांति आहे  …! या क्रांतीचा कडकडाट  … गड़गड़ाट सम्पूर्ण विश्वाला दिसला आहेच  !  आता त्याचा प्रकाश सर्वदूर प्रसवावा  … या साठी मोदी सरकार  आणि माझ्यासह  सर्व हिंदुस्थानी देशभक्तांना हार्दिक शुभेच्छा  ……!!  

                                                                   " गर्वसे बोलो वन्दे मातरम "

                                                                                                                      (पुष्पांजली कर्वे )

"मंगळसूत्र "

 "केव्हातरी या स्वप्नातुनी
पड़ेन  का मी बाहेरी
एकदाच , जाईन जेंव्हा मी
अखेरच्या त्या माहेरी
तेंव्हा ही पण असेल माझ्या
सूत्र प्रीतीचे हेच गळां ,
भाळावरती असेल तेंव्हा
अहवतेचा हाच टीळा| "

     कवितेच्या या ओळींमध्ये एका विवाहित स्त्रीची कपाळावरचं कुंकु आणि गळ्यातलं "मंगळसूत्र " या  अहवतेच्या या लेण्यांसह अंतीमच्या माहेरी जाण्याची इच्छा दिसते  ....!! आपल्या भारतीय संस्कृतीत   "कुंकु" आणि  " मंगळसूत्राला " एखाद्या स्त्रीच्या ठायी हे एवढे  महत्व आहे !

      स्त्रीच्या लग्नानंतरच्या तिच्या आभूषणांत "मंगळसूत्र " हे एक आभूषण वाढलेले असते  …एक "दागिना" एवढीच किंमत असते का "त्याला " त्या दागिन्यात कुणाच्यातरी हक्काची बायको हेच  फक्त अधोरेखित होते का  ....? खरच  गळ्यातील हे  काळे मणी  स्त्रीच्या अस्तिवाला संरक्षण देतात का असा विचार केला तर   हल्लीच्या समाजात वावरताना मला आज अश्या अनेक स्त्रीया दिसतात ज्या विवाहीत सधवा असूनही मंगळसूत्र घालीत नाहीत  …! का  …?  कदाचित ते त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आड़ येत असावे   .... किंवा "मुक्त स्त्रीमुक्तीच्या भूमिकेतून "मंगळसूत्राला " एक "दागिना "  या पलीकडे महत्व त्यांना द्यावेसे वाटत नसावे  .... !  किंवा अगदी  साधेसे  कारण मॉडर्न आउटफीट वर ते आउटडेटेड फॅशन केल्या सारखे वाटत असावे  ....! 

     आता एवढे विवेचन केल्यावर वाचणा-यांच्या भुवया कदाचित उंचावल्या जातील  म्हणजे मी "मंगळसूत्र " न घालना-या स्त्रियांना हिंदू संस्कृतिच्या मारक तर ठरवित नाही   …?

    पण खरं तर मला वेगळाच प्रश्न पडला आहे   …!  कारण मी आज अश्याही स्त्रीया पहाते आहे ज्या विधवा आहेत  …अगदी प्रौढ़ कुमारीका आहेत पण त्याही गळ्यात मंगळसूत्र  घालताना दिसतात .... !   का  …?  नव-या शिवाय , एका पुरुषा शिवाय परंपरावादी पुरुषी समाजात वावरताना  स्वरक्षण व्हावे या साठी   …? बरे  हे स्वरक्षण कुणापासून  आणि कसे  हा मोठा प्रश्नच आहे ! कारण हल्लीच्या काळात  मुक्तस्वातंत्र्याचे स्वैर वारे संपूर्ण समाजातच वाहत आहेत  ..... त्यामुळे हे "मंगळसूत्र " पुरुष काय आणि स्त्री काय दोघांचेही नित्तिमता आणि नैतिकता टिकवण्या साठी किती उपयोगी आहे हा अभ्यासाचा विषय व्हावा !
      खरे तर नवरा नसला म्हणून काय झाले   … त्याच्या मागे मी माझे सौभाग्यलेणे का त्यागुं  …? या भूमिकेतून   ज्या स्त्रीया मंगळसूत्र घालतात त्यांचे कौतुक करावे की "मुक्त स्त्रीमुक्तीच्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीला छेद म्हणून  "मंगळसूत्राला " एक "दागिना "  या पलीकडे महत्व नाही या भूमिकेतून मंगळसूत्र घालणे नाकारतात त्यांचे कौतुक करावे? 
                                     

       थोडक्यात आजच्या  आधुनिक स्त्रीचे विचार आणि कृती  दोन्हींचा गोंधळ उडालेला दिसतोय ..! म्हणजे  " मंगळसूत्र" हे स्वरक्षण आहे , परंपरा संस्कृती  आहे , की  केवळ एक आभूषण आहे...? आजच्या समाजातील स्त्री पुरुष  विशेषतः स्त्रीया या "मंगळसूत्राला" नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहतात हे समजून घ्यायला आवडेल  ...!
 

                                                                                                     "समिधा" 
              

 


              

"संकलन " हे श्री . बा . जोशींचे पुस्तक

     "संकलन " हे श्री  . बा   . जोशींचे  पुस्तक वाचले   …!  यातील प्रत्येक निबंध वाचताना हे पुस्तकच आपल्या संग्रही असावे असे वाटले  . लेखक कलकत्त्यातील  राष्ट्रीय ग्रंथ संग्रहालयात ग्रंथपाल असल्यामुळे त्यांचे  अफाट वाचनाची कल्पना येते  …! या "संकलनात "  एकूण सतरा निबंध आहेत  . 

     "लिहून छापून नामानीराळे" या लेखाने  मी थक्कच झाले   .  नामांतर वाद आपल्याला नवा नाही  पण  तो किती  जूना आहे हे वाचून गंमतच वाटली   .! नाव बदलने हा प्रकार किती  रोचक आणि मनोरंजक असू शकतो याची प्रचिती हा  लेख वाचून आला   .  नाव बदलूं लिहिणारे देशी परदेशी लेखक त्यामुळे उडणारे गोंधळ सारे वाचताना मजा येते  .  

     "खोदावया हवे खोल" हा लेख म्हणजे माहितीचा खजिना  !  यात पुराविद्येचा परिचय मिळाला  .! या पुराविद्येतही  प्रागौतिहासिक  आणि साधारण पराविद्या असा स्थूल भेद करण्यात येतो   . तसेच संग्राहक आणि संशिधक यातही फरक  आहे  .  संशोधनाच्या चार पातळया -
१. भूपृष्ठ संशोधन  २. भूमिगत संशोधन  ३. जलगत संशोधन  आणि ४. आकाशगामी संशोधन  या सर्वाँबद्दल वाचने म्हणजे नव्या अद्भुत गोष्टीचा अनुभव घेणे  ! 

     "माणुस  रविंद्रनाथ "  या लेखात रवीन्द्रनाथ टागोरांचा संपूर्ण परिचय घडतो  .   त्यांच्या स्वभाव वैशिष्टयांपासून ते त्यांच्या आहार शास्त्रापर्यंत , त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून ते त्यांच्या लेखनापर्यंत     सा-याचा अत्यंत रोचक भाषेत वेध घेतला आहे  .! रवीन्द्रनाथ टागोरांना नविन नविन पदार्थ खाण्याची  आणि करण्याचीही आवड होती   .!  आणि त्यांचा पेहराव निसर्गातील प्रत्येक मोसमाचे स्वागत करणारे असे  । या लेखातुन  त्यांचे  आलौकिकत्व पटते  .  

     यातील "अहिल्या कर्मयोगी " हा लेखहीं असाच सुन्दर आणि रोचक आहे   !  पेशवकालिन एक स्त्री  .  ज्या स्त्रीला दैवाने अनेक समरप्रसंगातून जाण्याचे भाग्य् दिले   … त्या दैवालाच तिने जीवनांता पर्यन्त पुजले  !
राज्यकरभाराचा भार एखाद्या श्रेष्ठ , धुरंधर राजकारण्या सारखा पेलला  …! सासु गोपिकाबाइंच्या मार्गदर्शनाखाली त्यानी प्रजेची सेवा केली  ....!  त्यांची  अहिल्या कर्मयोगिनी ही ओळख मनोमन पटते  …! 

     थोडक्यात "संकलन " हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे  .!  अनेक अश्या माहिती आपल्याला नव्याने कळतात  !  अतिशय रंजक आणि तरीही उद्बोधक आणि संग्रहणीय माहिती या पुस्तकातून मिळते  !

 पुस्तकाचे  नांव :- "संकलन"
 लेखक  :- श्री  .  बा।  जोशी (लेखक कलकत्ता राष्ट्रिय ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते  .  )


                                                                                                          समिधा 

वृत्तपत्रीय भविष्याकडे

     
             सकाळी वृत्तपत्र हातात पडल्यावर हेडिंग नंतर भविष्याकडेच मोर्चा वळतो  …!

     वृत्तपत्रीय भविष्य कथनातही बरी हुशारी बरतलेली असते  ....! म्हणजे भविष्य सांगताना अगदी ठामपणे काहीच दर्शविलेले नसते … ! उदा  . मौन पाळावे ,  समयोचित वागा  , वाद टाळा   … इ  . मग अश्या वेळी खरच भविष्य वाचना-यांची पंचाईतच होते  …!

      समयोजित वागा ,  वाद टाळा यामधून नेमके कधी , कसे , कोठे आणि कशा त-हेने वागावे , बोलावे कसे कळणार  …?? 

          स्व:तावरील विश्वास डळमळीत झाला की  माणूस "सुपरस्टीशियस " होऊ  लागतो  …! आणि मग तो या लाचारीमुळे एकतर कमालीचा धार्मिक बनतो किंवा रोजच्या वृत्तपत्रीय भविष्याकडे वळतो  …! 

                                                                                                  समिधा 

स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका महत्वाचा का वाटतो …?

     

                                                


       सुनंदा  पुष्कर यांच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रीने जीने इथपर्यंतचा प्रवास अतिशय कनखरपणे केला   .... ती  स्त्री केवळ एका पुरुषासाठी आपले जीवन संपवू शकते  …?

         एकटे असून एकटे जगणे  शक्य होते  .... मात्र दुकटे असून एकटे जगणे खुपच कठीण  …! असा माणुस खचत जातो  ....! मग ही  शारारिक  बाब रहात नाही  …! ती मानसीक होते  … माणूस नैराश्याने वेढतो  आणि मग मनाने खचतो  तिथे मग स्त्री असो   वा पुरुष असो तो मग अश्या स्वत:ला  सपंविण्याच्या निर्णयाप्रत पोहचतो  …!!

          तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की   शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका  महत्वाचा  का  वाटतो  …?
         जेंव्हा याचा शोध घेते तेंव्हा मला समजलेली … उमजलेली काही कारणे आपली भारतीय समाज व्यवस्था याला जबाबदार आहे  ! कारण उच्च विद्या विभूषित  … स्वत:चे  एक विशिष्ट  स्थान प्राप्त केलेल्या स्त्रियांना कदाचित पुरुषी स्थैर्याची  गरज नसेल पण ज्या स्त्रियांचे विश्वच त्यांच्या पुरुषाच्या प्रेम, विश्वास  या भोवती वेढलेले आहे त्यांचे काय  …! ज्यांच्या जवळ शिक्षण, आर्थिक स्वावलंबन  सारे आहे  …! पण स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाही  … आणि कधी  असली तरी अश्या पुरुषी समाजात एकटे राहण्याचा आत्मविश्वास नसतो  …अश्या स्त्रीया  घरगुती हिंसाचाराच्या शिकार होऊनही कधी सामाजाच्या भीतीने त्याच्या बरोबर रहात असतात   …!  पण  तरीही काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या  नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात  …आणि स्वत:ही जगतात   !   म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाला डावलून जगण्याचा  संस्कार म्हणा , भीति म्हणा , या मुळे त्यांची तयारी   नसते  ! आणि म्हणूनच ज्याच्यावर त्या खरे प्रेम करतात म्हणून  … किंवा स्वत:चा स्वार्थ म्हणुनही   (  कोणताही स्वार्थ …) स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष  महत्वाचा  वाटतो  अगदी कुणाच्याही जीवापेक्षा   ....! 

   पण आजकाल ही परिस्थिति बदलत आहे   …! म्हणूनच कदाचित (मुलींकडूनही ) घटस्पोटांचे प्रमाण वाढत आहे  …!

                                                                                                          " समिधा "

माझ्या दैनंदिनीतील एक पान ....… एक विचार .... !!!

                                                                  


प्रत्येक दिवस सारखा नसतो   ....!! गेलेले दिवस, आजचे दिवस आणि येणारे दिवस असे साधे  विभाजन शक्यच नाही   ....! 

आतापर्यंत माझ्या गेलेल्या दिवसांत बरेच दिवसांना सोनेरी झळाळी आहे   .! काहींना दू:खाची किनार , तर काही मनस्ताप पश्चातापाच्या वर्खाने झाकोळलेले आहेत   ! प्रत्येक दिवसाचा स्व:ताचा एक रंग आहे  …!  भाव आहे  …! 

येणारा पत्येक दिवस असेच विविधरंगी असतीलच  … पण एखाद्या दिवसामध्ये एक विशिष्ट गती-चैतन्य  आणि विशिष्ट जीवंतपणा असतो तो प्रत्येक दिवसात नसतो  …!

माझ्या वाट्याला असे चैतन्यमय - गतिशील "दिवस" बरेच आलेत आणि "जो दिवस " असा असतो तो दिवस माझ्या प्रत्येक दिवसाला  ह्याच दिवसाचा जीवंतपणा लाभावा असे वाटल्यावाचून  रहात नाही  …!   

मला माझे जीवन - जीवनातील प्रत्येक दिवस कसा भरजरी पाहिजे,  पण माझी ही इच्छा    अतिशयोक्तीपूर्ण आहे   … पण तो इतका सामान्यही नसावा की ज्यामुळे येणा-या प्रत्येक दिवसातील चैतन्य नष्ट करेल  की काय अशी भीति निर्माण करेल   …  तर  येणा-या प्रत्येक दिवसाला आणि येणा-या प्रत्येक दिवसाने आपल्याला काही ना काही नवसृजनतेच्या रुपात द्यावे जेणेकरून आपली जगण्याची उमेद वाढेल  …! 

मुळातच मला केवळ सामान्य म्हणून जगायचेच  नाही  …  अर्थात असामान्य होण्याइतकी आपली कूवत आहे  की नाही हे समजण्या इतकी मी समंजस नक्कीच आहे   ....!  पण मी माझ्या पुरती एक स्वतंत्र अवकाश नक्कीच निर्माण करू शकेन असा मला  विश्वास आहे  … !!  मनातील प्रत्येक नवसृजनेतेची उर्मी मी दाबणार  नाही  … कारण तीच उर्मी माझ्या  जगण्याचा   … येणा-या प्रत्येक नव्या दिवसाचा एक नवा रंग आणि एक नवा भावनानुभव असणार आहे   .... जगण्याची नवी उमेद असणार आहे  …!  त्या माझ्या प्रकाशतल्या वाटा आहेत  !!

                                                                                           "   समिधा "


२६ जानेवारी … प्रजासत्ताक दिनाची एक सदिच्छा ... खरे अभिवादन......!

                                     

         २६ जानेवारी  … प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे  …! शाळेत असतांना ह्या दिवसांचे मला कोण अभिमान आणि ओढ़ असायची   … कड़क इस्त्रीचे कपडे घालून ताठ मानेने झेंडा वंदन करण्यातील आनंद घेणे मला खुपच आवडायचे   ....  तो दिवस मी स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन साजरा करीत असे  …!  आणि संध्याकाळी  मुस्लिम वस्तीत तिथल्या शाळांमध्येही  ध्वजारोहण केले आहे की नाही हे पाहण्यासाठी जात असे  … (बालबुद्धि  …… देशप्रेम,   देशाभिमान व्यक्त करणे  … इतरांचे पारखने  सारेच गमतीशीर होते  …! ) 

   पण पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन  , १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन हे  सुट्टीचे दिवस म्हणूनच अधिक साजरे होउ लागले  …! कॉलजे मध्ये हे दिवस फक्त N. C. C. कैम्प मध्ये साजरे करतात  … !याच दिवसात कुठल्यातरी राजकीय युवा सेनेचे हौशी कार्यकर्ते असतांना शाळांमध्ये जाऊन झेंडा वंदन करीत असे  …! पण पुढे ती संघटना बंद पडली आणि आमचे झेंडा वंदनही  !पण मी सुद्धा ह्या दिवसांचे महत्व कमी केले  होते हे मात्र माझ्यासाठी अक्षम्य आहे   ! 

        आजही भारतीय ह्या दिवशी पिकनिक अरेंज करतात  .... ! आजची सारी धर्मं आधारीत अघोरी प्रेमाची अतिश्योक्ति पाहिल्यावर  … त्याचे राष्ट्र उभारणीवरील , प्रगतिवरील परिणाम पाहता प्रत्येक भारतीयामध्ये अन्य कोणत्याही प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम अधिक प्रखर असणे गरजेचे आहे  असे वाटते   !  

       शाळांमध्ये जसे विद्यार्थी  प्राथर्ना  ,  राष्ट्रगीत  गातात   .... तसेच ते महाविद्यालयातही  आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायलाच पाहिजे   .... ! पण  तसे ते राष्ट्रगीत गान सक्तीचे केले नसल्याने  शाळेतून महाविद्यालयात आल्यावर मात्र हे राष्टप्रेम कमी होत नसले तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होते  … ! भारताच्या  प्रत्येक भावी पिढीतील   राष्ट्रप्रेम  हे इतर कोणत्याही प्रेमा पेक्षा अधिक  प्रखर व्हायला पाहिजे   …!!! तरच २६ जानेवारी  .... १५ ऑगस्ट हे दिवस फक्त राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे दिवस रहाणार नाहीत  …!तर सीमेवर लढणा-या सैनिकाप्रमाणे सतत हे राष्ट्रप्रेम  जागृत असावे  … सतर्क असावे  …! राष्ट्रपेक्षा काहीच महत्वाचे नाही  …!  प्रत्येकाचे  आपले धर्मं आचरण केवळ आणि केवळ राष्ट्रहीतासाठीच असावे  …! राष्ट्रपेक्षा कुणीही मोठा नसावा   ....!  राष्ट्र   ....  देश   … आहे  म्हणून आपण आहोत  ....!!! 

         आज भ्रष्टाचार मोठा झाला आहे   !  आज कटटर धर्मांधता  मोठी झाली आहे  …! दहशतवाद मोठा झाला आहे  .... आज पैसा मोठा झाला आहे  ....!! आणि आज माणुस , माणुसकी , पर्यावरण , सा-या सा-याचा हळुहळु -हास होत आहे  …!!!  राष्ट्रप्रेम प्रखर करा   … राष्ट्र वाचवा   आणि  हेच यावर उत्तर आहे  सीर सलामत तो पगड़ी पचास  राष्ट्र वाचला तर आपण वाचू  ....! आपले अस्तित्व राष्ट्रामुळे आहे  …! धर्म , संस्कार ,संस्कृति , परंपरा  ह्या राष्ट्रिय स्तभांचे स्तोम माजविण्या पेक्षा पर्यावरण-हास , भ्रष्टाचार,अत्याचार, दहशतवाद, बेकारी,गरीबी ,  परकियांची  घूसखोरी  या संघर्षासाठी साठी  मैदानात येण्याची गरज आहे  …! प्रत्येक राष्ट्रभक्ताने  आपापल्या परीने थोडासा खारीचा वाटा उचलावा  ....!!! हीच  सदिच्छा  ....! आणि हीच आपल्या  स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना खरे अभिवादन ठरेल  ....!!! 

                                                                   
                                                                                                                 
                                                                                                            समिधा 







आशेला नवे पंख फुटु दया ........!

     मनाला नवे पंख फुटले की माणूस स्वप्नांच्या अवकाशात स्वत:ला झोकून देतो आणि कल्पनातरंगाची अनेक वलये तो आपल्या भोवती वेढून घ्यायला लागला कि नकळत तो स्वत:पेक्षा या दिवास्वप्नामध्येच अधिक गुंतायला लागतो   .... !!स्वप्नं भंगली की  मन निराश होते   …। आणि ते मग सर्वांमध्ये असूनही अलिप्त राहायला लागते   … शरीर बोलत असते पण मन   .... मात्र कुठल्यातरी नकळत्या कोप-यात एकटेच विचार तंद्रित भरकटत दूर   .... जात असते   …! पुन्हा पुन्हा ते समोरच्या वास्तवात येण्याचा प्रयत्न करीत असला तरी निराशा तसे करू देत  नाही  .... !  अश्या निराश मनाला स्वत:भोवती गोळा  करण्यास  बरेच प्रयास पडतात  .... आणि असे मन थकून भागुन  परतले कि , समोरच्या वास्तवाशी त्याचे नाते तुटलेले असते वास्तवाचे मन तो पर्यन्त दूर गेलेले असते  …!

     कधी कधी  हे निराश मन  … दुस-या मनाचा आधार घेते  … त्यावेळी दुस-या मनाने  सांत्वन करणे  त्याला त्यावेळी हवेहवेसे वाटत असेल तरी सुद्धा त्याला ते मन  कितपत समाधान देईल हे परिस्थिति प्रकृतिवर अवलंबून असते   …। कदाचित हे दूसरे मनही  निराश मनासारखे समदुःखी असेल तर साथ सोबतीने  वाटचाल करण्यास त्याना आनंदच होत  असतो  … ! पण दोघांचा प्रवास नव्या आशावादाकडे होत नसतो  …!!

                                 


    म्हणूनच  मनासारखे आशेलाही नवे  पंख फुटू शकतात  ....! एकीकडून निराशा झाली पण दुसरा मार्ग खचितच मोकळा असतो  …!  फक्त तो आपण सतर्क व्यापक दृष्टीने शोधायचा असतो  …! कारण अनेक मार्ग आपल्या समोर असतात हे काहीअंशी  खरे असेल तरी आशेला नवे  पंख फुटल्यावर सर्वच मार्ग सुकर वाटतात   … आपलेच वाटतात   …! म्हणूनच आशेला नवे   पंख फुटु दया  .... ! त्या पंखानी आपण आकाशावरच स्वार  होण्यास सज्ज होणे  म्हणजे खरा आशावाद आहे  ....!

                                                                                               "समिधा "





धर्मांतर …!!!!!

    मला अतिशय आनंद होत आहे की , … "हिंदू धर्मा " विषयी आजच्या हिंदुस्थानी तरुण  पिढीचे विचार किती  प्रखर आहेत  …! तरुण पीढ़ी आपला  "हिन्दू धर्म म्हणजे नेमके काय ? याचा अतिशय अभ्यासपूर्ण आकलन करुन… आज आपला धर्म -ह्रास पावत आहे , हिंदूंचे धर्मांतर होत  आहे    … हे पाहून   … नुसती पेटून उठली  आहेत  ……! 

        मला माझ्या हिंदू  असण्याचा प्रचंड अभिमान आहे  ....! कारण  हिन्दू धर्म  हा याच्या त्याच्या विचारांची आदान प्रदान करून  निर्माण झालेला नाही  " हिंदू धर्म  ' स्वयंसिद्ध" , "स्वयंभू" आहे  . ! "हिन्दू धर्माचे प्राचीन नाव "वैदिक धर्म " आहे  . म्हणजेच वेदांवर आधारलेला धर्म ! वेद  हे सम्पूर्ण जगातील प्राचीनतम ग्रंथ  आहेत   ! वेद  म्हणजे हजारो मंत्रांचा संग्रह ! आणि ज्यांना  ते उत्स्फूर्तपणे स्फुरले,दिसले, शोध लावला  … त्यांचा साक्षात्कार करुन  घेतला आणि  ज्यांच्या मुखातून प्रकट झाले,त्यांना आपण  "ऋषी"  म्हणतो   !   

   मुळात "धर्म " म्हणजे जगण्याची , जगवण्याची एक निति, आचरण  …!  "हिन्दू धर्मात अध्यात्माला-धार्मिकतेला  ( कर्म कांड  नव्हे ) अनन्य साधारण महत्व आहे  …! आणि जिथे धार्मिकता येते , अध्यात्म येते तिथे सहिष्णुता , बंधुता , प्रेम, मानवता येते   …! आणि तोच खरा हिन्दू धर्म  आहे  .!  ज्याच्या ठायी  हे सारे आहे तोच खरा "हिंदू "    !  स्वामी विवेकानंद  यांनीही "राष्ट्रीय एकात्मता " साधायची असेल तर विखुरलेल्या अध्यात्मिक शक्तींचे एकीकरण करावे लागेल    … ! आपण सारे अध्यात्मिक वृत्तीचे झाल्याशिवाय भारताचे पुरुजजीवन होणार नाही  .!  एवढेच नव्हे तर  यावर सर्व जगाचे हित आहे  .!  असे सांगितले आहे   !

     आपल्या हिन्दुस्थान वर अनेक परकियांची आक्रमणे झाली  …! त्यामुळे अनेक संक्रमणे झाली   … आणि तरीही आपला हिन्दू धर्म अजूनही अभेद्य आहे  …! त्याने अनेक नव्या धर्माना   एक विचार दिला  .! जगातील सर्व धर्मांचा "पाया" हिन्दू धर्म आहे   …!  आणि म्हणूनच प्रत्येक धर्मात "ईश्वराची" व्याख्या , त्याच्या पर्यंत  पोहचन्याचा मार्ग एकच सांगितलेला  आहे   ! 

       आज अस्तित्वात असलेला प्रत्येक धर्म आप आपल्या चांगल्या वाइट पद्धतीने आपला धर्मं वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे   …! पण  तो कसा आणि कशासाठी याचा शोध  कोणी घेतला आहे का   …?  "श्री कृष्णाने  धर्मयुद्ध घडवले   ....! पण  ते कोणा  विरुद्ध   ....?  ज्यांच्याशी धर्मयुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला "गीते चे " दिव्य dnyaan, तत्वदन्यान्   दिले  …  ते कोण होते   .... ? कोणत्या धर्माचे होते   ....?  श्रीकृष्णाने नेमक्या कोणत्या धर्मासाठी धर्मयुद्ध केले  …?   त्या  महायुद्धात , धर्मयुद्धात जे लढले   … मारले गेले  … ! ते एकमेकांचे पिता, बंधू , सखा होते  …!  "गीते मधील वर्णन असे आहे "पृथ्वीतलावर एकूणच धर्माचा -हास होउ लागला   . नीति नियम सोडून आसुरी वृत्ति वाढली    . अत्याचार वाढला   । तेंव्हा श्री विष्णुना " श्रीकृष्णाच्या रुपात अवतार घ्यावा लागला   …! 

        आज जगातील वाढलेल्या  त्याच अत्याचारी , आसुरी, निर्दयी शक्तींचा, वॄत्तिंचा  नाश करायचा आहे  ....! न कि कुठल्याही धर्माच्या असुयेने ,मत्सराने दंगली, युद्ध करून   विशिष्ट पंथातील-धर्मातील निष्पाप माणसांचा, अबालवृद्धांचा नाश करायचा    …!  हिन्दू धर्माचा  …अर्थात "हिन्दू धर्मात अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी कोणते विचार दिले आहे त्यांचा प्रसार करा  …! आपल्याला  विचारी हिन्दू हवेत   …अविचारी "जिहादी" नकोत    …! आपला हिन्दू धर्म डोळस असावा आंधळा नको  ! जबरदस्तीने , लोभाने , भीतीने , अनीतिने हिन्दू धर्मं  स्वीकारणारे  हिन्दू अनुयायी नकोत   …! आपल्याला अंत:करनाने  हिन्दू झालेले हिन्दू हवेत   ....! " स्वामी विवेकानंद " यांनी  जगभर आपल्या हिन्दू धर्माचा जो डोळस प्रचार केला   …! तसा प्रचार करणे   आजच्या तरुण पिढीचे परम कर्तव्य  आहे  …!  हिन्दू धर्म नेमका काय आहे याचे खरे स्वरुप काय आहे हे जगाला  सांगून पटवून दया  .!   शिवाजी महाराज परकियांशी  लढले तसे नीतिनियम तोडणा-या स्वकीयांनाही त्यांनी  सोडले नाही  …! श्रीराम यांनी   "रावणाशी   धर्मयुद्ध केले" पण  एका  स्त्रीच्या  आपल्या पत्नीच्या स्वाभिमानसाठी  ....! ते  रावणाच्या आसुरी शक्ति विरुद्ध लढले   …! रावणाचा सख्खा भाउ विभीषण श्रीरामा कडून लढला  !    … का  .......? 
           
              आज प्रत्येक खरा हिन्दू पेटून उठणारच   .... कारण  त्यांच्या धर्मात दिलेल्या नीतिनियमांचा। -हास होत आहे   …! हे त्याला पहावत  नाही  … पण  त्याचा -हास रोखायचा असेल तर  मुळात आपण परकियांचे अंधानुकरण करणे  थांबविले पाहिजे   …! आपली परंपरा , संस्कृति, संस्कार, ह्या आपल्या घरापासून जपल्या पाहिजेत  …!  दु स-यांना  सांगण्या आधी स्वत: त्यांचे आचरण करा  ....! आधी करा नंतर बोला  ....!  हिन्दू धर्मं प्रत्येकाच्या श्वासा श्वासात पाहिजे   … ! आपल्या भारतीयांची ती  ओळख आहे ! आणि ही आपली ओळख जगात कुठेही गेलात तरी सांगायला, दाखवायला लाजु नका  …! चला उठा हिन्दू धर्म वाचवा  …! हिन्दू धर्म वाढवा   ……! हे विचार खुप मवाळ वाटतील   …! पण जर आपल्या हिन्दुस्थानवर  कोणत्याही दुस-या जिहादी किंवा अन्य  शक्तिनी आक्रमण केले तर प्रत्येक हिन्दुस्तानी त्याच्यावर तुटून पडलाच पाहिजे  …! मग तिथे मला" गांधी निती " नको" स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिन्दुस्तानी राष्ट्रनीति पाहिजे " …!!!

          
                                                                                                     " समिधा "







लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......